कांदेपोहे (kandepohe recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#फोटोग्राफी आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोsssssहे... पोहे म्हणजे आपला हुकमाचा एक्काच !!!! ऐनवेळी आलेल्या पाहुण्यांसाठी अतिशय नजाकतीने पोहे करुन त्यांना खिलवणे...आणि त्यांच्याकडून पसंतीची पावती मिळवणे..यात हातखंडाच आपला 😄😄..‌हो ,मी नजाकतीने हा शब्द मुद्दाम वापरलाय😜 कारण पोहे भिजवण्यापासूनची कला आली बरं यात..बरोबरीने कांदे,बटाटे,मिरच्या चिरण्याचे पण तंत्र आहेच😀...आणि हो खमंग फोडणीला कसं विसरुन चालेल..😜आत्माच तो पोह्यांचा..जिला खमंग फोडणी जमली तिने जिंकलंच सगळं...असो..सोबतीला मीठ,साखरेची पेरणी केव्हां,कशी करावी याचं पण शास्त्र असतं ..🤩शेवटी कोथिंबीर चिरण्याची कला...कशीही उगा भसाभसा चिरुन गुरांसमोर टाकलेल्या चार्यासारखी नकोच नको..😝 हीच ती नजाकत😍😍
तर मंडळी वाफेवरचे मऊ लुसलुशीत पिवळेधम्मक पोहे,त्यावर ओल्या खोबर्याची चांदणंपखरण,हिरव्याकंच कोथिंबीरीची नक्षी,तळलेल्या शेंगदाण्यांची उधळण,रतलामी शेव किंवा गेला बाजार कुठलीही शेव,सोबत लिंबाची( बिया काढून टाकलेली) फोड‌‌ या सगळ्यांचच एकमेकांशी कसं अतूट,खमंग,जिव्हाळ्याचं नातं आहे ना😍😍असंच असावं आयुष्य😍
या अशा सोप्प्या ,लहानश्या पदार्थातूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे..म्हणूनच तर कदाचित #कांदेपोह्यांचा_कार्यक्रम करत असावेत 😊😊..जिला हे सर्व बारकावे नीट उमगले ती सगळ्यांचेच नेत्र,जिव्हां,मने तृप्त करणारच🥰...आणि मग ती या परीक्षेत पास झालीच म्हणून समजा😊🥰...कारण म्हणतात ना.. हृदयापर्यंत पोहोचायचा मार्ग पोटातूनच जातो...दोन जीवांना जोडणारा दुवा..त्यांच्यातील सख्य...असे हे कांदे पोहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनीटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रामपोहे
  2. 2मध्यम कांदे
  3. 7-8हिरव्या मिरच्या
  4. 10-12कडिपत्ता पाने
  5. 1 टेबलस्पूनकोथिंबीर,ओलं खोबरं
  6. 1 टी स्पूनसाखर
  7. 1लिंबू
  8. चवीनुसारमीठ
  9. 3 टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

10मिनीटे
  1. 1

    प्रथम चाळणीत पोहे घेऊन पाण्याखाली धुवून घ्या..चाळणी निथळत ठेवा.मध्यम आचेवर कढई तापत ठेवा..त्यात तेल घालून मोहरी,जिरं,हिंग,हळदीची खमंग फोडणी करून घ्यावी.यात मिरच्यांचे तुकडे,कडिपत्ता, घालून परतून घ्या.नंतर कांदा घालून तो गुलाबीसर होईस्तोवर परतावा..परत एकदा पोहे पाण्याखाली धुवावेत..असे केल्याने पोहे खूप वेळ मऊ राहतात...वातट होतं नाहीत..कांद्यामध्ये थोडं मीठ, कोथिंबीर घाला.यामुळे पोहे चविष्ट होतात..

  2. 2

    आता कांद्यावर पोहे घाला, मीठ साखर घालून चांगले परतून घ्यावे.आणि पोह्यांना 3-4दणकून वाफा काढाव्यात.

  3. 3

    वरुन कोथिंबीर,ओलं खोबरं घालून सर्व्ह करा...लिंबाच्या फोडी सोबत खायला तय्यार खमंग चविष्ट कांदे पोहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes