चीज राईस बाॅल/तांदूळाच्या पिठाचे पौष्टिक चीज बाॅल(cheese rice balls recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @cook_24194748

#तांदूळ रेसिपी- पौष्टिक आणि लहान मुलांना पण आवडेल अशी चटपटी डिश

चीज राईस बाॅल/तांदूळाच्या पिठाचे पौष्टिक चीज बाॅल(cheese rice balls recipe in marathi)

#तांदूळ रेसिपी- पौष्टिक आणि लहान मुलांना पण आवडेल अशी चटपटी डिश

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनट
3--4 सर्व्हिंग
  1. 2 वाटीतांदूळाचे पिठ
  2. 2 वाटीपाणी
  3. 1/2 वाटीगाजराच किस
  4. 1/2 वाटीबिटाचा किस
  5. 1/2 वाटीकांदापात चिरून
  6. 2चीज क्युब कट करून
  7. क्युब सव्हिं॔ग साठी
  8. 1 टीस्पूनआल, लहसुन, मिरची, (बारिक क्रश करून)
  9. 1/2 वाटीतेल
  10. चवीनुसारतिखट आणि मीठ
  11. आवडीनुसारटोमॅटो केचप, चिंचेची चटणी
  12. फोडणीसाठी जिरे, मोहरी

कुकिंग सूचना

15 मिनट
  1. 1

    पातेल्यात २ वाटी पाणी आणि मिठ घालुन गॅसवर ठेवून उकळी आणावी. गॅस बारिक करून तांदूळाचे पिठ घालून चांगले हलवुन घेणे. नंतर त्यामधे गाजर, बीट, कांदापात आल -लसुण आणि मिरचीची क्रश घालून चागले मिक्स करा.

  2. 2

    मिश्रण ताटात काढून एकसारखे करून घेणे. आणि नंतर छोटे बॉल बनवणे, बॉल बनवताना त्यात कट केलेले चीज क्युब स्टफ करणे.

  3. 3

    एका कढईत तेल गरम करून जिरे आणि मोहरी घालुन फोडणी तयार करणे फोडणी मध्ये लाल तिखट घालून तयार केलेले बॉल ॲड करून हलकेच लाल तळणे, डिप नाहि तळायचे.अगदिच कमी तेलात होते.

  4. 4

    बॉल हलकेच लाल झाले कि टोमॅटो केचप, चिंचेची चटणी घालून छान मिक्स करणे. नंतर थोडी कोथिंबीर आणि कांदापात घालून 2 मिनटात गॅस बंद करणे. प्लेट मध्ये घेउन वरून चीज किसून सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @cook_24194748
रोजी

टिप्पण्या (8)

Similar Recipes