ज्वारीची (मऊ लुसलुशीत) भाकरी(Jwarichi Bhakri Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

रोजच्या जेवणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या खाणं हे तब्येतीसाठी अतिशय चांगलं आहे.ज्वारी, बाजरी, तांदूळ ,नाचणी, मक्का इत्यादी प्रकारच्या भाकऱ्या आपण रोज करू शकतो आणि जेवणात विविधता आणू शकतो. आज पाहूया ज्वारीची लहानांपासून दात नसलेल्या म्हातार्‍यांना सुद्धा खाता येण्यासारखी मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
  1. 2पाट्या बारीक दळलेले ज्वारीचे पीठ
  2. 2 वाट्यापाणी
  3. 1/2 चमचामीठ
  4. 1/4 चमचासाजूक तूप

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम एका पॅनमध्ये दोन वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवावे ते कडकडीत गरम झाल्यावर त्यात मीठ आणि पाव चमचा साजूक तूप टाकावे आणि दोन वाट्या ज्वारीचे पीठ घालून नीट घोटून ठेवावे आणि दहा मिनिटे झाकून ठेवावे.

  2. 2

    दहा मिनिटानंतर परत ते पीठ खूप छान असे मळून घ्यावे आणि एका प्लास्टिकच्या कागदावरती नेहमीप्रमाणे कोरडे पीठ लावून पातळ अशी भाकरी लाटून घ्यावी. गरम लोखंडी तव्यावर भाकरी टाकून वरच्या बाजूने त्याला पाण्याचा स्प्रे करावा किंवा हाताने पाणी लावून घ्यावे आणि पाणी सुकत आल्यावर ती भाकरी उलटावी,दुसऱ्या बाजूने भाकरी व्यवस्थित भाजून होईपर्यंत आपण दुसरी भाकरी लाटू शकतो.

  3. 3

    भाकरी उलटल्यावर आपण दोन प्रकारे भाकरी भाजू शकतो एक म्हणजे कपड्याने दाबून दाबून ती व्यवस्थित फुगते किंवा जिथे पाणी लावलं होतं ती बाजू गॅसवर ठेवून सुद्धा भाकरी पटकन फुगते आणि तयार होते मऊ लुसलुशीत अशी ज्वारीची भाकरी कुठल्याही पालेभाजी बरोबर किंवा उसळी बरोबर गरम गरम सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes