छोले टिक्की चाट (Chole tikki chaat recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#SFR
रस्त्यावर हातगाडीवर मिळणाऱ्या चटपटीत पदार्थांची चव काही वेगळीच असते नाही का😊
भारतात तर प्रत्येक शहरात वेगळे असे स्ट्रीट फुड मिळते आणि ते शहर त्या पदार्थामुळे ओळखले जाते. जस पुण्याची मीसळ 😊😋
आज बघुया ऊत्तर भारतात प्रसिद्ध अशी छोले टिक्की चाट.

छोले टिक्की चाट (Chole tikki chaat recipe in marathi)

#SFR
रस्त्यावर हातगाडीवर मिळणाऱ्या चटपटीत पदार्थांची चव काही वेगळीच असते नाही का😊
भारतात तर प्रत्येक शहरात वेगळे असे स्ट्रीट फुड मिळते आणि ते शहर त्या पदार्थामुळे ओळखले जाते. जस पुण्याची मीसळ 😊😋
आज बघुया ऊत्तर भारतात प्रसिद्ध अशी छोले टिक्की चाट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमरात्रभर भिजवून शिजवलेले छोले
  2. 1मोठी मसाला विलायची
  3. 2-3लवंग
  4. 4-5मीरे
  5. 2 टीस्पूनआललसुण पेस्ट
  6. 1हिरवी मिरची
  7. गरजेनुसार पाणी
  8. 1तेजपत्ता
  9. 4 टेबलस्पूनचींचेच पाणी
  10. 3 टेबलस्पूनगुळ
  11. 1 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनकश्मिरी लाल मिरचीपूड
  13. 1 टीस्पूनबेडगी मिरचीपूड
  14. 1 टेबलस्पूनधणे जीरेपुड
  15. 1/2 टीस्पूनधणे
  16. 1/4 टीस्पूनजीरे
  17. 4 टेबलस्पूनसाजुक तुप
  18. टिक्की बनवण्यासाठी
  19. 3मध्यम ऊकडलेले बटाटे
  20. गरजेनुसार मीठ
  21. 4 टेबलस्पूनकाॅर्नफ्लोर
  22. टिक्की शँलोफ्राय करण्यासाठी साजुक तुप
  23. सर्व्ह करताना
  24. 4 टेबलस्पूनदही
  25. 2 टेबलस्पूनपुदिना चटणी
  26. 2 टेबलस्पूनचींचेची चटणी
  27. बारिक चिरलेला कांदा
  28. कोथिंबीर
  29. बारिक शेव

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    प्रेशर कुकरमधे 1 टेबलस्पून साजुक तुप घालून तेजपत्ता,विलायची,मीरे,लवंग,जीरे,धणे घालून फोडणी करावी. आल लसुण पेस्ट घालून परतून धणे जीरे पावडर घालून परतून घ्यावे. शिजवलेले छोले घालून गरजेनुसार मीठ घालावे. लाल तिखट घालून थोड पाणी घालून 4-5 मिनिट छोले शिजवून घ्यावेत.

  2. 2

    आता शिजत आलेल्या छोल्यात चींचेचा कोळ व गुळ घालावा. 5-10 मिनिट छोले ऊकळवून घ्यावे.

  3. 3

    आता टिक्कीसाठी ऊकडलेल्या बटाट्यात मीठ व काॅर्नफ्लोर घालून मळून घ्यावे. टिक्कीचा शेप देऊन तव्यावर साजुक तुपावर टिक्की छान क्रीस्पी होइपर्यंत शँलोफ्राय करून घ्यावी.

  4. 4

    आपले छोले व टिक्की तयार आहे. आता खोलगट प्लेटमधे टिक्की ठेवून त्यावर तयार छोले घालावेत वरून हिरवी चटणी,चींचेची चटणी,थोडे दही,चिरलेला कांदा,कोथिंबीर व वरून बारिक शेव व चाट मसाला घालून गरमागरम छोले टिक्की चाट सर्व्ह करावी.

  5. 5

    गरम छोले,गरम टिक्की आणि वरून थंडगारदही आणि चटणी हे combination अफलातुन चविष्ट लागते.
    #SFR

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

Similar Recipes