खट्टे मिठे आलु अनार कटलेट (aloo anaar cutlet recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#कटलेट
रेस्टोरंट मधे गेल्यावर हमखास starter म्हणून मागवला जाणारा पदार्थ म्हणजे कटलेट...
कटलेट म्हणजे(cutlet) cut and lets eat together असे मला वाटते.कुठलीही छोटी मोठी मेजवानी असो जेवणाला रंगत आणणारा पदार्थ म्हणजे कटलेट.किंवा संध्याकाळची छोटी भूक भागवता येईल.
तर अशीच छोटी भुक भागवण्यासाठी मी केले आहेत खट्टे मिठे आलु अनार कटलेट..
चविला एकदम भन्नाट.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 1 वाटीडाळिंबाचे दाणे
  2. 4बटाटे ऊकडुन घेतलेले
  3. 2 चमचे तांदळाचे पिठ
  4. 2 चमचेcorn floor
  5. 1 चमचाआलेमिरची पेस्ट
  6. चविनुसार मिठ
  7. 1 चमचातिखट
  8. 1 चमचाचाट मसाला
  9. आवश्यकतेनुसार तळण्यासाठी तेल
  10. 4 चमचाआवश्यकतेनुसार कोथिंबिर बारीक चिरलेली
  11. 1 वाटीकॉर्नफ्लॉव ची पातळ पेस्ट

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम उकडलेले बटाटे छान स्मॅश करुन घ्यावे.त्यामधे डाळिंबाचे दाणे घालावे.मग त्यात तांदळाचे पिठ कॉर्नफ्लॉवर
    घालावे.

  2. 2

    मग चविनुसार तिखट,मिठ,आले मिरची पेस्ट,चाट मसाला घालावा.कोथिंबिर घालावी.सगळे मिश्रण एकत्र कालवुन घ्यावे.

  3. 3

    मग मिश्रण एकत्र कालवुन झाले की,त्या मिश्रणाचा एकेक लिंबाएवढा गोळा घेऊन त्याला छान कटलेट चा आकार द्यावा.आकार तुम्ही कोणताही देऊ शकता.मी फिंगर चा आकार दिला आहे.

  4. 4

    सगळ्या कटलेट ला आकार देऊन झाला,तेल तळण्यासाठी गरम करायला ठेवावे.आता एकेक कटलेट corn floor च्या पेस्ट मधे बूडवून तेलात सोडावे आणि छान मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळुन घ्यावे. मस्त टोम्याटो सौस किंवा पूदिना चटणी सोबत गरम गरम serve करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes