पारंपरिक डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

पारंपरिक डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
20,25 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमडिंक
  2. 250 ग्रॅमसुके खोबरे
  3. 250 ग्रॅमखारीक
  4. 50 ग्रॅमखसखस
  5. 1 कपगूळ
  6. साजूक तूप आवश्यकतेनुसार
  7. 100 ग्रॅमबदाम
  8. वेलची पूड व जायफळ पूड

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम कढईत तूप गरम करून त्यात थोडा थोडा डिंक घेऊन तुपात फुलवून घ्यावा. एकदम सगळा तळू नये.

  2. 2

    खारीकचे काप चमचाभर तुपात भाजून घ्यावे. किसलेले सुके खोबरे भाजावे. खसखस भाजून घ्यावी. जिन्नस भाजून घेतांना आच मंद ठेवावी.

  3. 3

    तळलेला डिंक थोडासा कुटून घ्यावा.खारीक मिक्सरवर भरडसर वाटून घ्यावी. (पीठ करू नये) खोबरे सुद्धा हाताने चुरून घ्यावे.

  4. 4

    हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे. त्यात बदाम, वेलची व जायफळ पूड घालावी व मिश्रण हातानेच बारीक चुरून घ्यावे.

  5. 5

    लाडू करते वेळी एक कप गूळ घेऊन त्यात
    अर्धी वाटी पाणी घालून एकतारी पाक करावा.

  6. 6

    नंतर पाक खाली उतरून त्यात तयार केलेले सारण ओतावे व चांगले ढवळावे. लगेचच लाडू वळावेत. आपले पौष्टिक असे डिंकाचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes