उपमा (upma recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#आई
आई माझी अत्यंत सुगरण, तिला न कांदे पोहे पेक्षा उपमा भारी आवडतो.. त्यामुळे मला आठवतं आमच्याकडे कोणी आलं की त्यांच्या साठी उपमा हमखास असायचाच, आईचं नाव प्रमोदिनी, पण तिला तिच्या माहेरचे पमाच म्हणायचे ,उपमा खातांना म्हणायचे उपमा खावा तर पमाच्याच हातचा .

उपमा (upma recipe in marathi)

#आई
आई माझी अत्यंत सुगरण, तिला न कांदे पोहे पेक्षा उपमा भारी आवडतो.. त्यामुळे मला आठवतं आमच्याकडे कोणी आलं की त्यांच्या साठी उपमा हमखास असायचाच, आईचं नाव प्रमोदिनी, पण तिला तिच्या माहेरचे पमाच म्हणायचे ,उपमा खातांना म्हणायचे उपमा खावा तर पमाच्याच हातचा .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 1/2 वाटीरवा
  2. 1 टेबल स्पूनतेल
  3. 1 1/2 टीस्पूनमीठ
  4. 2 टीस्पूनउडीद डाळ
  5. 1 टीस्पूनमोहरी जिरं
  6. 1 टीस्पूनकसूरी मेथी
  7. 1कांदा लांब कापलेला
  8. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  9. 5 ते 6 गोड लिंबाचे पानं
  10. 1गाजर किसलेलं
  11. 2 ते 3 हिरवी मिरची चे काप

कुकिंग सूचना

दहा मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र तयार ठेवावे.

  2. 2

    कढाईत तेल गरम करायला ठेवावे.गरम तेलामध्ये जिरे- मोहरी उडीद डाळ घालावी.उडीद डाळ लालसर झाल्यावर कढीपत्त्याची पाने,मिरची व कांदा घालावा, कांदा बर्‍यापैकी लाल झाल्यावर रवा घालावा साधारण दोन ते तीन मिनिट रवा तेलावर भाजावा.

  3. 3

    रवा खमंग भाजल्यावर त्यामध्ये टोमॅटो,गाजराचा कीस व कसुरी मेथी घालून पुन्हा एक ते दोन मिनीट परतावे.त्यानंतर मीठ घालून गरम उकळते पाणी साधारण दोन पेले सोडावे व दणदणीत वाफ येऊ द्यावी.

  4. 4

    उपमा तयार झाला यामध्ये हे गाजर टोमॅटो असल्यामुळे संपूर्ण पोटभरी चा हा मेनू ठरतो खायला देताना लिंबाचे लोणचे किंवा हिरवी चटणी किंवा ताक दिले तर अजून लज्जत वाढेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes