लाल भोपळ्याचे तिखट घारगे (lal bhoplyache tikhat gharge recipe in marathi

Kamat Gokhale Foodz
Kamat Gokhale Foodz @KGF11

#shr

घारगे ही महाराष्ट्रातील पारंपारिक रेसिपी आहे. पण सगळीकडे हे घारगे गूळ वापरून गोड बनवले जातात. माझ्या घरी जेव्हा नेहमीचे गोड घारगे बनवतो त्यासोबतच काही तिखट घारगे सुध्दा बनवतो. चला तर तिखट घारगेची रेसिपी पाहू.

लाल भोपळ्याचे तिखट घारगे (lal bhoplyache tikhat gharge recipe in marathi

#shr

घारगे ही महाराष्ट्रातील पारंपारिक रेसिपी आहे. पण सगळीकडे हे घारगे गूळ वापरून गोड बनवले जातात. माझ्या घरी जेव्हा नेहमीचे गोड घारगे बनवतो त्यासोबतच काही तिखट घारगे सुध्दा बनवतो. चला तर तिखट घारगेची रेसिपी पाहू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
२-३ लोक
  1. 2 कपखिसलेला लाल भोपळा
  2. 1/2 कपतांदळाचे पीठ
  3. 1/2 कपगव्हाचे पीठ
  4. 1 चमचाकिंवा चवीनुसार मीठ
  5. 1 चमचाहिरवी मिरची आणि आल्ले पेस्ट (मिरची आवडीनुसार वापरावी)
  6. 1 चमचातीळ
  7. 1/4 कपकिंवा आवडीनुसार कोथिंबीर
  8. घारगे तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम गॅसवर एक कढई गरम करून त्यात २ कप खीसलेला लाल भोपळा घालावा. आणि परतून घ्यावा. ह्यामध्ये तूप तेल काही वापरायची गरज नाही.कारण भोपळा जसजसा गरम होत जाईल त्याचे स्वतःचे पाणी सुटत जाते. त्या पाण्यामधेच भोपळा शिजला जातो.

  2. 2

    २-३ मिनिट परतून झाल्यावर ५ मिनिट झाकून ठेवा. छान वाफ येऊ द्या. त्यानंतर झाकण काढून पुन्हा एकदा परतून घ्या. असे २-३ वेळा करावे. म्हणजे पाणी न घालता वाफेवरच भोपळा शिजवून घ्यायचा आहे. आता यात मिरची आणि आले पेस्ट घाला. पेस्ट बनवतात मिरचीचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. १/२ चमचा मीठ घाला. आणि पुन्हा सगळे मिक्स करून घ्या.

  3. 3

    आता ह्याचा छान गोळा तयार होत आला आणि जास्तीचे पाणी आटले की आपले मिश्रण तयार आहे समजून गॅस बंद करावा.आणि तयार मिश्रण परातीत काढून घ्या.

  4. 4

    आता ह्यामध्ये १ चमचा तीळ, थोडी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.

  5. 5

    त्यानंतर यात अर्धा कप तांदूळ पीठ आणि अर्धा कप गव्हाचे पीठ घाला. १/२ चमचा मीठ घाला. भोपळा शिजताना अर्धा चमचा मीठ वापरले आहे त्यामुळे आता फक्त पिठापुरते मीठ घालावे.

  6. 6

    आता ह्या सगळ्याचा छान गोळा मळून घ्यावा. मळताना यात अजिबात पाणी घालू नये. मग थोडेसे तेल लावून गोळा एकसारखा करून घ्यावा म्हणजे हाताला चिकटणार नाही.

  7. 7

    आता ह्याचे छोठे गोळे बनवून पुरी मेकर किंवा पोळपाट लाटण्याने लाटून घारग्या लाटून घ्या. किंवा अगदी हाताने थापून सुध्दा करता येतात. Me पुरी मेकर वापरले आहे कारण ह्याने खूप वेळ वाचतो😀

  8. 8

    आता ह्या लाटलेल्या/थपलेल्या घारग्या कढई मधे तेल गरम करून दोन्ही बाजूंनी छान तळून घ्या आणि गरम गरम खायला घ्या.😀हे घारगे चटणी, सॉस किंवा अगदी फक्त चहा सोबत सुद्धा खूप टेस्टी लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kamat Gokhale Foodz
रोजी
YOU TUBE - Kamat Gokhale Foodz
पुढे वाचा

Similar Recipes