पाणीपुरी (Panipuri recipe in marathi)

सगळ्यांना आवडणारी आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येणारी रेसिपी म्हणजे पाणी पुरी. लहान मुलांपासून मोठ्यांना देखील हवीहवीशी रगडा पाणीपुरी.
पाणीपुरी (Panipuri recipe in marathi)
सगळ्यांना आवडणारी आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येणारी रेसिपी म्हणजे पाणी पुरी. लहान मुलांपासून मोठ्यांना देखील हवीहवीशी रगडा पाणीपुरी.
कुकिंग सूचना
- 1
सफेद वाटणे 8 तास आधी पाण्यात भिजत ठेवावे. भिजलेले वाटणे आणि बटाटे कुकरमध्ये शिजवून घ्यावे. शिजवताना पाण्यात थोडे मीठ आणि हळद टाकावी.
- 2
वाटणे आणि बाटाटा एकत्र मिक्स करून घ्यावा त्यात मीठ, हळद, जीरा पावडर, थोडे मिरची ठेचा टाकून मिश्रण एकत्र करून घ्यावे. पाणी पुरीसाठी लागणारा रगडा तयार झाला.
- 3
गोड चटणी बनवण्यासाठी चिंच आणि खजूर आणि गुळ गरम पाण्यात उकळून घ्यावे. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्यावे आणि त्यात जीरा पावडर टाकावी आणि तुमची गोड चटणी तयार झाली.
हिरवी चटणी बनवताना 4 हिरवी मिरची,कोथिंबीर,पुदिना, आले टाकून मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. थोडे पाणी टाकून पातळ हिरवी चटणी तयार करावी. - 4
पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी सर्व प्रथम कोथिंबीर, पुदिन्याची पाने, हिरव्या मिर्च्या आणि २ चमचे जीरे घेऊन त्याची बारीक पेस्ट करावी. एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पेस्ट टाकून त्यामध्ये चिंच बुंदी, गुळ, लिंबू रस आणि मीठ टाकून गुळ विरघळतपर्यंत ढवळत रहावे नंतर हे पाणी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवावे.
- 5
पाणी पुरी सर्व्हिगसाठी एका बाऊलमध्ये बटाटे घेऊन मॅश करावे आणि त्यामध्ये मीठ घालून ते चांगले मिक्स करावे, नंतर विकत आणलेल्या पुऱ्यांना एका बाजूने हलक्या हाताने फोडून त्यामध्ये बटाटा, कांदा आणि उकडलेले चणे घालून हिरवी चटणी, चिंचेचे पाणी आणि पाणी पुरीचे पाणी टाकून ते सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेव बटाटा दही पुरी (dahi puri recipe in marathi)
#GA4 पाणीपुरी म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. मग पाणीपुरी चां कुठलाही प्रकार असू देत शेवपुरी, दहीपुरी, मसाला पुरी लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांना खायला खूप आवडते. शेव बटाटा दही पुरी ची तर खासियत च काही न्यारी. मस्त उकडलेला कुस्करून घेतलेला बटाटा त्यावर गोड दही आणि भरभरून टाकलेली बारीक शेव अहाहा अप्रतिम कॉम्बिनेशन. Sangita Bhong -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#GA4#week26#panipuriपाणीपुरी कोणाला आवडणार नाही असं भारतात तरी कोणी सापडणार नाही. आमच्या घरी तरी पाणीपुरीचा एक सोहळाच असतो त्यादिवशी बाकी कोणतेही जेवण न बनवता फक्त पाणीपुरी बनवली जाते. दोन-तीन महिन्यांनी हा एक कार्यक्रम आमचा ठरलेलाच असतो. पाणीपुरी ची सर्व तयारी करून झाल्यावर घरातले सर्वजण आपल्या टेस्ट प्रमाणे पाणीपुरी तिखट गोड कशी हवी ती स्वतःची स्वतः बनवून खातात. पाणी पुरीची भाजी, पुदिना-कोथिंबीरीचे हिरवेगार पाणी, चिंच -खजुराची आंबट गोड पाणी याचं कॉम्बिनेशन एवढं मन तृप्त करणारे आहे की विचारता सोय नाही. ब्रम्हानंदी टाळी लागणे म्हणजे काय हे पाणी पुरी खाल्ल्यावरच समजते तर अशा या पाणीपुरी ची टेस्ट तुम्हीही नक्की घेऊन बघा चला तर मग बघुया सोप्यात सोपी पाणीपुरी घरी कशा पद्धतीने बनवायची😋 Vandana Shelar -
पाणीपुरी फ्लेवर पाणी रगडा(Panipuri Ragda Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStory#पाणीपुरी#chefsmitsagarभारतातील प्रत्येक भागामध्ये आवडीने खाल्ला जाणारा स्ट्रीट फूड म्हणजे पाणीपुरी. आता भारतात नाही तर पूर्ण जगभरात प्रसिद्ध झालेले स्ट्रेट फूड आहे बाहेरच्या जगातही लोक तितक्याच आवडीने चटकारे घेऊन पाणीपुरीचा आस्वाद घेताना तुम्हाला दिसतील.आपल्याकडे लहानांपासून मोठ्या प्रौढांपर्यंत सगळ्यांना पाणीपुरी चे खूप आकर्षण आहे. सर्वात जास्त सोशल मीडियावर कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये सर्च झालेली रेसिपी म्हणजे पाणीपुरी जवळपास सगळ्यांनीच पाणीपुरी घरी ट्राय करून आणि तिचा आस्वाद घेतलेला आहे.भारतातील ही पाणीपुरी इतकी लोकप्रिय कशी आहे त्याचा थोडासा इतिहास जाणून घेऊ महाभारतात एका कथेनुसार जेव्हा द्रौपदी नवीन सून म्हणून घरात येते तेव्हा कुंती तिची परीक्षा घेण्यासाठी तिला उरलेली बटाट्याची भाजी आणि एकच पुरी होईल इतके पीठ देते आणि ती द्रोपतीला सांगते की पाची पांडवांना यातूनच जेवायला दे तेव्हा द्रोपती पाची पांडवांना पुरी आणि बटाट्याची भाजी टाकून पाणीपुरी तयार करते तेव्हा कुंतीला ला कळते की घरात कमी वस्तूमध्ये ही उपलब्ध असलेल्या वस्तूमध्ये ही द्रोपती भागू शकते. अशाप्रकारे नवीन वधू द्रौपदी ने पाणीपुरीचा शोध लावला असे सांगितले जाते.तेव्हा आताही पाणीपुरी घरात कशी तयार करायची हे आपण लॉकडाउनच्या काळात शिकलोच आहे शिवाय स्वच्छता राखून आपण स्ट्रीट फूड घरात तयार करू शकतोतर बघूया पाणीपुरीची रेसिपी यात पुरी मी बाहेरून आणलेली आहे आणि पाणी चे तीन फ्लेवर आणि रगडा घरी तयार केलेला आहे अशा प्रकारे स्ट्रीट फूड चा आनंद घरातच घेतला. Chetana Bhojak -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
पाणीपुरी म्हटलं की सुटलं ना तोंडाला पाणी रविवार म्हटलं की सर्व जण घरी ,मुलांची फरमाईश,आई काही तरी चटपटीत कर ग.... मग पाणीपुरी सारखं चटपटीत आहे का दुसरं काही... Smita Kiran Patil -
-
पाणीपुरी (Pani puri recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड मध्ये सगळ्यात आवडता सगळ्यांचा पदार्थ म्हणजे पाणीपुरी. आज मी मी चार प्रकारचे फ्लेवरचे पाणी बनवलेला आहे कैरी, हिंग, लसुन ,आणि खजूर आमचुर. खूप मस्त टेस्टी पाणी आहेत हे या फ्लेवर मध्ये तुमचे टेस्ट बर्ड्स एक्झाम एक्टिव होतील. इंदोर ला गेलं तर तुम्हाला दहा प्रकारच्या पाणीपुरीचं पाणी मिळेल तिथेच मी हे टेस्ट केलं होतं म्हणून रेसिपी शेअर करते. Deepali dake Kulkarni -
पाणीपुरी शॉट्स (pani puri shots recipe in marathi)
#KS8पाणीपुरी स्ट्रीट फूड चा विषय नि त्यात पाणीपुरी नाही असं तर अशक्य....☺️☺️ खाऊ गल्लीमध्ये जास्त गर्दी असलेलं खवय्यांच ठिकाण म्हणजे पाणीपुरी ठेला...😊😊 पाणीपुरी आवडत नसलेल्या व्यक्ती कमीच असतील, पण ज्यांना पाणीपुरी आवडते, अशा लोकंची तर काही गिनती नसेल नाही का....!! आजकाल तर बऱ्याच फ्लेवर आणि टेस्ट ची पाणीपुरी बाजारात मॉल मध्ये आणि खाऊ गल्ली मध्ये मिळते...पण खरी पाणी पुरी खाण्याची मजा तिखट आंबट गोड अशी नेहमीची पाणीपुरी खाण्यातच....चला तर मग रेसिपी बघुया...👍👍 Shital Siddhesh Raut -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#पाणीपुरी पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटायचं... कितीही पोट भरल असेल तरी ऑटोमॅटिक जागा होतेच पाणीपुरीसाठी आसावरी सावंत -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#पाणीपुरीपाणी पुरी म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.तर अशी ही चटपटीत पाणीपुरीची रेसिपी..... Supriya Thengadi -
#पाणीपुरी
पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी आलंच म्हणून समजा. आजच्या पिढीला तर पाणीपुरी म्हणजे स्वर्गसुखच म्हणायला लागेल. माझ्या मुलीलाही पाणीपुरी खायची खुप इच्छा झाली होती, मग काय बनविली घरी, तसं माझी मुलगी बाहेरची पाणीपुरी खायला अजिबात बघत नाही. मग तिला खायची इच्छा झाली की आहे मम्मी तिची इच्छा पूर्ण करायला.....मग काय अशी काय खादाडी करते की बस्स...मनसोक्त खाऊन घेते... Deepa Gad -
फायर पाणीपुरी
#पाणीपुरीपाणीपुरी एक असं चाटआहे की हे प्रत्येकालाच आवडतंप्रत्येक प्रांतात परत्वे प्रत्येक ठिकाणा परत्वे पाणीपुरी चे स्वरूप बदलत जाताना आपण बघतो प्रत्येक ठिकाणची पाणीपुरी अगदी ह्या गल्लीतली सोडून दुसर्या गल्लीत पाहिलं तरी त्याची चव आणि बनवण्याची पद्धत वेगवेगळ्या असतात त्याचप्रमाणे आज मी फायर पाणीपुरी या प्रकाराची पाणीपुरी बनवली आहे तिचे शौकीन आहे त्यांच्यासाठीही पौष्टिक व चटकाखास पाणीपुरी Shilpa Limbkar -
पाणीपुरी/गुपचुप/गोलगप्पे
#पाणीपुरीसध्याच्या lockdown मध्ये सर्वांना काहीतरी नवीन, चटपटीत पदार्थ हवे आहे.आणि त्यात पाणीपुरी म्हणजे माझी सर्वात आवडती डिश.कधीपण खाऊ शकते.बाहेर पाणीपुरी भेटणार नाही आणि खायची तर तीव्र इच्छा झाली.मग काय ठरवलं की ' हो जाए घर पर ही पाणीपुरी'.घेतल सर्व साहित्य आणि सुरू केली रेसिपीKshama Wattamwar
-
घरोंदा पाणीपुरी
#पाणीपुरी घरोंदा पाणीपुरी हे नाव एवढ्यासाठी दिलं की अगदी पुरी पासून गोड तिखट पाण्यापर्यंत सर्वकाही गोष्टी घरातच बनवल्या आहेत.आणि घरातल्या सगळ्यांची ही आवडती डिश असते. मुख्य म्हणजे लॉक डॉऊन आणि उन्हाळा यासाठी हा उत्तम ऑप्शन आहे. कारण भरपूर पाणी ही नेते व पोटाला हलका हीकाही आणि पाचही असा पदार्थ आहे. सारे हेतू साधले जातात धन्यवाद. Sanhita Kand -
पाणी पुरी शेव पुरी (pani puri sev puri recipe in marathi)
#GA4#WEEK26#Keyword_Panipuri "पाणी पुरी,शेव पुरी"कीवर्ड पाणीपुरी होता आणि आज माझ्या नात अकरा महिन्यांची झाली, त्यामुळे तिच्या birthday निमित्त आमच्या घरी पाणीपुरी, शेवपुरी,रगडा , गोड पाणी,तिखट पाणी ...नुसता सगळ्या घरभर धिंगाणा होता...आज सगळ्यांनी मनसोक्त ताव मारला..कारण घरी बनवलेले पदार्थ केव्हाही मस्त आणि चवदार,साफसुतरे असतात.. मला तर खुप मजा आली बनवायला आणि खायला सुद्धा... रेसिपी लिहीता ना किती साहित्य लिहू आणि किती फोटो पोस्ट करु असं झाले आहे.. तरीही मी अंदाजे आठवेल तसे लिहीते.. चला तर मग रेसिपी कडे.. लता धानापुने -
स्ट्रीट फूड पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
पाणीपुरी यम्मी नाव घेताच तोंडाला पाणी सुटले.लहान मुलांना पासून ते मोठ्या पर्यंत सर्वांना आवडणारी गोष्ट. :-) Anjita Mahajan -
-
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#wdपाणीपुरी माझ्या मुलीला म्हणजे माझ्या आयुष्यात स्पेशल व्यक्ती साठी डेडीकेट करत आहे. जिच्यामुळे मी आई झाले तिने मला पूर्ण केलं. तिच्यासाठी ही स्पेशल पाणीपुरी........ Purva Prasad Thosar -
पाणीपुरी (panipuri recipe in marathi)
पाणीपुरी हा पदार्थ स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे. भारता मध्ये पाणीपुरी हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे.पाणीपुरी या पदार्थाला काही ठिकाणी गुपचूप किंवा गोल-गप्पे म्हणतात.रवा, किंवा गव्हाच्या पिठा पासून डीप फ्राय केलेल्या गोल गोल पुऱ्या पेंड खजुराची चटणी, चिंचेची चटणी, शेव,बटाटे, पदिनाची चटणी यासोबत खाण्याची मजा काही और असते. rucha dachewar -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#GA4 #Week26 की वर्ड--पाणीपुरी..पाणीपुरी..बस नाम काफी है..पाणीपुरी जहाॅं खडी होती है..लाईन वहाॅं से शुरु होती है..बाबू मोशाय..जिंदगी और मौत तो उपरवाले के हाथ में है..लेकिन पानीपुरी खाना अपने हाथ में है..जब भी जी चाहें तब सूतना..😜..जहांपना..तुस्सी ग्रेट हो..पाणीपुरी का तोहफा कुबूल है..हर घडी बदल रही है रुप जिंदगी..लेकिन पाणीपुरी तू अब भी वही है.Sieze the day my friend..पहले पानीपुरी को पुरी तरह से enjoy करो..मेरे पास बंगला है,गाडी है..तुम्हारे पास क्या है..मेरे पास पानीपुरी है..😜😂..असे हे माझ्या favourite movies मधले अतरंगी dialogues जे मीच लिहलेत तेच पाणीपुरीचं नाव काढल्यावर माझ्या डोक्यात गरगर फिरु लागतात..😀😀..आणि त्या नादात पाणीपुरीवाल्याकडे जाऊनच मी पाणीपुरी खाते..कारण पाणीपुरी घरी करुन खायची गोष्ट नाही.🙈😝.पण पण तुम्हांला lockdown मधला पाणीपुरीचा trend आठवतो का..पाणीपुरी खायची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय काय पापड बेलने पडे सबको..नही नही पुरीयाॅं बेलनी पडी..😂..पण काहीही झाले तरी बेहत्तर असं म्हणत कित्येक मैत्रिणींनी साग्रसंगीत पाणीपुरीचा घरात घाट घातला आणि आत्माराम तृप्त केलाय महाराजा..आहात कुठं..अशी ही चटपटीत,चटकदार पाणीपुरी..मी मात्र त्यावेळेस विकतच्या पुर्या 10सेकंदासाठी microwave करुन घेतल्या. या कीवर्डच्या निमित्ताने जगलेल्या या आठवणी..काही काही वेळेस या आठवणीच वर्तमानकाळापेक्षा सुखद असतात..पण पाणीपुरीचं नाही असं..भूतकाळ, वर्तमानकाळ,भविष्यकाळ.यातीनहीकाळातकायम सुखदपसंतीस उतरलेली ही रेसिपी.आज मी माझी प्रिय मैत्रिण उज्जवला रांगणेकर हिची पाणीपुरी ही रेसिपी थोडाबदcooksnap केलीये.उज्जवला,एकच शब्द.जबरदस्त😍Thankyousomuch for Yummilicious recipe 😋❤️🌹💕 Bhagyashree Lele -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्र स्ट्रीट फूडपाणी पुरी सर्वांची आवडती. मुंबईतली पाणी पुरी लई भारी. मुंबईत गल्लो गल्ली पाणी पुरी, भेळ पुरी, दही पुरी अशा वेगवेगळ्या चाट च्या गाड्या असतात.त्यातली आमच्या सर्वांची आवडती पाणीपुरी. Shama Mangale -
पाणीपुरी (Pani Puri Recipe In Marathi)
#SCR स्ट्रीटफुड रेसीपी चॅलेंज , पाणीपुरीचा स्ट्रीटफुड मधे पहिला क्रमांक आहे ,पाणीपुरी आवडत नाही असे कोणि नसेल व कुठेही हमखास मिळते.कुठल्याही कार्यक्रमा मधे स्नॅक्स मध्येही ठेवतात. तेव्हा अशी चटपटीत पाणीपुरी करु या Shobha Deshmukh -
शेवपुरी (Sev puri recipe in marathi)
#SFRशेवपुरी,भेलपुरी,पाणीपुरी यांचं नाव जरी काढलं तरी तोंडाला आपोआप पाणी सुटते.हेच चाटणे प्रकार आपण घरी सुद्धा अगदी सहजरित्या बनवू शकतो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पिझ्झा पाणीपुरी
#पाणीपुरीपाणीपुरी म्हटलं की लहान काय मोठे काय सगळ्यांच्या च तोंडाला पाणी येतंच त्यात मुलांची तर फार च आवडती.माझी मुलं आता मोठीं झालीत न तर विकएंड डिमांड आली की आई पाणीपुरी जरा हटके खाऊ घाल की.मी ह्या डिमांड ला आव्हान म्हणून घेतले आणि काही नवीन करायचं ठरवले. आणि' पिझ्झा पाणीपुरी" बनवली😊 सध्या लॉकडाऊन मध्ये मुलांना पिझ्झा ची आठवण येत होती आणि पिझ्झा पाणीपुरी खायला मिळाली आनंदाचा बॉम्ब च फुटला घरात .मला आयडिया सार्थक झाल्याचं समाधान मिळाले.😍 Jayshree Bhawalkar -
पाणीपुरी खाकरा (Panipuri khakhra recipe in marathi)
#EB14#W14#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#पाणीपुरी_खाकरा गुजरात कडचा हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ.. खूप दिवस टिकण्यासाठी, प्रवासात घेऊन जाण्यासाठी म्हणून खाकरा चांगला कडक भाजतात. साधा खाकरा, मेथी खाकरा, जीरे खाकरा याबरोबरच अनेक चवीढवींचे खाकरे तयार केले जातात. छोट्या भुकेसाठी हा उत्तम पर्याय आहे. शिवाय पचायला ही हलका असल्यामुळे लहान, मोठी माणसे अगदी बिनधास्त खाऊ शकतात. चला तर मग चटपटीत पाणीपुरी खाकरा कसा तयार करायचा ते आपण पाहूया. Bhagyashree Lele -
रगडा पॅटीस (Ragada Pattice recipe in marathi)
#KS8#रगडा पॅटीसप्रत्येक खाऊ गल्लीत, कॉलेज कट्टा,चौपाटी कुठेही गरम गरम रगडा पॅटीस ,पाणी पुरी,शेवपुरी भेळ म्हणजे भूक असो नसो पोटात जागा होऊनच जाते.मी आज ब्रेकफास्ट ला रगडा पॅटीस केले,सर्व मंडळी खुश Rohini Deshkar -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#Week8लॉक डाऊन मध्ये सगळ्यात फेमस झालेला कॉफी चा प्रकार म्हणजे *डालगोना कॉफी* अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी व बनवता येणारी एकदम खास कॉफी... Shubhangi Dudhal-Pharande -
सिंधी पाणीपुरी शॉट्स
#पाणीपुरी लहाना पासून मोठया पर्यंत सगळ्याच्या तोंडाला पाणी आणणारा पदार्थ म्हणजे पाणीपुरी, माझ्या एका मैत्रिणीने शिकवलेली ही सिंधी पाणीपुरी आज मी तुम्हा सगळ्यांबरोबर शेयर करते. Sushma Shendarkar -
स्ट्रीट फूड पाणीपुरी (Street food panipuri recipe in marathi)
#SFRसंध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलो की खाण्यासाठी आवडती अशी ही डिश.परंतु आता बाहेर सारखीच अत्यंत रुचकर अशी ही पाणीपुरी घरी देखील करण्यासाठी सोपी.:-) Anjita Mahajan -
रगडा पॅटीस (Ragada Pattice recipe in marathi)
ठेल्यावरची पाणी पुरी, रगडा पुरी, शेव पुरी, ओली,सुकी भेळ, रगडा पॅटीस असे एक ना दोन असंख्य प्रकार .....आणि हे न आवडणारा माणूसच मिळणार नाही. नाव काढताच तोंडाला पाणी सुटणारे असे हे चटकदार पदार्थ....खावून पोट तर भरत नाही पण आनंद आणि समाधान , तृप्ती नक्की मिळते. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेवून आले आहे रगडा पॅटीसची रेसिपी.. Namita Patil -
होममेड पाणीपुरी
#पाणीपुरीपाणीपुरी ह्या नावानेच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं, हो ना!चला तर मग बघुयात!मोड आलेले कडधान्य वापरून मी ही पौष्टिक रेसिपी बनवली आहे.सोबतच पुरी आणि बुंदी सुद्धा घरीच तयार केली आहे. Priyanka Sudesh
More Recipes
टिप्पण्या