खमंग बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#दिवाळी_फराळ_रेसिपीज

#Cooksnap

#दिवाळी_फराळ_रेसिपीज_कुकस्नँप

#खमंग_बेसन_लाडू

दिवाळी म्हणजे बेसन लाडू...बेसन भाजत आले की सुटणारा खमंग दरवळच दिवाळीच्या आगमनाची वर्दी देतो...दिवाळीचा feel देतो...आणि दिवाळीचा mood सुरु होतो..मी देखील दिवाळीचा माहोल,दिवाळीची सुरुवात बेसनाचे लाडू करुन केलीये..यासाठी मी माझी मैत्रीण @Ujwala_rangnekar हिची खमंग बेसन लाडू ही रेसिपी cooksnap केलीये..उज्जवला खूप मस्त आणि खमंग झालेत बेसन लाडू..Thank you so much dear for yummilicious recipe..🌹❤️💕💕.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
30 जणांना
  1. 1 किलोबेसन पीठ
  2. ७५० ग्रॅम पिठीसाखर
  3. 1/2 किलोतुप
  4. 2 टीस्पूनवेलची पूड
  5. 2 टेबलस्पूनकाजूचे तुकडे
  6. 1/4 कपदूध

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    कढईमधे थोडं थोडं तूप घालून त्यावर बेसन पीठ घालून मंद आचेवर चांगला ब्राऊन रंग होईपर्यंत बेसन खमंग भाजून घ्या. सुरवातीला बेसनाचे खडे होतात, पण जसे खमंग भाजत राहू तसे ते खडे वितळून स्मूथ पेस्ट बनते. बेसन भाजायला जरा जास्त वेळ लागतो तरीही बेसन पीठ खमंग भाजले तरच लाडू चवीला छान लागतात.

  2. 2

    बेसन चांगले खरपूस ब्राऊन रंगाचे दिसल्यावर त्यात पाव‌ कप दूध घालून भराभर ढवळायचे. बेसनाचा रंग बदलून छान खरपूस ब्राऊन रंग येतो. भाजलेल्या बेसनामधे दूध घातल्यामुळे बेसनाचा लाडू खाताना तोंडामधे चिकटत नाही.

  3. 3

    बेसन एकजीव झाल्यावर जेव्हा कोमट होईल तेव्हा त्यात मिक्सरमधून जाडसर दळलेली पिठीसाखर घालावी. पिठीसाखर जाडसर दळल्यामुळे लाडू चिकट होत नाहीत.

  4. 4

    भाजलेलं बेसन आणि पिठीसाखर चांगले मिक्स करुन घ्यावे. आणि त्याचे हवे त्या आकाराचे लाडू वळावे.देवाला नैवेद्य दागवून सर्व्ह करा..

  5. 5
  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes