मिश्र डाळ व्हेज उपमा (mix dal upma recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

उपमा पोहे हा असा नाश्ता आहे, ती हा आपल्याकडे नेहमीच बनत असतो.....
उपमा आणि पोह्याचे काहीही नवलाई नाही...
यामध्ये जर वेरिएशन केले नाही तर, ते आपल्याला नेहमी नेहमी पाहूनच बोर होत....
थोडासा फरक केला आणि थोडासा चेंज केला की मग तो खाण्याचा पदार्थ डिलिशिअस बनतो....
उपमा हा मला कसा ही आवडतो...
स्पेशली हा व्हाईट रंगाचा उपमा जास्त आवडतो...
माझ्या मुलाला यल्लो उपमा साधा आवडतो...
आणि मुलीला हा व्हाइट रंगाचा जास्त आवडतो...
या ठिकाणी यांच्या दोघांच्याही चॉईस डिफरंट आहे...
जेव्हा उपमा बनतो तेव्हा दोन रंगाचे उपमा बनतात माझ्याकडे....
ठीक आहे प्रत्येकाची आवड आहे...
पण मला हा अतिशय आवडतो ....
आणि तूप घालून छान गरम गरम आसट उपमा तर खूपच आवडतो....

मिश्र डाळ व्हेज उपमा (mix dal upma recipe in marathi)

उपमा पोहे हा असा नाश्ता आहे, ती हा आपल्याकडे नेहमीच बनत असतो.....
उपमा आणि पोह्याचे काहीही नवलाई नाही...
यामध्ये जर वेरिएशन केले नाही तर, ते आपल्याला नेहमी नेहमी पाहूनच बोर होत....
थोडासा फरक केला आणि थोडासा चेंज केला की मग तो खाण्याचा पदार्थ डिलिशिअस बनतो....
उपमा हा मला कसा ही आवडतो...
स्पेशली हा व्हाईट रंगाचा उपमा जास्त आवडतो...
माझ्या मुलाला यल्लो उपमा साधा आवडतो...
आणि मुलीला हा व्हाइट रंगाचा जास्त आवडतो...
या ठिकाणी यांच्या दोघांच्याही चॉईस डिफरंट आहे...
जेव्हा उपमा बनतो तेव्हा दोन रंगाचे उपमा बनतात माझ्याकडे....
ठीक आहे प्रत्येकाची आवड आहे...
पण मला हा अतिशय आवडतो ....
आणि तूप घालून छान गरम गरम आसट उपमा तर खूपच आवडतो....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपरवा
  2. 4हिरव्या मिरच्या
  3. 1कांदा
  4. 1/4मटर
  5. 1गाजर
  6. 1/4जांभळी पत्ता गोबी
  7. 1छोटी शिमला मिरची
  8. 1 टेबलस्पूनमसूर डाळ
  9. 1 टेबल स्पूनउडदाची डाळ
  10. 1 टेबलस्पूनमुगाची डाळ
  11. 1/2 टीस्पूनहिंग
  12. 1 टीस्पूनमोहरी
  13. 1/4 कपतेल
  14. 3 टेबलस्पूनतूप
  15. 3.1/2 कप पाणी
  16. चवीप्रमाणे मीठ
  17. 1 टीस्पूनसाखर
  18. 1 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    सगळ्यात आधी पाणी उकळायला ठेवून देणे...
    कढई गॅसवर तापत ठेवा, कढई तापली की त्यात रवा फक्त परतून घ्यायचा आहे दोन मिनिट... भाजायचा नाही...

  2. 2

    कढईत मध्ये सर्वप्रथम तेल घालावे, तेल तापले की त्याच्यामध्ये हिंग आणि मोहरी घालावी,,,,,,
    मोहरी तडतडली की त्यामध्ये डाळी घालून द्यायच्या,, डाळी एक मिनिट परतून घेतलं की त्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची घालून द्यायची,
    आणि दोन-तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं..

  3. 3

    आता कांद्याचा कच्चेपणा गेला की त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं,,
    आणि मीठ घालायचं...
    चांगलं पाणी उकळले की त्याच्यामध्ये भाज्या घालून द्यायच्या...
    आणि लगेच हळूहळू रवा घालून लगेच फिरत राहायचं...
    रवा घातल्यावर पटापट सराटा ने रवा फिरवत राहायचं नाही तर गट्टे तयार होतील रव्याचे...
    आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचे आणि दोन ते तीन मिनिटं त्याला चांगली वाफ येऊ द्यायची

  4. 4

    आता दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढायचं, आणि चांगला उपमा आपला परतून घ्यायचा आणि भरपूर कोथिंबीर घालून परत त्याला चांगलं परतून घ्यायचं...
    हा उपमा मी आसट बनवते,, तुम्हाला जर घट्ट बनवायचा असेल जास्त तर तुम्ही पाण्याचा प्रमाण कमी करू शकतात...

  5. 5

    आता आपला उपमा गरम गरम तयार आहे,,
    याच्यावर आपल्याला खूप घालायच आहे,, तुम्हाला पाहिजे तेवढे तूप घालून छान गरम गरम सर्व्ह करायचं,,
    हा उपमा अतिशय सुंदर लागतो आणि भरपूर भाज्या, आणि डाळी असल्याने हा पौष्टिक पण आहे,,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

Similar Recipes