कुरकुरा लच्छा पराठा (Lachha Paratha Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#PBR
पंजाबी डिशेस सर्वांनाच आवडतात . त्यांत जेवणामध्ये नित्य नियमाने कांही तरी नवीन असल्यास , सारेच आवडीने खातात . गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा , अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट लागतो .
त्याची कृती पाहू

कुरकुरा लच्छा पराठा (Lachha Paratha Recipe In Marathi)

#PBR
पंजाबी डिशेस सर्वांनाच आवडतात . त्यांत जेवणामध्ये नित्य नियमाने कांही तरी नवीन असल्यास , सारेच आवडीने खातात . गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा , अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट लागतो .
त्याची कृती पाहू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
1 व्यक्ती
  1. 1 वाटीगहू पीठ
  2. अडीच टेबलस्पून तूप
  3. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    गव्हाच्या पिठात मीठ व दीड टेबलस्पून तुपाचे मोहन टाका. पीठ छान चोळून एकजीव करा. त्यांत थोडे थोडे पाणी टाकत, दशम्याच्या कणके प्रमाणे घट्ट पण मऊ कणिक मळा. त्याला तुपाचा हात लावून 15 मिनिटे झाकून ठेवा.

  2. 2

    1टेबलस्पून तूप घेऊन त्यांत, दीड टीस्पून गव्हाचे पीठ टाकून, त्याचे साठे तयार करा.

  3. 3

    15 मिनिटानंतर कणकेची, थोडीशी मोठी लोय करा. त्याला गव्हाचे पीठ लावून, पातळ पोळी लाटा. पोळीवर गहू पीठ व तुपाच्या साठ्याचे ग्रीसिंग करा.
    सुरीने पोळीवर बारीक काप आखा. सुरीनेच हलक्या हाताने, त्याचा रोल करा.शेवटच्या कड्या हाताने दाबून, त्याची गोल लोय तयार करा. सगळ्या लोया तयार झाल्यावर, 15 मिनिटांसाठी उघड्याच ठेवा.

  4. 4

    सगळ्या लोया झाल्यानंतर, त्या पंधरा मिनिटांसाठी उघड्याच ठेवा, म्हणजे लच्छाला चांगले पदर सुटतील

  5. 5

    पोळपाटावर ठेवून दोन्ही हाताने हळुवारपणे दाबत, त्याची मोठी पोळी करा.
    गॅसवर तवा तापवा. त्याला थोड्याशा तुपाचे ग्रीसिंग करून, लाटलेली पोळी तव्यावर टाका. वरून तुपाची धार सोडून,. एक बाजू छान भाजा. ती झाली कीं, लच्छा, उलटून टाका. बाजूने तुपाची धार सोडा. दोन्ही बाजू खरपूस भाजून होऊ द्या, म्हणजे आतील पदर कच्चे राहणार नाहीत.

  6. 6

    आता खुसखुशीत लच्छा पराठा तयार !!
    गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes