रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
7 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपचणाडाळ
  2. 1 कपगूळ
  3. 1 टीस्पूनवेलची जायफळ पूड
  4. 1/2 कपकणीक
  5. 1/2 कपमैदा
  6. 1/4 कपतेल
  7. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    चणा डाळ स्वच्छ धऊन सहा तास भिजवून ठेवावी व कुकर मध्ये पाच शिट्ट्या देऊन मऊ शिजवावी. पाणी गाळून घ्यावे व गरम असतानाच घोटून घ्यावी. त्यात गूळ मिक्स करावा. गूळ घातल्यावर मिश्रण पातळ होते.

  2. 2

    मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे त्यात चमचा उभा राहिला की पुरण झाले. थंड झाल्यावर पुरण यंत्रातून वाटून घ्यावे व त्यात वेलची जायफळ पूड घालावी.

  3. 3

    कणिक व मैदा मीठ व तेल घालून मऊसर मळून घ्यावा. एक तास झाकून ठेवावा.

  4. 4

    आता पिठाची पारी करावी व त्याचा दुप्पट पुरण त्यात भरून, पोळी लाटावी.

  5. 5

    तवा गरम करून, मध्यम आचेवर पोळी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावे.

  6. 6

    पुरणपोळी गरम किवा थंड,तूप व दुधाबरोबर खायला द्यावी. या प्रमाणात चौदा पुरणपोळ्या होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes