हिरव्या मसाल्यातलं कोलंबीचं कालवण

हिरवा मसाला म्हणजे नैसगिर्क चवीचं भांडार.ताजी कोलंबी हिरव्या मसाल्यात तिची चव खुलवते.हिरव्या मिरच्या,आले ,लसूण आणि कोथिंबीर इतकाच हिरवा मसाला एकदम चवदार असतो,पण जोडीला कांदापात घालून उत्तम चवबदल होतो.शंका वाटत असली तर ही पाककृती करूनच पहा.एकदा केलीत तर पुन्हा पुन्हा कराल.
हिरव्या मसाल्यातलं कोलंबीचं कालवण
हिरवा मसाला म्हणजे नैसगिर्क चवीचं भांडार.ताजी कोलंबी हिरव्या मसाल्यात तिची चव खुलवते.हिरव्या मिरच्या,आले ,लसूण आणि कोथिंबीर इतकाच हिरवा मसाला एकदम चवदार असतो,पण जोडीला कांदापात घालून उत्तम चवबदल होतो.शंका वाटत असली तर ही पाककृती करूनच पहा.एकदा केलीत तर पुन्हा पुन्हा कराल.
कुकिंग सूचना
- 1
कोलंबी सोलून,काळा दोरा काढून,धुवून,निथळून घ्या.
- 2
लिंबाचा रस काढा आणिहिरव्या मिरच्या,कोथिंबीर, कांदापात, लसूणपाकळ्या, आले,लिबाचा रस घालून मुलायम वाटून घ्या.
- 3
पातेल्यात तेल गरम करून वाटण घालून परता.कोलंबी घालून परता.हवे तेव्हढे पाणी घालून पातळ करा.
- 4
उकळी आली मीठ घालून पाच मिनिटे उकळू द्या.गॅस बंद करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हिरव्या मसल्यातली चवळीच्या ओल्या शेंगातील दाण्यांची भाजी
#लोकडाऊन रेसिपीहिरवा मसाला म्हणजे निसर्गाचे ताजे वरदान आहे.बाकी कुठलेही मसाले न वापरता नुसत्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आले आणि लसूण इतकाच मसाला वापरून अतिशय स्वादिष्ट पदार्थ बनवता येतात.ताज्या भाज्या आणि विशेषतः कोणत्याही ओल्या दाण्यांसोबत हा मसाला इतका छान एकरूप होतो आणि आपल्या रंगात, चवीत भाजीला बुडवून काढतो. जोडीला पुदिना, कांदापात, लसूण पात,किंवा पालक असेल तर चवबदल आणि रंगबदल मिळतो. इतकंच काय पण कांदा,लसूण वापरायचा नसेल तेव्हाही हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आणि आले वापरूनही बहार येते.ही घ्या पाककृती. नूतन सावंत -
-
-
गोयंचे पापलेट कॅफ्रीअल
#सीफूड फिश करी . कॅफ्रीअल हा हिरवा मसाला बनवून त्यामध्ये चिकन बनवतात. पोर्तुगिजच्या काळात सैनिका ना द्यायला हा पदार्थ बनवला जायचा. #सीफूड. कॅफ्रीअल मसाला मध्ये रम व व्हिनेगर वापरतात. परंतु माझ्या रेसिपीमध्ये लिंबूरस वापरला आहे. Swayampak by Tanaya -
-
हिरव्या वाटणातले बोंबील फ्राय
#सीफूड मासे म्हणजे जीव की प्राण.....खाल्ल्यानंतर रसना एकदम तृप्तच!!!! Vrushali Patil Gawand -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_Challenge#ओल्या_नारळाची_चटणी.. थंडीच्या दिवसांमध्ये हिरव्या पातीचा लसूण अगदी ठराविक काळापुरता बाजारात मिळतो. उंधियु मध्ये हिरव्या पातीचा लसूण वापरतोच आपण.. त्याचप्रमाणे आमटी ,भाजी, पराठे ,चटण्या यामध्ये देखील हिरव्या पातीचा लसूण मुबलक प्रमाणात वापरुन या हिरव्या पातीचा मी मनसोक्त आनंद लुटते.. एवढेच नव्हे तर हिरव्या पातीचा लसूण ,आलं, मिरच्या, खडेमीठ, थोडसं तेल यांचं वाटण करून फ्रीजरमध्ये ठेवून पातीच्या लसणाचा सिझन नसतानासुद्धा याची चव चाखते.. अगदीच काही नाही तर मी हे वाटण चटणी म्हणून पोळी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकते..😀 back to the point.. ओल्या नारळाची चटणी..😀 आज आपण ओला नारळ ,पुदिना, कोथिंबीर हिरव्या पातीचा लसूण, थोडी चिंच ,आलं ,जीरे ,मीठ, साखर किंवा गूळ घालून चटपटीत तोंडी लावणे अर्थात पानातील डाव्या बाजूची चटणी करू या.. ही चटणी इतकी अफलातून लागते की तुम्हाला पोटात चार घास जास्त जाणारच याची पक्की गॅरंटी..😀 त्यामुळे थंडीच्या दिवसात हे निसर्गाचं देणं घरी आणून diet थोडं बाजूला ठेवून (कारण चार घास जास्त खाणार ना 😜) चटणी कराच आणि गरमागरम पोळी,फुलका,भाकरी,भात,खिचडीबरोबर या चटणीचा मनसोक्त आनंद घ्या आणि डोळे बंद करुन या सुखाची अनुभूती अनुभवा..मग आपसूकच तुमच्या तोंडून उमटेल..."अन्नदाता सुखी भव "🙏🙏 Bhagyashree Lele -
कारल्याची भाजी
#लॉकडाऊनकडू रस पोटात जावा म्हणून देवाने कारल्याची निर्मिती केली,पण सगळ्या सुगरणी मात्र त्याचा कडूप अ काढून टाकायच्या प्रयत्नात असतात. कितीही तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कारलं कडू ते कडूच राहतं.पण या पद्धतीने केलेली कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही. तिच्या रूपावर जाऊ नका.ही ब्लॅक ब्युटी ताटात असली की जेवणाऱ्या मंडळींचे चेहरे जसे काही खुलतात की बस्स!पहाच तर करून.थोडा वेळ काढून करा मात्र.घ्या साहित्य जमवायला. नूतन सावंत -
हिरव्या मुगाचे कढण/ आमटी (moong amti recipe in marathi)
आरोग्यासाठी अतिशय उत्तम अशी पाककृती, ज्यांना मुगाची भाजी आवडत नाही त्यांनी अशाप्रकारे नक्कीच कढण बनवा. Prajakta Patil -
खमंग मिरची (khamang mirchi recipe in marathi)
आम्ही मंडळी खुप मिरच्या खाऊ! हिरव्या मिरची शिवायचे जेवण आम्हाला जेवणच वाटत नाही.घरी आम्ही इनमिन दोन माणसे पण मिरची खरेदी पाव किलो तरी असतेच.असाच आज एक तोंडी लावायला एक प्रकार केला तो शेअर करतेय. Pragati Hakim -
मटार उसळ (हिरव्या मसाल्याची) (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये सर्वत्र हिरवे मटार दिसतात. मी तर वर्षाचा हिरवा मटार फ्रीजमध्ये भरूनच ठेवते. मटार हे कॉम्बिनेशन मध्ये कुठल्याही भाजीबरोबर खूप छान मिक्स होतात. त्यामुळे घरात मटार असले की आयत्या वेळेला पदार्थ करायला खूप सोपे पडते. मटार उसळ आपण पारंपरिक पद्धतीने तर करतोच पण फक्त हिरवा मसाला वापरून केलेली मटार उसळ ही खूपच टेस्टी लागते. या हिरव्या मसाल्यामध्ये कोथिंबीर, आलं लसूण, मिरची आणि जीरे एवढेच पदार्थ वापरून मटारच्या भाजीला अप्रतिम चव आणता येते. तुम्हाला आवडत असेल तर यात कांदा ही वापरता येतो पण मी आजची रेसिपी ही कांदा न घालता दाखवलेली आहे.Pradnya Purandare
-
हिरव्या लसूनाची चटणी / पातीचा लसूण (paaticha lasoon chutney recipe in marathi)
#GA4#week4#chatneyहिरव्या लसूनाला थोडी सौम्य आणि वेगळी चव असते. ही चटणी सँडविच ,ज्वारी भाकरी ,बाजरी भाकरी, समोसा, पकोडा ,रगडा पॅटीस, दही वडा , आलू टिक्की सोबत खाता येते.या चटणी मध्ये हिरवा लसूण हा मुख्य घटक आहे. तो भाजी बाजारात मिळेल मी घरीच कुंडीत लावला. Mangala Bhamburkar -
-
कढीगोळे तुरीच्या दाण्याचे (kadi gole toorichya danyachi recipe in marathi)
#winter recipes ... हिवाळा आला की सगळीकडे हिरवेगार... हिरवा पालेभाज्या, हिरव्या शेंगा, हिरवे दाणे, हिरवा लसूण, हिरवी पात... अशाच वातावरणात, हिरव्या ओल्या तुरीच्या दाण्याचे कढी गोळे, सोबत गरम भाकरी आणि हिरवी मेथी आणि पातीचा कांदा, सोबत हिरवी मिरची... अगदी गावाकडील जेवण.... भरपेट होणारच.. Varsha Ingole Bele -
मटार मसाला
#लॉकडाऊन पाककृतीमला दिल्ली मटार आवडत नाही,सासवड मटार चवीला अतिशय सुरेख लागतो. श्रवण,गणपती,दसरा,दिवाळी आणि डिसेंम्बर मध्येच हा मिळतो.मिळाला की मी दहा किलो आणून, सोलून ,हवाबंद डब्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवते.वर्षभर सहज टिकतो.मग हवी तेव्हहा भाजी करता येते.याला भाजलेलं वाटप लावून भाजी थोडी थपथपीत केली की,भातासोबतही खाऊ शकतो.या दिवसात पुरवठ्याची म्हणून उत्तम पाककृती.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
कोथिंबीरीची कुरकुरीत चटणी (kothimbirichi chutney recipe in marathi)
सध्या बाजारात भरपूर प्रमाणात कोथिंबीर येतेय.सगळ्या प्रकारच्या वड्या, चटण्या करून झाल्या.खाद्य पदार्थातील कोथिंबीर, काळे मीठ, हिरव्या मिरच्या, लसूण हे माझे आवडते पदार्थ!त्याचा वापर करून जे जे करता येईल ते करते.असाच एक पदार्थ म्हणजे कोथिंबीरीची कुरकुरीत चटणी!जी माझ्या मावस बहीणी कडून मी शिकले आणि आमच्या घरात सर्वांची लाडकी झाली.क्रुतीखालील प्रमाणे: Pragati Hakim -
कोथिंबीर चिवडा (kothimbir chivda recipe in marathi)
हिवाळ्यात बाजारात भरपूर प्रमाणात कोथिंबीर येते मी कोथिंबीर घालून चिवडा तो खूप छान लागतो.हळद घालायची नाही.लाल शेंगदाणे, पिवळ्या डाळ्या, हिरव्या मिरच्या, कढिपत्ता, खोबरे, काजू, भरपूर कोथिंबीर मस्त रंगसंगती आणि चटकदार चव! Pragati Hakim -
अळवाची देठी
अळूवड्या केल्या की अळवाच्या देठीचे भरीत केले जाते,किंवा भाजीचा अळू आणला असेल तर त्यात भर घातली जाते.पण खूप लोक फक्त पाने घेऊन जातात,देठ भाजीवाल्यांकडे सोडून जातात आणि असे देठ भाजीवाले फेकून देतात.पण मी थोडे पैसे देऊन असे देठही विकत आणते.कारण यात पोटॅशियम, आयर्न, झिंक,कॉपर, मॅग्नेशियम असे पानात असलेले विशेष तर असतातच पण भरपूर चोथा असतो,त्यामुळे तंदुरुस्त राहायला मदत होते.माझी आईही यांची भाजी करीत असे.वडीच्या पानांचे हे देठ चांगले भरगच्च असतात.बोटाइतक्या जाडीचे हे देठ सोलून, बारीक कापून घ्यायचे.आता त्यात कोणतेही कडधान्य, मक्याचे दाणे, कोलंबी, करंदी,सोडे घालून यांची मस्त चवदार भाजी होते.पण कालभैरवाचा सप्ताह सुरू असल्याने नॉनव्हेज करायचे नसल्याने, मी मक्याचे दाणे घालून केली आहे.गरमागरम भातासोबत चवीला तर भन्नाटच लागते.सोबत फक्त पापड आणि लोणचे असले तर पुरे,नसले तरी काही बिघडत नाही.ही भाजी दोन प्रकारने करता येते.कच्चे वाटण लावून पहिला प्रकार आणि भाजलेले गरम मसाल्याचे वाटण लावून दुसरा प्रकार.मला कच्च्या वाटणाची आवडते म्हणून मी आज तशीच केलीय.आता वड्या केल्यावर देठांची भाजी नक्की करून पाहा.पाककृती मी देते तुम्हला. नूतन सावंत -
भंडारी पद्धतीचे कवटाचे कालवण.(अंड्याचे कालवण) (andayche kalwan recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी हवेत गरमागरम जेवणाची चव काय वर्णावी?माझ्यासारख्या गरम गरम जेवायला आवडणाऱ्या आणि एरवी थंड जेवण घेणाऱ्यानाही पावसाळ्यात गरम जेवणाची ऊब हवीहवीशी वाटतेच.या काळात मासे मिळत नसल्याने खायच्या वारी सुक बाजार किंवा अंडी,कोंबडी यावर भर दिला जातो.त्यातून या थंड हवेत उष्ण पदार्थ खायचे म्हणजे आतूनही ऊब राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते.म्हणून माझी आई खास पावसाळा आणि थंडीत आवर्जून हे गरम मसाल्याचे कालवण, ताजा मसाला वाटून ,तोही पाट्यावर वाटून करत असे. कवटं म्हणजे अंडी तर घरचीच असत.त्यामुळे ताजी असत.चटकन होणारे हे कालवण उकळू लागले की त्या पावसाळी हवेत असा खमंग दरवळ पसरत असे की,कधी एकदा जेवायला बसतो असं व्हायचं.अंडी उकडून ग्रेव्हीत सोडणे ही पद्धत उत्तरेकडे तशीच दक्षिणेकडेही दिसते,पण अंडी फोडून डायरेक्ट उकळत्या कलवणाच्या कढात सोडणं आणि शिजवणं ही मात्र अस्सल कोकणी पद्धत. सवय नसेल किंवा अंडी ताजी नसतील तर एक एक अंडे फोडून वाटीत घेऊन मग कढात सोडायचं नाहीतर डायरेक्ट कलवणातच अंडं फोडून सोडायचं,जसं हाफ फ्रायसाठी तव्यावर फोडतो तसं.उकळत्या कढात सोडल्यामुळे अंडं लगेच शिजू लागून सेट होतं आणि मसाला आतपर्यंत मुरतो.त्यामुळे अंड्यालाही झकास चव लागते.दुसरं म्हणजे अंडं फोडताना थो s डीशी काळजी घेतली पाहिजे कारण पिवळा बलक अखंड राहिला पाहिजे,म्हणजे तो छान गोलकारातच सेट होतो,नाहीतर त्याच्या चिंध्या चिंध्या होतात.म्हणजे चव काही बिघडत नाही पण दिसायला बरं नाही दिसत,इतकंच.मीही कधी कधी पाट्यावर वाटून हे कालवण करते.तेव्हा आईच्या आठवणीनी ते जास्तच चवदार लागतं.चला तर, घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#मटार_उसळ हिवाळ्यात बाजारात सर्वत्र ताजा ताजा हिरवा मटार दाखल होतो..आपण सगळे त्या हिरव्या राशींच्या मोहात नकळत पडतोच हे काही नव्याने सांगायला नको..😀 आणि हिरवा मटार आपल्या स्वयंपाकघरात दिमाखात पावले टाकत विराजमान होतो...आणि मग सुरु होतो मटार महोत्सव.. एक से एक भारी ,खमंग मटार रेसिपीज शिजून आपल्या ताटात समोर येतात तेव्हां..वाह..क्या बात है..😋 असं म्हणत आपण त्यावर अगदी तुटून पडतो..😀काय करणार खाण्यासाठी जन्म आपुला हे ब्रीदच आहे आपलं...😂 याच मटार महोत्सवातील बिना कांदा लसणाची मटार उसळ म्हणजे माझ्यासाठी एक खमंग चविष्ट celebration च जणू...🤩जास्त तामझाम करावा लागत नाही या चवदार मटार उसळीला..चला तर मग सुरु करुया या मटार महोत्सवाच्या खमंग celebration ला..😋 Bhagyashree Lele -
तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi)
#HV हिवाळ्यात सगळ्याच भाज्यांची भारी मज्जा असते. हिरव्या कंच तुरी, हिरवा वाटाणा, लिंबू, गाजर आणि बरेच काही... Priya Lekurwale -
हिरव्या पातीच्या लसणाची हिरवी चटणी (HIRWYA PATICHYA LASNACHI CHUTNEY RECIPE IN MARATHI)
#GA4#week24#Garlic#चटणीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Garlic हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ही रेसिपी मी माझ्या बेस्ट फ्रेंड कडून शिकून घेतली आहे ती हिवाळ्यात अशा प्रकारची चटणी बनवून डीप फ्रीज मध्ये प्रिझर्व करून ठेवते आणि वर्षभर वापरते. हिवाळ्यात बाजारात आपल्याला हिरव्या पातीचा लसण भरपूर प्रमाणात मिळते. ह्या लसणाचा उपयोग करून उँदियो, वांग्याचे भरीत बऱ्याच भाज्यांमध्ये बारीक कट करून लसणाच्या जागी हिरव्या पातीचा लसूण वापरून या दिवसात आहारात घेतला जातो. हिवाळ्यात याचा वापर भरपूर प्रमाणात केलाच पाहिजे त्यानंतर आपल्याला हा बाजारात मिळत नाहीवर्षभर आपण गाठीचे लसो वापरतो . अशा प्रकारची चटणी आपण फ्रिजमध्ये तयार करून ठेवू शकतो बऱ्याच महिनेही टिकते फक्त डिपफ्रिज मधे ठेवायचीही चटणी सँडविच ,बऱ्याच प्रकारचे चाट, पराठे ,भेळ बरोबर आपण खाऊ शकतो किंवा भाजी करताना या चटणीचा ही उपयोग करू शकतो. तर बघूया हिरव्या पातीचा लसणाची चटणी ची रेसिपी Chetana Bhojak -
भरलेली मिरची (bharleli mirchi recipe in marathi)
#ngnr या हिरव्या श्रावणात मोठ्या लांब मिरच्या पण आपली अधिक भर घालत असतात... या मिरच्यांमध्ये अनेक प्रकारचे सारण भरून श्रावणातील जेवणाची लज्जत वाढवतात.... Nilesh Hire -
लसुण मिरची चटणी (lasun mirchi chutney recipe in marathi)
#GA4#week24#keyword_GarlicGarlic/लसुण अतिशय गुणवर्धक आहे. आहारात याचा वापर असणे गरजेचेच आहे आपण फोडणीत तर लसुण वापरतो पण अगदी ताजा हिरव्या पातीचा लसुण वापरून ही चटणी केलीत तर जेवणाची लज्जत आणखी वाढते.... Shweta Khode Thengadi -
वेर्लीचे मालवणी कालवण
वेर्ली ही मच्छी मुळातच चविष्ट आणि त्याचं मालवणी पद्धतीने केलेला कालवणं म्हणजे दोन घास भात नक्कीच जास्त जाणार. तर चविष्ट असे वेर्लीचे कालवण आपण आता बघूया. Anushri Pai -
कांदेपोहे (kandepohe recipe in marathi)
#फोटोग्राफी आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोsssssहे... पोहे म्हणजे आपला हुकमाचा एक्काच !!!! ऐनवेळी आलेल्या पाहुण्यांसाठी अतिशय नजाकतीने पोहे करुन त्यांना खिलवणे...आणि त्यांच्याकडून पसंतीची पावती मिळवणे..यात हातखंडाच आपला 😄😄..हो ,मी नजाकतीने हा शब्द मुद्दाम वापरलाय😜 कारण पोहे भिजवण्यापासूनची कला आली बरं यात..बरोबरीने कांदे,बटाटे,मिरच्या चिरण्याचे पण तंत्र आहेच😀...आणि हो खमंग फोडणीला कसं विसरुन चालेल..😜आत्माच तो पोह्यांचा..जिला खमंग फोडणी जमली तिने जिंकलंच सगळं...असो..सोबतीला मीठ,साखरेची पेरणी केव्हां,कशी करावी याचं पण शास्त्र असतं ..🤩शेवटी कोथिंबीर चिरण्याची कला...कशीही उगा भसाभसा चिरुन गुरांसमोर टाकलेल्या चार्यासारखी नकोच नको..😝 हीच ती नजाकत😍😍 तर मंडळी वाफेवरचे मऊ लुसलुशीत पिवळेधम्मक पोहे,त्यावर ओल्या खोबर्याची चांदणंपखरण,हिरव्याकंच कोथिंबीरीची नक्षी,तळलेल्या शेंगदाण्यांची उधळण,रतलामी शेव किंवा गेला बाजार कुठलीही शेव,सोबत लिंबाची( बिया काढून टाकलेली) फोड या सगळ्यांचच एकमेकांशी कसं अतूट,खमंग,जिव्हाळ्याचं नातं आहे ना😍😍असंच असावं आयुष्य😍 या अशा सोप्प्या ,लहानश्या पदार्थातूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे..म्हणूनच तर कदाचित #कांदेपोह्यांचा_कार्यक्रम करत असावेत 😊😊..जिला हे सर्व बारकावे नीट उमगले ती सगळ्यांचेच नेत्र,जिव्हां,मने तृप्त करणारच🥰...आणि मग ती या परीक्षेत पास झालीच म्हणून समजा😊🥰...कारण म्हणतात ना.. हृदयापर्यंत पोहोचायचा मार्ग पोटातूनच जातो...दोन जीवांना जोडणारा दुवा..त्यांच्यातील सख्य...असे हे कांदे पोहे... Bhagyashree Lele -
ओल्या जवळ्याची भजी
#सीफूडओला जवळा म्हणजे कोलीम, बारीक कोलंबी,हा ओला जवळा कांदा, लसूण घालून सुखा ही करता येतो, किंवा त्याचे पोळे, किंवा बेसन तांदळाची पीठ घालून मी बनवली ती भजी, मस्त कुरकुरीत, छान होते. तर पाहूया ह्याची पाककृती. Shilpa Wani -
फरसबी+मोडची मटकी भाजी (farasbi ani mataki mix bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकरेसिपीजकमीत कमी साहित्यात,आपल्या विशिष्ट चवीने अतिशय चवदार बनणारी भाजी, म्हणजे फरसबी आणि मोडची मटकीची युती.जेव्हा कांदा लसूण खायचं नसतो तेव्हा फक्त मिरची किंवा मिरची+आलं ठेचा वापरून करता येणारी, आणि ताटात इतर कितीही टक्कर देणारे पदार्थ असले तरीही आपले वैशिष्ट्य जपून बाजी मारणारी.एकदा जिभेला चव लागली की,पुन्हापुन्हा खावीशी वाटणारी.कधी अचानक पाहुणे आलर तरी साहित्य असलं की दहा मिनिटात होणारी भाजी आहे ही. शिवाय तुमचं हमखास कौतुक करणारीमटकी वातुळ असल्याने मी आलं वापरते,पण नसलंच हाताशी तरी नुसत्या मिरच्या वाटून घातल्या तरी चालतात,चव अबाधित राहते. नुसतीच बशीत घालून खायलाही झकास लागते.या भाजीसोबत भाजणीचे वडे तर भन्नाटच लागत,पण वरण भात,पोळी, पुरी,फुलकेही चविष्ट जेवल्याचं समाधान देतात.थोडी मिरची कमी वापरून केली तर परदेशी पाहुणेही ही मटकी,मिटक्या मारत संपवतात.चला तर,घ्या साहित्य जमवायला नूतन सावंत -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya narlachya karanjya recipe in marathi)
#चंद्रकोर#रेसिपीबुक #week6पारंपरिक पाकृतीवरून भौमितिक आकार आले की, भौमितिक आकारांवरून पक्वान्नांचे आकार ठरले.हा विचार मला नेहमी सतावतो.पण लाडूंचे वर्तुळाकार, वड्याचे,शंकरपाळ्यांचे चौकोनी किंवा समद्विभुज आकार.करंज्यांचे अरवर्तुळाकार आकार पाहिले की हा प्रश्न नेहमीच मनात येतो.तरीही ज्या कोणी आद्य रांधपिणीने पहिल्यांदा करंज्या केल्या असतील त्यादिवशी नक्कीच अष्टमी असली पाहिजे.आणि ती अष्टमीची चंद्रकोर पाहून तिला करंजीचा आकार तसाच ठेवण्याची कल्पना सुचली असली पाहिजे,असं मला नेहमी वाटतं.करंज्यांची पाककृती सगळ्याच माहीत असेलच पण तरीही कोणा चुकल्यामाकल्या हौशी बल्लवासाठी ही पाककृती देत आहे नूतन सावंत -
मटार बटाटा पोहे
#किड्समुलांना रंगीबेरंगी पाककृती नेहमीच आकर्षित करतात, त्यामुळे मुलांसाठी पाककृती बनवताना वेवेगल्या रंगाचा वापर केला पाहिजे.पोहे हा लहान म्गउलांसाठी उत्तम पर्याय आहे पचनाला हलके आणि ताकदीला उत्तम .पोहे वेगळ्या भाज्या घालून बनवले तर फुल मील डिश होऊ शकते.म्धीतर,सोलणे ,गाजर,फ्लॉवर,ब्रोकोली आशा भाज्या पोह्यांची रंगत आणि चव वाढवतात. नेहमीच्या जेवणाऐवजी असे पोहे केले तर मुलांना आवडतं आणि तुम्हाला पण आराम,शिवाय तुम्ही मुलांना Qweality Time देऊ शकता ते वेगळेच.ओलं खोबरं आणि कोथिंबीर सढळ हाताने वापरा.पोह्यांचा चट्टामट्टा कधी होईल ते समजनारही नाही. नूतन सावंत
More Recipes
टिप्पण्या