पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आदल्या दिवशी चणा डाळ भिजत घालावी, सकाळी डाळ शिजवून घ्यावी चाळणीत काढावी नंतर एक बुडाचे पातेलं घेऊन त्यात डाळ घेऊन मिश्रण गॅस वर ठेवावे गूळ वितळू लागल्यावर त्यात थोडी साखर घालावी. तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊ. परातीत मैदा व गव्हाचे पीठ चालून घ्यावे त्यात मीठ व हळद घालून थोडे सैलसर भिजवून घ्यावे.
- 2
डाळ चांगली एकजीव झाली कि गॅस बंद करावा व त्यात सुंठ आणि वेलची पूड टाकावी.मिश्रण थंड झाल्यावर पुरण यंत्रातून पुरण तयार करून घ्यावे. पिठाला तुपाचा हात घेऊन पारी वळावी व त्यात पुरण भरून पोळी हलक्या हाताने लाटावी पोळी लाटताना तांदळाचे पीठ घ्यावे त्यामुळे पोळी चांगली वळली जाते. दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यावी
- 3
तूप लावून गरमागरम दुधा सोबत पुरणपोळी खावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैवेद्य नैवेद्य म्हणला कि सगळ्यात आधी येते ती पुरणपोळी. मग तो कोणताही सण असो, पूजा असो कि कोणताही धार्मिक कार्यक्रम असो पुरणपोळी पाहिजेच. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी परफेक्ट जमणे पण एक उत्तम गृहिणी पणाचे लक्षण समजले जाते कारण ही पुरणपोळी बनवणे खूप किचकट आणि वेळखाऊ आहेच शिवाय निगुतीने करायचा पदार्थ आहे. पण एकदा का ही पुरणपोळी नीट जमली कि खाणारा तृप्त आणि करणारा ही समाधानी. Shital shete -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 माहेरवाशीण म्हणून गौरी आल्या की त्यांच्यासाठी छान गोडधोड स्वयंपाक केला जातो.प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य दाखवला जातो.बहिणीच्या सासरी खड्यांच्या गौरी बसतात.मग त्यांच्यासाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य करतात.यावर्षीही आम्ही गेलो होतो.मस्त पुरणपोळी आणि साग्रसंगीत स्वयंपाक करून नैवेद्य अर्पण केला. Preeti V. Salvi -
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 रेसिपी-1 पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे महानैवेदय. प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. गौरी पूजनाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. आमच्याकडे सर्वांना आवडते. Sujata Gengaje -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला आपली महाराष्ट्रीयन पारंपारिक पुरणपोळीची रेसिपी शेअर करत आहे.काहीजण मुगडाळ वापरून सुद्धा ही पुरणपोळी बनवू शकतात.माझी आजी नेहमी म्हणायची की पुरण घातले की लगेचच त्याचे कणिक मळून ठेवावे म्हणजे कणिक छान मुरले की पुरणपोळ्या सुद्धा खूप सुंदर बनतात.तुम्हालाही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
पुरणपोळी(puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#वीक3#पोस्ट1महाराष्ट्रात मोठ्या सणावाराला आवर्जून केला जाणारा पुरणपोळीचा नैवेद्य Arya Paradkar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी महाराष्ट्र चा पारंपारिक पदार्थ. असा म्हणतात हा सहज जमत नाही आणि जमलं तर सुगरणच झाली म्हणा ती व्यक्ती. असा हा पदार्थ माझ्या रेसीपीबुक मध्ये असणे म्हणजे माझी रेसीपीबूक परिपूर्ण वाटेल. चला करूया पुरणपोळी. Veena Suki Bobhate -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
फॉझिटीविटी #पुरणपोळीकॅप्शन वाचून कदाचित थोडे वेगळे वाटेल पण ते कसे..... कोणताही सण असो पुरणपोळी चा मान पहिला!पुरणपोळी या शब्दात च इतकी एनर्जी आहे की आजही कित्येक स्त्रिया पुरणपोळी बनवायची म्हटले की लवकर उठतात 😆पण हल्ली काहींना पुरणपोळी बनवायच्या आधीच धाकधूक असते पुरण पातळ होईल का, करताना फुटेल का, आज मैैदा घालून पहाते...असे असंख्य निगेटिव्ह विचार करून शेवटी बेत फसतो 😳ज्या प्रमाणे प्रसादाचा शिरा उत्तमच बनतो का, तर तो सोपा आहे म्हणून नव्हे ,तर तो बनवताना सात्विक विचार मनात असतात.पुरणपोळी पोळी करताना फसण्याची थोडीफार भिती वाटत असेल तर मस्त मोबाईल वर आराध्य देवतेचे नामावली लावा छान वातावरण निर्मिती होईल मन प्रसन्न होईल व कधी मउ लुसलुशीत पुरणपोळी बनतील कळणार देखील नाही ☺प्रत्येक गोष्ट आधी मनाने स्विकीरली ना की पुढचे सगळे सोपे होऊन जाते(कदाचित कोणाला हे पटणार नाही 👆)असो...बर ही पुरण पोळी गुणकारीही तितकीच बरका !!शुद्ध तुपासोबत खाल्ली,की वातदोष व पित्तदोष शमविते. पण फास्ट फूड च्या जमान्यात आपले पारंपरिक पदार्थ बनवा, खाउ घाला, व पुढच्या पिढीलाही शिकवा 🙏फक्त गव्हाच्या पुरणपोळी च्या काही टिप्स् ...पीठ ० नंबर च्या चाळणीने चाळून घ्यावेपीठ सैलसर १० मिनिटे मळून मळून घ्यावे १ तास झाकून ठेवामैद्याच्या तुलनेत यात ग्लूटेन चे प्रमाण फार कमी असते जास्त वेळ मळलेल्याने पिठाला एकप्रकारे चिकटपणा येतोउंड्यात पुरण भरण्यापूर्वी पारीला आतून तूप लावा म्हणजे पुरण सर्वत्र पसरतेपोळी बनण्यापूर्वी पीठाला तेल व मीठ लावून मऊ करा, काहीही करून पोळी फाटतच असेल तर १ , २ तास पीठ फ्रिजला ठेवागव्हाची पोळी नाजूक बनते सावकाश लाटा व हळुवार पलटा Archana Pawar -
पुरणपोळी (PURANPOLI RECIPE IN MARATHI)
#उत्सव#पोस्ट 1पुरणपोळी ही कोणत्याही लोकप्रिय उत्सवा दरम्यान तयार केलेली एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. Manisha Khatavkar -
शाही पुरणपोळी (shahi puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 सण म्हटलं कि पुरणपोळी हि आलीच आणि ति न आवडणारे फार कमी जण असतील ... मी आज जरा नेहमीच्या पुराणपोळीत थोडा मावा घेतला छान झाल्यात तुम्ही करून बघाDhanashree Suki Padte
-
महाराष्ट्रीयन पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSRमहाराष्ट्राची आन बान आणि शान असलेली पुरणपोळी ही प्रत्येक सणाचे आकर्षण! मऊसूत पुरणाने गच्च भरलेली , सोनसळी रंगाची , नाजूक किंचित जाडसर लाटलेली पोळी जेव्हा तव्यावर साजूक तुपात खमंग भाजली जाते ना तेव्हा त्या खरपूस सुवासाने घरातील कोपरा ना कोपरा मंगलमय होऊन जातो! पुरणपोळी म्हणजेच आनंदोत्सव हे जणू महाराष्ट्रात समीकरण ठरलेलेच ! बरेच लोक असे मानतात की, "मराठी पुरणपोळी रेसिपी"ची मूळ सुरूवात महाराष्ट्र राज्यामध्ये झाली.कदाचित " महाराष्ट्रीयन पुरण पोळी "या जगापासून अस्तित्वात आहे. महाराष्ट्र तसेच गुजरात आणि गोवा ही गोड पोळी तयार करण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.चला तर मग पाहूयात खमंग साजूक तुपातील पुरणपोळी. Deepti Padiyar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11मैदा पेक्षा गव्हाच्या पिठाची पोळी चवीला खूप छान लागते. shamal walunj -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि अप्पे सोन्याच्या पावलांनी मोत्याच्या पावलांनी हळदी कुंकवाचे लेण घेऊन गौराई आली. पहिल्या दिवशी गौराईची स्थापना केली जाते मग दुसऱ्या दिवशी गौराई ना महानैवेद्य दाखविले जाते,महा नैवेद्यात विविध पदार्थ बनविले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे पुरणपोळी तर पाहूयात पुरणपोळीची पाककृती. Shilpa Wani -
नागपुरी पद्धतीची पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#KS3प्रत्येक भागात वेगवेगळी पुरणपोळी असते नाशिक संगमेश्वर साईडला मोठी कडई चुलीवर पालथी घालून त्यावर मोठी पोळी भारतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये तेला वरच्या पोळ्या बनवतात सांगली कोल्हापूर भागात तर सातार भागात पिठावर ची पुरणपोळी बनवतात पुरणपोळी मध्ये गूळ वापरतात पण नागपूर मध्ये पुरणपोळी मध्ये साखर वापरली जाते तर मी तुम्हाला आज साखर वापरून पुरण पोळी बनवून दाखवणार आहे Smita Kiran Patil -
-
-
बदाम काजू पुरणपोळी (badam kaju puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळीपुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष च्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. Jyoti Gawankar -
पुरणपोळी
#पुरणपोळीहोळी म्हटलं की पुरणपोळी हवीच. मग ती तेलपोळी असू दे किंवा खापरावरची पोळी असु देत. मी आज पुरणात केशर घालून पुरणपोळी बनविली, स्वाद तर अहाहा.....शिजवलेल्या चणाडाळीतले पाणी काढून त्याची कटाची आमटी बनविली. Deepa Gad -
-
पुरणपोळी आणि आंब्याचा रस(puranpoli aani ambyacha rassa recipe in marathi)
#रेसीपीबुक महाराष्ट्राची आन बान आणि शान असलेली पुरणपोळी ही प्रत्येक सणाचे आकर्षण! मऊसूत पुरणाने गच्च भरलेली , सोनसळी रंगाची , नाजूक किंचित जाडसर लाटलेली पोळी जेव्हा तव्यावर साजूक तुपात खमंग भाजली जाते ना तेव्हा त्या खरपूस सुवासाने घरातील कोपरा ना कोपरा मंगलमय होऊन जातो! पुरणपोळी म्हणजेच आनंदोत्सव हे जणू महाराष्ट्रात समीकरण ठरलेलेच...माझ्या गावची विशेष डिश म्हणजेच पुरणपोळी अनी आंब्याचा रस. Amrapali Yerekar -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#gurपुरणपोळी हा अनेकांचा आवडता पदार्थ. सण आले की पुरणपोळी करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. गरमागरम तव्यावरून डायरेक्ट ताटात आलेली, स्वादिष्ट पुरणाने टम्म फुगलेली आणि साजूक तुपात थबथबलेली पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच असते.आज गौरीच्या माहेरपणाला खास पुरणपोळीचा थाट ...😊 Deepti Padiyar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीखरंतर गौरीला आमच्याकडे वडे, काळ्या वाटाण्याचे सांबार, खीर वगैरे असा नैवेद्य असतो. आज मी चणाडाळ आणि मुगडाळ मिक्स करून पुरणपोळ्या बनविल्या. Deepa Gad -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR#पुरणपोळी म्हणजे आमच्या घरात आवडीचा गोड पदार्थ ,माझ्या मुलांचा तर फार .तसे महाराष्ट्रीयन लोकांच्या सर्व देवी देवताच्या नैवेद्यात तिचे अन्यन्य साधारण महत्व आहे.होळी नी पुरणपोळी नाही असे होती नाही महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आवर्जून केला जाणारा पदार्थ माझ्या हातची पुरणपोळी आमच्या घरात एकदम आवडती.बघा तर कशी करायची आवश्य करून बघा एकदम मऊसूत होते. Hema Wane -
पुरणपोळी मराठमोळ रेसिपि (puranpoli recipe in marathi)
#आई#मदर्स डे स्पेशल माझ्या लाडक्या आईसाठीआई साठी बोलावतरी काय जेवढे बोलू तेवढे कमीचआईने हे जग दाखविले हाताला धरून चालायलाशिकवले छान छान बोलायला शिकवले तिने आपल्याला काय पाहिजे ते सर्व दिले पण आपण तिला कधी विचारले नाही आई तुला काही पाहिजे का आणि तिने ही काही मागितले नाही पण आपणकधी तिला विचारलं की आई तुला काय हवय कातर तिचे ऊत्तर नेहमी एकच नाही मला काही नकोपण मि ठरविले ह्या मदर्स डे ला तिला काही तरीस्पेशल आणि तेही तिच्या आवडीचे माझ्या आईलापुरणपोळी खुप आवडते मग मि ठरविले आईलापुरणपोळी भेट द्यायची म्हणून आईसाठी खास पुरणपोळी. Sangeeta Kadam -
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #पुरणपोळी.. आपली मराठी खाद्यसंस्कृती म्हणा किंवा एकूणच पाककला म्हणा ..हे एक सायन्सच आहे..पाकशास्त्र असं उगाच म्हणत नाहीत याला..ही एक प्रकारची तपश्र्चर्याच आहे..यामध्ये सातत्य,प्रयोगशीलता, चिकाटी,मनापासून आवड हवीच हवी. एखादा पदार्थ जमला नाही तर पुढच्या वेळेला आधीच्या चुका टाळून चिकाटीने तो पदार्थ सराईतपणे जमेपर्यंत करण्याचे सातत्य ...इथेच खर्या सुगरणीचा कस लागतो.आता हेच बघा ना उकडीचे मोदक आणि पुरणपोळी..हे दोन्ही पदार्थ सुबक रितीने जमण्यासाठी काही वर्ष खर्ची घालावी लागतात..तेव्हां कुठे अन्नपूर्णा देवी आपल्यावर प्रसन्न होते. पुरणपोळी आणि उकडीचे मोदक हे तसं राजेशाहीच ..तामझामवालं काम..दोन्हीसाठी निवांत पणा आवश्यक..कसंतरीच उरकायला जाल तर फजिती ही ठरलेलीच..आदल्या दिवशी पासून हे आपल्या आगमनाची वर्दी द्यायला भाग पाडतात..घरातील मंडळींचा काही ना काहीतरी हातभार लागलाच पाहिजे. नादलयताल सणाचा फिल देतो घरातील कुळधर्म कुळाचार असो,होळी ,पोळाअसो..सणसमारंभअसो,अगदीबारशापासून,डोहाळजेवणापासून ते मंगळागौरी पर्यंत,बोडणापर्यंत पानात, नैवेद्यासाठी पुरणावरणाचा स्वयंपाक हवाच..काही वेळेस पुरणपोळी जरी विकत आणली तरी शकुनाचे म्हणून पुरण करतेच घरची गृहिणी.. त्याशिवाय तिला चैन पडतच नाही..तर अशी ही पुरणपोळी म्हणजे आपल्या खाद्यसंस्कृतीची अनभिषिक्सम्राज्ञीचहोय.. Bhagyashree Lele -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीगणपती बाप्पांच्या आगमनानंतर काही घरांमधे गौराई मातेचे आगमन होते. काही ठिकाणी एक उभी गौरी असते, तर काही ठिकाणी दोन उभ्या असलेल्या गौरी असतात. काही ठिकाणी फक्त मुखवट्याच्या गौरी असतात. कोणी गौरी मातेला पंचकक्वान्नाचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी गौरीला नाॅनव्हेजचा नैवेद्य पण दाखवला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. पण गौरी मातेच्या प्रसादामधे प्रामुख्याने पुरणपोळीचा नैवैद्य दाखवतात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या बरोबरच गौरी येतात आणि गणपती बाप्पांच्या बरोबर जेऊन माघारी जातात. मी पुरणपोळी बनवली त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा अनेक प्रांतामध्ये वेगवेगळ्या सणाला बनवला जाणारा पदार्थ. होळी, गौरीपूजन, गुढीपाडवा असे अनेक सणाच्या दिवशी हा पोळीचा प्रकार बनवला जातो. बनवलेल्या पुरणावर पोळी चांगली लाटली जाईल कि नाही हे अवलंबून असते. Swayampak by Tanaya
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12511473
टिप्पण्या