चंदन बटव्याचं (बथुवा) धिरडं - हिवाळा स्पेशल

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#विंटर
चंदन बटवा (बथुवा) ही हिवाळ्यात मिळणारी अतिशय पौष्टिक आणि टेस्टी भाजी आहे. ही भाजी घालून मी धिरडी करते. थंडीत गरमागरम पौष्टीक चविष्ट धिरडी सकाळच्या / दुपारच्या नाश्त्याला करायला एक वेगळा पर्याय आहे.
ही माझी स्वतः ची रेसिपी आहे. सर्व साधारणपणे आपण धिरड्यात बेसन घालतो - टोमॅटो ऑम्लेट, भाज्यांचं ऑम्लेट बनवतो. मी ह्यात कणिक आणि रवा घालते. कधी शिळ्या पोळ्या उरल्या असतील तर त्या मिक्सर मध्ये सरसरीत वाटून घालते. त्यामुळे धिरडं छान लुसलुशीत होतं. बेसनाच्या धिरड्यासारखं दडदडीत होत नाही. ह्यात चंदन बटव्याची पानं बारीक चिरून घातली आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. २ कप चिरलेली चंदन बटव्याची पानं
  2. दीड कप कणिक
  3. २ मोठे चमचे बारीक रवा
  4. २ मोठे चमचेदही / चिंचेचा कोळ अर्धा चमचा
  5. अर्धा चमचा ठेचलेल्या मिरच्या
  6. ६-७ पाकळ्यालसूण बारीक चिरून
  7. अर्धा चमचा हळद
  8. अर्धा चमचा ओवा
  9. मीठ चवीनुसार
  10. १ चमचा काळे / पांढरे तीळ
  11. तेल / तूप भाजण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    चंदन बटव्याची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.

  2. 2

    एका वाडग्यात चिरलेली पानं आणि सगळे साहित्य घाला (तूप / तेल वगळून) आणि एकत्र करा.

  3. 3

    जरूर पडल्यास पाणी घालून इडली च्या पिठासारखं भिजवून घ्या.

  4. 4

    एक नॉन स्टीक तवा गरम करा.

  5. 5

    तव्यावर पाणी शिंपडून २ डाव पीठ घाला. हाताला थोडे पाणी लावून पीठ तव्यावर एकसारखं पसरा.

  6. 6

    झाकण ठेऊन २-३ मिनिटे भाजा. नंतर थोडे तेल/तूप घाला व धिरडं परता.

  7. 7

    दुसरी बाजूही भाजून घ्या.

  8. 8

    स्वादिष्ट आणि पौष्टिक चंदन बटव्याचं धिरडं तयार आहे. लोणी आणि चटणी बरोबर खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes