ज्वारीची भाकरी (jwarichi bhakari recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#पश्चिम #महाराष्ट्र
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो अॅसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स,लोह मिळते तसेच पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपज्वारीचे पीठ
  2. 1/2 कपगरम पाणी
  3. 2-3 टेबल्स्पूनज्वारीचे पीठ (भाकरी थापण्यासाठी)

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    परातीमध्ये ज्वारीचे पीठ घेऊन त्यात हळूहळू गरम पाणी घालून गोळा नीट मळून घ्यावा(जर पिठ खूपच जुने असेल तर थोडेसे उडदाचे पीठ वापरावे याने पिठाला चिकटपणा येतो)

  2. 2

    बारीक गॅसवर तवा तापायला ठेवावा. पोलपाटावर खाली भाकरीचे पीठ घालून मळलेला एक गोळा ठेवून त्यावर थोडे पीठ घालून भाकरी थापून घ्यावी (भाकरी थापताना अशी काळजी घ्यावी की भाकरी पोलपाटाला चिकटली नाही पाहिजे आणि भाकरी जरा पोळी पेक्षा जास्त जाड असते)

  3. 3

    तवा तापला की अलगद हाताने उचलून भाकरी तव्यावर घाला मी वरून थोडेसे पाणी घालून भाकरीच्या कडा जोडून घ्याव्यात. (भाकरी टाकताना खालची बाजू वर आली पाहिजे आणि आपण थापलेली बाजू तळव्यावर गेली पाहिजे)

  4. 4

    भाकरीवरील भाग वाळल्यासारखा दिसल्यावर कॉर्नर उलटण्याने मोकळे करून भाकरी उलटून घ्यावी (उलटे थोड्या पाण्यात भिजवून घ्यावे) दुसरी बाजू भाजून झाल्यावर तवा काढून गॅसवर भाकरी टाकून भाजून घ्यावी आणि गरमागरम भाकरी सव्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes