उपवास स्पेशल मिसळ (upawas special misal recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

आपल्यापैकी बहुतेकांची पणशीकरांची उपवास मिसळ फेवरेट असेल. तशी बऱ्याच हॉटेल्स मध्ये मिळते पण त्यांची खास असते.आम्ही कॉलेजला असताना मोठे उपवास आले म्हणजे शिवरात्र ,आषाढी एकादशी....जे उपवास जवळज सगळेच पकडतात.....तेव्हा प्रत्येक जण एकेक पदार्थ आणायचो ..एक जण खिचडी,एक जण भाजी, एक आमटी, एक चिवडा, एक जण दाण्याची उसळ ...मग सगळ्यांची मिळून आम्ही मिसळ पार्टी करायचो...आज बऱ्याच दिवसांनी कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या....

उपवास स्पेशल मिसळ (upawas special misal recipe in marathi)

आपल्यापैकी बहुतेकांची पणशीकरांची उपवास मिसळ फेवरेट असेल. तशी बऱ्याच हॉटेल्स मध्ये मिळते पण त्यांची खास असते.आम्ही कॉलेजला असताना मोठे उपवास आले म्हणजे शिवरात्र ,आषाढी एकादशी....जे उपवास जवळज सगळेच पकडतात.....तेव्हा प्रत्येक जण एकेक पदार्थ आणायचो ..एक जण खिचडी,एक जण भाजी, एक आमटी, एक चिवडा, एक जण दाण्याची उसळ ...मग सगळ्यांची मिळून आम्ही मिसळ पार्टी करायचो...आज बऱ्याच दिवसांनी कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. साबुदाणा खिचडी...
  2. 1 कपभिजवलेला साबुदाणा
  3. 1 टेबलस्पूनतूप/तेल
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1हिरवी मिरची
  6. 2 टेबलस्पूनदाण्याचं कूट
  7. आवडीनुसारमीठ,साखर,कोथिंबीर,खोबरं..
  8. बटाट्याची भाजी...
  9. 1उकडलेला बटाटा
  10. 1 टेबलस्पूनदाण्याचं कूट
  11. 2 टीस्पूनतेल/तूप
  12. 1/2 टीस्पूनजीरे
  13. 1हिरवी मिरची
  14. चवीनुसारमीठ,साखर,कोथिंबीर,खोबरं
  15. दाण्याची आमटी...
  16. 1/4 कपदाण्याचं कुट
  17. 1 कपपाणी
  18. 2आमसुलं
  19. 1 टीस्पूनतेल/ तूप
  20. 1/4 टीस्पूनजीरे
  21. 1हिरवी मिरची
  22. चवीनुसारमीठ,साखर,कोथिंबीर.
  23. दाण्याची उसळ..
  24. 1/2 कपभिजवलेले शेंगदाणे
  25. 1 टीस्पूनतूप/ तेल
  26. 1/4 टीस्पूनजीरे
  27. 1हिरवी मिरची
  28. चवीनुसारमीठ,साखर,खोबरं,कोथिंबीर
  29. 1 बाउलबटाट्याचा चिवडा
  30. 1 टीस्पूनलिंबाचा रस....आवडत असल्यास

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम साबुदाणा खिचडी केली.त्यासाठी साबुदाणा ५-६ तास भिजत ठेवला.फोडणीसाठी तेल,जीरे,मिरची घालून त्यात भिजवलेला साबुदाणा,दाण्याचं कूट,मीठ,साखर,कोथिंबीर,खोबरं घालून मंद आचेवर ५-१० मिनीटे परतून घेतलं.

  2. 2

    आता बटाट्याची भाजी केली.त्यासाठी उकडलेला बटाटा साल काढून फोडी करून घेतला.तेल, जीरे, मिरचीची फोडणी देऊन त्यात बटाट्याच्या फोडी,दाण्याचं कूट,मीठ,साखर,कोथिंबीर,खोबरं घालून नीट परतून घेतले.

  3. 3

    आता दाण्याची उसळ केली. त्यासाठी तासभर पाण्यात भिजवलेले शेंगदाणे घेतले.फोडणीसाठी तेल,जीरे,मिरची घालून त्यात भिजवलेले दाणे,मीठ,साखर,कोथिंबीर,खोबरं घालून पाच मिनिटे छान परतले.तयार उसळ बाउल मध्ये काढून घेतली.

  4. 4

    आता दाण्याची आमटी केली.शेंगदाण्याचा कूट आणि पाणी मिक्सरमधून छान फिरवून घेतले.फोडणीसाठी तेल,जीरे,मिरची घालून त्यात हे मिश्रण घालून छान धावळले.त्यात मीठ,साखर,कोथिंबीर,आमसुलं घालून छान उकळून घेतले.

  5. 5

    आता खिचडी,भाजी आमटी तयार झाली.

  6. 6

    उसळ आणि चिवडा ही तयार आहे.

  7. 7

    आता हे सगळे प्लेट मध्ये तयार ठेवले.आणि त्यांचे लेयर लावले.प्रथम सर्व्हिंग बाउल मध्ये साबुदाणा खिचडी घेतली.नंतर त्यावर दाण्याची उसळ घातली.

  8. 8

    आता त्यावर बटाट्याच्या भाजीचा लेयर दिला.त्यावर दाण्याची आमटी ओतून घेतली.सगळ्यात शेवटी वरतून बटाट्याच्या चिवडा घातला.आवडत असेल तर वरून लिंबाचा रस पिळावा..खूप छान लागतो.

  9. 9

    अशा तऱ्हेने उपवास मिसळ खाण्यासाठी तयार आहे.आवडीनुसार जे पदार्थ जास्त आवडतात त्याचा जास्त प्रमाणात वापर करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes