मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
15 घटक
  1. 500 ग्रॅममटण
  2. 2मध्यम आकाराचे कांदे
  3. 2 टेबलस्पूनतीळ
  4. 1 टेबलस्पूनखसखस
  5. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  6. 1 टेबलस्पूनजीरे
  7. 1 टेबलस्पूनधने
  8. 2तमालपत्र
  9. 2 लवंग
  10. 2 काळीमिरी
  11. 1फुल
  12. कलमी
  13. 1 टेबलस्पूनआले-लसूण कोथिंबीर ची पेस्ट
  14. 1-1.5 टेबलस्पून तिखट
  15. 1/2 टेबलस्पूनहळद
  16. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  17. 3-4 टेबलस्पून तेल किंवा आवडीनुसार
  18. 1 टेबलस्पूनकसूरी मेथी
  19. प्रमाणात मीठ

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    मटण स्वच्छ तीन-चार पाण्याने धुऊन घ्यावे. कांदा, तीळ,खसखस, धने जीरे, खडे मसाले तेल घालून भाजून घ्यावे आणि त्याचे वाटण करून घ्यावे. तसेच आले लसूण सांबाराची पण पेस्ट तयार करून घ्यावी.

  2. 2

    कुकर मध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये जीरे मोहरी,आलं-लसणाची पेस्ट, कसुरी मेथी कांद्याचं वाटणं घालून मिक्स करून घ्यावे. हळद तिखट गरम मसाला आणि प्रमाणात मीठ घालावे.

  3. 3

    सर्व मसाला मिक्स करून तेल सुटेपर्यंत शिजू द्यावे. नंतर मटण घालावे. मटण घातल्यानंतर दहा मिनिटे मसाल्यामध्ये शिजू द्यावे.

  4. 4

    त्यानंतर मटना मध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी घालावे. आणि कूकरच्या आठ ते दहा शिट्ट्या काढून घ्यावेत. मटण शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालावा.

  5. 5

    तयार आहे आपला मटणाचा रस्सा. हा मटणाचा रस्सा चपाती, भाकरी, किंवा भातासोबत ही छान वाटतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes