स्टीम कोबी वडी (kobhi vadi recipe in marathi)

Priyanka Sudesh
Priyanka Sudesh @cook_22358434
Thane

#स्टीम

कोबीची वडी हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. कोथिंबीर वडी प्रमाणेच ही बेसन आणि मसाले वापरून बनवितात आणि स्टीम करतात. अगदी झटपट होणारी आणि हेल्दी तसेच चवीलाही छान अशी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा!!!

स्टीम कोबी वडी (kobhi vadi recipe in marathi)

#स्टीम

कोबीची वडी हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. कोथिंबीर वडी प्रमाणेच ही बेसन आणि मसाले वापरून बनवितात आणि स्टीम करतात. अगदी झटपट होणारी आणि हेल्दी तसेच चवीलाही छान अशी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनिटे
२-३
  1. १२५ ग्राम कोबी (किसलेला)
  2. २०० ग्राम बेसन
  3. 2-3 टीस्पूनतांदूळ पिठ
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 2 टीस्पूनलाल तिखट
  6. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  7. 5-6कोथिंबीर पाने
  8. 1-2 टीस्पूनतीळ
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१५-२० मिनिटे
  1. 1

    किसलेल्या कोबी मध्ये चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, हळद आणि लाल तिखट घालावे. बेसन आणि तांदूळ पिठ घालून मिक्स करावे.

  2. 2

    ह्यात मीठ आणि तीळ घालून चमच्याने मिक्स करावे. (तूम्ही ही स्टीमर किंवा कुकर मध्येही बनवू शकता.) भांड्याला ब्रशने तेल लावावे आणि त्यात कोबीचे मिश्रण घालून पसरवून घ्यावे.

  3. 3

    वरून तीळ घालून १५-२० मिनिटे स्टीम करावे किंवा कुकर मध्ये ३ शीट्टया द्याव्यात. थंड झाल्यावर कट करून घ्याव्यात.

  4. 4

    एका पॅनमध्ये २-३ टीस्पून तेल गरम करून त्यात वडे दोन्ही बाजूंनी तांबूस शॅलो फ्राय करून घ्यावेत. कोबीची वडी तयार!!! टोमॅटो केचप सोबत सर्व्ह करा!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priyanka Sudesh
Priyanka Sudesh @cook_22358434
रोजी
Thane
I am software engineer by profession. Like to cook different foods by passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes