उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

#रेसिपीबुक #week10
#मोदक
आला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
८-९
  1. 1 कप तांदळाचे पीठ
  2. 1 कप पाणी
  3. 1 टीस्पून तूप
  4. चिमूटभर मीठ
  5. 1 कप नारळाचा चव
  6. 1/2 कप गूळ
  7. १ टेबलस्पून जायफळ वेलची पूड

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळवायला ठेवावे मग त्यात तूप, मीठ घालून उकळू द्यावे मग त्यात पीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे आणि गॅस बंद करून 5 मिनिटे झाकून ठेवावे.

  2. 2

    आता कढईत गूळ वितळवून मग त्यात चव घालून त्यात जायफळ वेलची पावडर घालून चांगल एकजीव करून घ्यावे आणि गॅस बंद करावे.

  3. 3

    आता पीठ मळून घ्यावे आणि लिंबाचा एव्हडा गोळा घेऊन तुपाचा हात लावून पारी बनवून घ्यावी मग त्यात सारण घालून पाऱ्या वळवून घाव्यात आणि लाडू वळून घ्यावेत.

  4. 4

    आता एका भांड्यात थोडं पाणी घालून गरम करावे, चाळणीला तूप लावून मग मोदक ठेवावेत आणि वाफवून घ्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

Similar Recipes