मटार चीज ट्रॅंगल्स (Matar Cheese Triangle Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#MR

मटार चीज ट्रॅंगल्स (Matar Cheese Triangle Recipe In Marathi)

#MR

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ जणांसाठी
  1. 12ब्रेड स्लाईस
  2. 250ग्रॅम्स सोललेले मटार क्रश करून
  3. 1कांदा बारीक चिरून
  4. 1बटाटा किसून
  5. 100 ग्रॅमकिसलेले चीज
  6. 3हीरव्या मिरच्या बारीक चिरून
  7. 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  8. 2टे. स्पून किसलेले आल
  9. 2टे. स्पून तेल
  10. 1 टी स्पूनमिरी पावडर
  11. चवीनुसारमीठ
  12. हिरवी चटणी
  13. मैदा पेस्ट
  14. शॅलो फ्राय करण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम एका फ्राय पॅन मधे २ टे. स्पून तेल तापवले व त्यांत मिरची वआलं परतवले त्यावर कांदा परतवला व नंतर क्रश केलेले वाटाणे व किसलेला बटाटा घातला.

  2. 2

    नंतर त्यावर मिर पूड, चिली फ्लेक्स व मीठ घालून सर्व जिन्नस एकजीव करून घेतले. नंतर त्यांत किसलेले चीज घातले व परत सर्व एकजीव केले व थंड करून घेतले.

  3. 3

    नंतर ब्रेड स्लाईसच्या कडा कापून लावण्याने लाटून घेतल्या. नंतर त्यावर हिरवी चटणी लावली व
    मटारचे मिश्रण घातले ब्रेडच्या कडांना मैद्याच्या पेस्ट लावली व त्रिकोणी आकारात चिकटवून घेतले.

  4. 4

    नंतर फ्राय पॅन वर तेल सोडून तयार ट्रॅंगल्स दोनही बाजूने शॅलो फ्राय करून घेतले व टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

Similar Recipes