कटलेट (cutlet recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#सप्टेंबर # कटलेट
कटलेट म्हणजे भाज्या किंवा मांसाचा तुकडा जो काॅर्न पीठात बुडविला जातो आणि ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून तेलात तळलेला असतो. कटलेट हा शब्द फ्रेंच शृंखल शब्दापासून आला आहे आणि तो प्रथम 1682 मध्ये वापरला जाणारा होता. काॅर्न - ग्रीनपीस कटलेट बनवले आहेत.

कटलेट (cutlet recipe in marathi)

#सप्टेंबर # कटलेट
कटलेट म्हणजे भाज्या किंवा मांसाचा तुकडा जो काॅर्न पीठात बुडविला जातो आणि ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून तेलात तळलेला असतो. कटलेट हा शब्द फ्रेंच शृंखल शब्दापासून आला आहे आणि तो प्रथम 1682 मध्ये वापरला जाणारा होता. काॅर्न - ग्रीनपीस कटलेट बनवले आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनीटे
3 माणसांसाठी
  1. 1 वाटी काॅर्न
  2. 1/2 वाटी मटार
  3. 1 वाटी उकडलेला बटाटा
  4. 2 टेबलस्पूनआल्याचा ठेचा
  5. 2 टेबलस्पूनमीरचीचा ठेचा
  6. 4 टेबलस्पूनब्रेडक्रम्स
  7. 1/4 टेबलस्पूनहळद
  8. 1/2 टेबलस्पूनतिखट
  9. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  10. 1 टेबलस्पूनचाट मसाला
  11. 1/2 टेबलस्पूनकाळी मिरपूड
  12. 1/2 टेबलस्पूनसाधे मीठ
  13. 1/2 टेबलस्पूनसैंधव मीठ
  14. 1/2लिंबाचा रस
  15. 2 टेबलस्पूनकाॅर्नफ्लाॅवर
  16. 2 टेबलस्पूनतांदूळाचे पीठ

कुकिंग सूचना

15मिनीटे
  1. 1

    प्रथम दोन बटाटे उकडून साले काढून किसून घ्यावे. काॅर्न आणि मटारचे दाणे जाडसर वाटून घ्यावेत.

  2. 2

    आता त्यात वरील सर्व साहित्य घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.

  3. 3

    मिश्रणाचे हवे त्या आकारात कटलेट तयार करून घ्यावे.

  4. 4

    हे कटलेट सेट करायला 1 तास फ्रिजमध्ये ठेवावेत.

  5. 5

    2 टेबलस्पून तांदूळाचे पीठ व 2 टेबलस्पून काॅर्नफ्लाॅवर घेऊन त्यात चिमुटभर मीठ घालावे व लागेल तसे पाणी घालून पातळसर पेस्ट करून घ्यावी.

  6. 6

    कटलेट फ्रिजमधून काढून घ्यावेत.एक-एक कटलेट प्रथम तांदूळ व काॅर्नफ्लाॅवरच्या पेस्ट मध्ये डीप करावेत आणि मग ब्रेडक्रम्समध्ये घोळवून डीपफ्राय करावेत.

  7. 7

    लालसर रंग आला की टीशूपेपरवर काढून घ्यावेत. गरमागरम कटलेट साॅस बरोबर खायला तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
रोजी

Similar Recipes