पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)

पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणाडाळ स्वच्छ पाण्याने धुऊन दोन तास पाणी घालून भिजत ठेवा. नंतर मोठ्या भांड्यात चणा डाळ शिजायला ठेवावी. डाळ शिजताना मधून मधून फेस येतो तो काढून टाकावा.डाळ चांगली शिजली की गॅस बंद करावा.व डाळ गाळून घ्यावी. त्यातील पाणी वेगळे करून बाजुला ठेवावे.
- 2
नंतर त्यात साखर व गुळ घालून छान मिक्स करून मंद गॅसवर शिजवून घ्यावे. डाळ
शिजली की नाही हे पाहण्यासाठी त्यात मोठा चमचा घालायचा, तो व्यवस्थित बाहेर आला म्हणजे आपले पुरण तयार झाले. मग पुरणयंत्र घेवुन त्यात वरील डाळीचे मिश्रण थोडे थोडे घालून वाटून घ्यावे. - 3
अश्याप्रकारे आपले पुरण तयार होत असताना त्यात वेलची पावडर व जायफळ पूड घालुन पुरण एका पातेल्यात काढूनघ्यावे. नंतर परातीत रवा चाळून घेणे. व त्यात पाणी घालून रवा वीस मिनीट भिजत ठेवा. त्यात चाळलेला मैदा, गव्ह्याचे पिठ, चविनुसार मीठ घालुन पिठ मळून घ्यावे.
- 4
मग त्यात तेल घालून ४ तास मुरायला ठेवावे.चार तासानंतर पिठाचे गोळे करून त्यात पुरण भरून पोळी लाटून घ्यावी. व तव्यावर दोन्ही बाजूने खरपुस भाजुन त्यावर साजूक तूप घालून सर्व्ह करा.गरमा गरम पुरण पोळी.
- 5
डाळ गाळून जे पाणी आपण बाजुला ठेवले होते त्याची कटा ची आमटी करायची.त्यासाठी पातेल्यात ४ ते ५ लसुन पाकळ्या ठेचून घाला.त्यात राई १ चमचा घाला. लसुन, राई तडतडल्यावर त्यात हळद अर्धा चमचा, लाल तिखट एक चमचा घालून त्यावर डाळीचे पाणी व थोडे वाटलेले पुरण घालून एक उकळी आली की त्यात मीठ घाला. व सर्व्ह करा कटाची आमटी. ही आमटी पुरणपोळी,भात या बरोबर खूप छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR #होळी स्पेशल चॅलेंज रेसिपी होळी रे होळी पुरणाची पोळी महाराष्ट्रात व प्रत्येक मराठी माणसाच्या घरात होळीला पुरणपोळी केली जाते तसेच साजुक तुप कटाची आमटी कुरडई पापडी भजी भाजी भाताचा नैवेद्य होळीला दाखवला जातो चला तर पुरणपोळीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
पुरण पोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 गौरी पुजनाच्या दुसऱ्या दिवशी वरणा पुरणाचा खीर तळणाच्या पदार्थाचा नैवेद्य करतात म्हणुन मी पण घरात पुरणपोळ्या बनवल्या चला दाखवते तुम्हाला Chhaya Paradhi -
स्पेशल साखरेची पुरणपोळी (shakhrechi puranpoli recipe in marathi)
#hrपूर्वी प्रत्येक सणासुदीला हमखास पुरणपोळीच बनवली जायची. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणची पुरणपोळी थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीची आहे कोल्हापूर मध्ये तर पुर्वी पुरण पोळी बनवताना कणीक मैदा, मीठ तेल टाकून दुधात सैलसर भिजवून पीठ मळायचे. ही कणीक पाट्यावर ठेवून मुसळाने तेल, पाणी लावून कुठून घ्यायचे. ही कुटायला दोन माणसे लागतात एकाने खाली बसून कणकेला तेल पाणी लावायचे व उभी असलेल्या बाईने फक्त मुसळ धरून कुटायला मदत करायची ( हे मुसळ लाकडापासून बनवतात ) हे काम आपण बत्त्याने किंवा वरवंटयाने ही करू शकतो किंवा आज तर फुडप्रोसेसर आहेच.... कुटल्या ने पीठ मऊ होते व पोळी छान होते मी तर छोट्या पितळेच्या बत्त्याने किंवा वरवंटयाने परातीतच पीठ कुटते. मी या आधीही गुळाची पुरण पोळी आणि साखर गुळाची पुरणपोळी ची रेसिपी कूकपॅड वर शेअर केली आहे तेही तुम्ही नक्की बघा.चला तर मग बघुया स्पेशल साखरेची पुरणपोळी 😋 Vandana Shelar -
-
पुरणपोळी(puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#वीक3#पोस्ट1महाराष्ट्रात मोठ्या सणावाराला आवर्जून केला जाणारा पुरणपोळीचा नैवेद्य Arya Paradkar -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week११#पुरणपोळी नैवद्य साठी खास पुरणपोळी केली जाते, विशेषत: महालक्ष्मी, होळी ला याचा मान असतो Anita Desai -
पुरणपोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#HR1 #होळी रे होळी पुरणाची पोळी # होळी च्या सणाला आपल्या महाराष्ट्रात घरोघरी नेवेद्यासाठी पुरणपोळी चा घाट घातला जातोच चलातर . पुरणपोळीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
केळ्याची पुरणपोळी (Kelyachi puranpoli recipe in marathi)
#GPR #गुढीपाडवा रेसिपी चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रामुख्याने महाराष्ट्रात अत्यंत आनंदाने साजरा होणारा सण म्हणजे ' गुढीपाडवा ' मराठी माणसांच्या नववर्षाचा हा पहिला दिवस साडेतिन मुहूर्तांपैकी एक घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. गुढी हे विजयाचे समृद्धीचे आणि सकारात्मकतेचे शुभ प्रतिक समजले जाते. ह्या आपल्या पहिल्या सणानिमित्त मी नेहमीच्या पुरण पोळ्या न करता केळीच्या पुरणपोळ्या केल्या आहेत चला रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11पुरण पोळी, एक आपली रेसिपी, आपल्या महाराष्ट्रीय समृद्ध संस्कृतीतले आणि विस्तृत खाद्यसंस्कृतीतले एक खमंग पान. ही रेसिपी इतकी आपली आहे की महाराष्ट्राला पुरणपोळीचा जिओ टॅग मिळायला हवा. तुम्ही आपल्या पद्धतीच्या अनेक रेसिपी बनवू शकत असालात तरी पुरणपोळी हा एक सर्वमान्य मापदंड आहे. पुरणपोळी करता आली म्हणजे मराठी पद्धतीचे जेवण बनविण्याची बॅचलर्स डिग्री मिळण्यासारखे असते."होळी रे होळी, पुरणाची पोळी..." अशी आरोळी प्रसिद्धच आहे. पण पुरणपोळी होळीपुरता मर्यादित नाही. पाडवा असो वा पोळा, गौरी-गणपती असो वा कृष्ण, जिथे कुठे सर्वोत्तम गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविण्याची इच्छा होइल, किंवा गृहिणीला आपले कसब दाखवून कुणा खास पाहुण्यांचे स्वागत करायचे असेल तर पुरणपोळी सारखा पर्याय नाही.पुरणपोळ्या विकत मिळत असल्या तरी तो अगदीच अडचणीत सापडलेल्यांसाठी शेवटचा पर्याय असू शकतो. पण पुरणपोळी बनविण्याची नाही तर ती साजरी करण्याची गोष्ट आहे. आदल्या रात्री डाळ भिजत घालण्यापासून याची सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी ती डाळ उकडणे, त्यात गूळ घालून शिजवणे, पुरण यंत्रातून त्याचे पुरण करणे, हे सगळे लाड आधी पुरवावे लागतात. घाटण्याचा, पुरण यंत्र फिरविण्याचा नाद स्वयंपाकघरात घुमायला हवा. पुरणाच्या गोळ्यांचा आणि मऊ पिठाचा स्पर्श हाताला व्हायला हवा. अलगद, मायेने पण सराईतपणे लाटणे गोळ्यावरुन फिरायला हवे. तव्यावर फुगलेल्या पुरणपोळीवर साजूक तुप लावतानाचा सुगंध घरभर दरवळायला हवा. आणि इतके सारे होऊन पुरणपोळी खाण्यासाठी मन आतुर झाले असताना आधी देवाला नेवैद्य दाखवेपर्यंत वाट पहाणे देखील आले. तेव्हा कुठे ही सेलिब्रिटी आपल्या पानात अवतरते. सादर आहे ही आपली मराठमोळी रेसिपी... Ashwini Vaibhav Raut -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला आपली महाराष्ट्रीयन पारंपारिक पुरणपोळीची रेसिपी शेअर करत आहे.काहीजण मुगडाळ वापरून सुद्धा ही पुरणपोळी बनवू शकतात.माझी आजी नेहमी म्हणायची की पुरण घातले की लगेचच त्याचे कणिक मळून ठेवावे म्हणजे कणिक छान मुरले की पुरणपोळ्या सुद्धा खूप सुंदर बनतात.तुम्हालाही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
-
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#GPR गुढीपाडवा आणि पुरणपोळी हे पश्चिम महाराष्ट्राच एक समीकरणच आहे नवीन वर्षाचा आगमन हे गोड-धोड करून करा राव व ही प्रथा महाराष्ट्रात फार जुनी आहे पुरणपोळी म्हणजे साग्रसंगीत स्वयंपाक आलाच. Supriya Devkar -
विदर्भ स्पेशल पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11# पुरणपोळीमी मुळची सागंली भागातील मात्र नवरोबाच्या नोकरीमुळे नागपूर ,अमरावती याठिकाणी रहाणं झाले माझ्या मुलीला तिकडची भरगच्च पूरण असलेली पुरणपोळी खूप आवडते ही पुरणपोळी खूप मोठी नसते पण पुरण खूप असल्याने एक किंवा दोन पोळ्यात पोट टम्म भरते गरमागरम तुपासोबत खायची ही पुरणपोळी. Supriya Devkar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #पुरणपोळी.. आपली मराठी खाद्यसंस्कृती म्हणा किंवा एकूणच पाककला म्हणा ..हे एक सायन्सच आहे..पाकशास्त्र असं उगाच म्हणत नाहीत याला..ही एक प्रकारची तपश्र्चर्याच आहे..यामध्ये सातत्य,प्रयोगशीलता, चिकाटी,मनापासून आवड हवीच हवी. एखादा पदार्थ जमला नाही तर पुढच्या वेळेला आधीच्या चुका टाळून चिकाटीने तो पदार्थ सराईतपणे जमेपर्यंत करण्याचे सातत्य ...इथेच खर्या सुगरणीचा कस लागतो.आता हेच बघा ना उकडीचे मोदक आणि पुरणपोळी..हे दोन्ही पदार्थ सुबक रितीने जमण्यासाठी काही वर्ष खर्ची घालावी लागतात..तेव्हां कुठे अन्नपूर्णा देवी आपल्यावर प्रसन्न होते. पुरणपोळी आणि उकडीचे मोदक हे तसं राजेशाहीच ..तामझामवालं काम..दोन्हीसाठी निवांत पणा आवश्यक..कसंतरीच उरकायला जाल तर फजिती ही ठरलेलीच..आदल्या दिवशी पासून हे आपल्या आगमनाची वर्दी द्यायला भाग पाडतात..घरातील मंडळींचा काही ना काहीतरी हातभार लागलाच पाहिजे. नादलयताल सणाचा फिल देतो घरातील कुळधर्म कुळाचार असो,होळी ,पोळाअसो..सणसमारंभअसो,अगदीबारशापासून,डोहाळजेवणापासून ते मंगळागौरी पर्यंत,बोडणापर्यंत पानात, नैवेद्यासाठी पुरणावरणाचा स्वयंपाक हवाच..काही वेळेस पुरणपोळी जरी विकत आणली तरी शकुनाचे म्हणून पुरण करतेच घरची गृहिणी.. त्याशिवाय तिला चैन पडतच नाही..तर अशी ही पुरणपोळी म्हणजे आपल्या खाद्यसंस्कृतीची अनभिषिक्सम्राज्ञीचहोय.. Bhagyashree Lele -
-
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#MWK सुट्टी म्हणून माझा नातू इथे आहे.त्याला गोड, पुरणपोळी खुप आवडते.त्याची फर्माईश आणि आठवडा अखेर काही तरी वेगळे म्हणून पुरणपोळी केली. Pragati Hakim -
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week11माझ्या कुटुंबात पुरणपोळी सगळ्यांना भरपूर आवडते .विशेष म्हणजे गौरी-गणपतीच्या सणात पुरणपोळी ला विशेष महत्व , गौराई दीड दिवसाची पाहुनी माहेरी आलेली असते आणि तिला गोड-धोड म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. Minu Vaze -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
फॉझिटीविटी #पुरणपोळीकॅप्शन वाचून कदाचित थोडे वेगळे वाटेल पण ते कसे..... कोणताही सण असो पुरणपोळी चा मान पहिला!पुरणपोळी या शब्दात च इतकी एनर्जी आहे की आजही कित्येक स्त्रिया पुरणपोळी बनवायची म्हटले की लवकर उठतात 😆पण हल्ली काहींना पुरणपोळी बनवायच्या आधीच धाकधूक असते पुरण पातळ होईल का, करताना फुटेल का, आज मैैदा घालून पहाते...असे असंख्य निगेटिव्ह विचार करून शेवटी बेत फसतो 😳ज्या प्रमाणे प्रसादाचा शिरा उत्तमच बनतो का, तर तो सोपा आहे म्हणून नव्हे ,तर तो बनवताना सात्विक विचार मनात असतात.पुरणपोळी पोळी करताना फसण्याची थोडीफार भिती वाटत असेल तर मस्त मोबाईल वर आराध्य देवतेचे नामावली लावा छान वातावरण निर्मिती होईल मन प्रसन्न होईल व कधी मउ लुसलुशीत पुरणपोळी बनतील कळणार देखील नाही ☺प्रत्येक गोष्ट आधी मनाने स्विकीरली ना की पुढचे सगळे सोपे होऊन जाते(कदाचित कोणाला हे पटणार नाही 👆)असो...बर ही पुरण पोळी गुणकारीही तितकीच बरका !!शुद्ध तुपासोबत खाल्ली,की वातदोष व पित्तदोष शमविते. पण फास्ट फूड च्या जमान्यात आपले पारंपरिक पदार्थ बनवा, खाउ घाला, व पुढच्या पिढीलाही शिकवा 🙏फक्त गव्हाच्या पुरणपोळी च्या काही टिप्स् ...पीठ ० नंबर च्या चाळणीने चाळून घ्यावेपीठ सैलसर १० मिनिटे मळून मळून घ्यावे १ तास झाकून ठेवामैद्याच्या तुलनेत यात ग्लूटेन चे प्रमाण फार कमी असते जास्त वेळ मळलेल्याने पिठाला एकप्रकारे चिकटपणा येतोउंड्यात पुरण भरण्यापूर्वी पारीला आतून तूप लावा म्हणजे पुरण सर्वत्र पसरतेपोळी बनण्यापूर्वी पीठाला तेल व मीठ लावून मऊ करा, काहीही करून पोळी फाटतच असेल तर १ , २ तास पीठ फ्रिजला ठेवागव्हाची पोळी नाजूक बनते सावकाश लाटा व हळुवार पलटा Archana Pawar -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR#पुरणपोळी म्हणजे आमच्या घरात आवडीचा गोड पदार्थ ,माझ्या मुलांचा तर फार .तसे महाराष्ट्रीयन लोकांच्या सर्व देवी देवताच्या नैवेद्यात तिचे अन्यन्य साधारण महत्व आहे.होळी नी पुरणपोळी नाही असे होती नाही महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आवर्जून केला जाणारा पदार्थ माझ्या हातची पुरणपोळी आमच्या घरात एकदम आवडती.बघा तर कशी करायची आवश्य करून बघा एकदम मऊसूत होते. Hema Wane -
बदाम काजू पुरणपोळी (badam kaju puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळीपुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष च्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. Jyoti Gawankar -
शाही पुरणपोळी (shahi puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 सण म्हटलं कि पुरणपोळी हि आलीच आणि ति न आवडणारे फार कमी जण असतील ... मी आज जरा नेहमीच्या पुराणपोळीत थोडा मावा घेतला छान झाल्यात तुम्ही करून बघाDhanashree Suki Padte
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #पुरणपोळीगौरीचा महानैवेद्यासाठी पंचपक्वान्न तर केले जातातच पण पुरणपोळी शिवाय नैवद्य अपुर्णच मानला जातो🙏🙏. निगुतीने शिजवलेले पुरण आणि सैलसर कणकेत पुरण शिगोशिग भरून मऊसुत पोळी वरून तुपाची धार आणि दुध म्हणजे ब्रह्मानंद😋 Anjali Muley Panse -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11।।।।।सण वर्साचा हा गौरी गणपतीइथ येईल आनंदाला भरती.....साडी चोळी नवी नेसुन मिरवायालागौरी गणपतीच्या सणालाबंदु येईल माहेरी न्यायलागौरी गणपतीच्या सणाला....।।।।। Priyanka Sudesh -
-
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
होळी स्पेशल पुरणपोळी#HSR होळी दिवशी होळी ला खास रपुरणपोळीचाच नैवेध असतो. व सोबत मसाले भात, पालक भजी, सार , बटाटा भाजी हे सर्व आलेच. तेंव्हा पुरणपोळी करुया. Shobha Deshmukh -
-
-
दसरा स्पेशल पुरणपोळी गुळाची (puranpoli recipe in marathi)
#Happycookingपुरणपोळी हा मराठमोळा पदार्थ, महाराष्ट्रातील आवडता असा सणासुदीला बनवला जाणारा जिन्नस आहे. मस्त भरपूर पुरण, खुसखुशीत अशी ही पुरणपोळी कटाची आमटी, गुळवणी, दुध किंवा गरमागरम तूपाबरोबर खाल्ली कि अगदी मन तृप्त करते. आमच्याकडे होळी, वटपोर्णिमा, दसरा तसेच इतर सणासुदीला सांग्रसंगीत पद्धतीने पुरणपोळी बरोबर कटाची आमटी, गुळवणी, कांद्याची भजी, भात आणि आणि कुरडई पापड तसेच लिंबू तुपाबरोबर हे सर्व पदार्थही केले जातात चला तर मग बघुया आज पुरणपोळी गुळाची Vandana Shelar
More Recipes
टिप्पण्या