मेक्सिकन बरीटो बाउल (mexican burrito bowl recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#रेसिपीबुक #week13

इंटरनॅशनलरेसिपी
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मेक्सिकन बरीतो बाउल ची रेसिपी शेअर करत आहे.
आपली इंटरनॅशनल थीम असल्यामुळे आज ही रेसिपी लिहीत आहे. या रेसिपी मुळे माझ्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
लग्नानंतर माझे मिस्टर अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी जवळ फ्रेड्रिक मध्ये होते. त्यामुळे मलाही लग्नानंतर तिकडे थोड्या दिवसांसाठी जाण्याचा योग आला.
खरं तर तिकडे इंडियन ग्रोसरी मध्ये मला सर्व सामान उपलब्ध होते पण तरीही शनिवार-रविवार बाहेर पडल्यावर माझ्या मिस्टरांचा एक आवडीचा पदार्थ होता तो म्हणजे मेक्सिकन बरिटो बाउल ही रेसिपी आता माझ्या मुलांना सुद्धा खूप आवडते त्यामुळे मी ही रेसिपी बनवत असते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा

मेक्सिकन बरीटो बाउल (mexican burrito bowl recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13

इंटरनॅशनलरेसिपी
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मेक्सिकन बरीतो बाउल ची रेसिपी शेअर करत आहे.
आपली इंटरनॅशनल थीम असल्यामुळे आज ही रेसिपी लिहीत आहे. या रेसिपी मुळे माझ्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
लग्नानंतर माझे मिस्टर अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी जवळ फ्रेड्रिक मध्ये होते. त्यामुळे मलाही लग्नानंतर तिकडे थोड्या दिवसांसाठी जाण्याचा योग आला.
खरं तर तिकडे इंडियन ग्रोसरी मध्ये मला सर्व सामान उपलब्ध होते पण तरीही शनिवार-रविवार बाहेर पडल्यावर माझ्या मिस्टरांचा एक आवडीचा पदार्थ होता तो म्हणजे मेक्सिकन बरिटो बाउल ही रेसिपी आता माझ्या मुलांना सुद्धा खूप आवडते त्यामुळे मी ही रेसिपी बनवत असते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. २०० ग्राम तांदूळ
  2. १०० ग्राम राजमा
  3. 2कांदा
  4. 2टोमॅटो
  5. 1कॅप्सिकम
  6. 1गाजर
  7. स्वीट कॉर्न
  8. 1-2हिरवी मिरची
  9. 9-10लसून पाकळ्या
  10. 1/2लिंबू
  11. 1 टीस्पूनकोथिंबीर
  12. 1/2 वाटी नाचोज चिप्स
  13. 1 टीस्पूनचिली फ्लेक्स
  14. 1 टी स्पूनओरेगानो
  15. 2 टीस्पूनरेड चिली सॉस
  16. 3 टीस्पूनतेल
  17. दही ऑप्शनल

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    बरीटो बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आदल्या दिवशी राजमा भिजायला घालायची आहे राजमा सांगा 10 ते 12 तास भिजल्यावर तो परत सकाळी स्वच्छ धुऊन आपल्याला कुकर मध्ये घालून थोडेसे पाणी व मीठ घालून व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला भात करून घ्यायचा आहे. मग हा भात आपल्याला थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे.

  2. 2

    आता आपण पुढची तयारी करू यात त्यासाठी लसून पाकळ्या बारीक चिरुन घ्यायची आहेत कांदा बारीक चिरून घ्यायचा हे गाजर उभा चिरून घ्यायचा आहे व कॅप्सिकम उभी चिरुन घ्यायची आहे. व टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. स्वीटकॉर्न गरम पाण्यामध्ये बोईल करून घ्यायचे आहे. आता हा थंड झालेला आहे आपले राजमा व्यवस्थित शिजले आहेत व कट केलेल्या भाज्या व कॉर्न ही झाली आपली बरीटो बाउल ची पूर्वतयारी

  3. 3

    आता एक पॅन घेऊन त्यामध्ये तेल घालावे.तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आता आपल्याला बारीक कट केलेले लसणाचे तुकडे घालायचे आहेत ते दोन मिनिटे फ्राय झाल्यावर मग त्यामध्ये कांदा कॅप्सिकम गाजर हे सर्व ऍड करावे. भाज्या तेलामध्ये खूप जास्त शिजवायचा नाहीयेत. मग त्यानंतर आपण त्यामध्ये स्वीट कॉर्न घालणार आहोत. मग त्यामध्ये एक टिस्पून चिली फ्लेक्स 1 एक टि स्पून ओरेगॅनो व 1 तीस्पून रेड चिली सॉस घालणार आहोत.

  4. 4

    हे सर्व पाच मिनिट फ्राय झाल्यावर आता आपण त्यामध्ये आपण तयार केलेला भात घालणार आहोत. मग सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व गॅस बंद करावा. आता दुसऱ्या पॅन मध्ये तेल घालून ते व्यवस्थित गरम झाल्यावर त्याच्यामध्ये राहिलेले लसूण असण्याचे बारीक तुकडे कांदा-टोमॅटो घालून फ्राय करून घ्यायचे आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स ओरेगानो व रेड चिली सॉस व मीठ घालून मिक्स करून घ्यावे.

  5. 5

    आता पाच मिनिटे परतल्यावर त्यामध्ये आपण शिजवलेले राजमा त्यामध्ये ॲड करावे व थोडेसे मॅशरने मॅश करून घ्यावेत. ही झाली आपली राजमा ची भाजी तयार

  6. 6

    आता आपण तिसऱ्या कृतीकडे वळुयात यानंतर आता आपण सालसा बनवणार आहोत यासाठी कांदा,टोमॅटो,कोथिंबीर,हिरवी मिरची,हे सर्व बारीक चिरून घेणे. एका बाऊलमध्ये हे सर्व कट केलेले मिश्रण ठेवून त्यामुळे थोडेसे मीठ व लिंबूरस घालून मिक्स करून घेणे हे झाले आपले सालसा तयार. मेक्सिकन बरीतो साठी लागणारे राईस राजमा ची भाजी सालचा याची सर्व पूर्वतयाजरी यामध्ये सोर क्रिम पण ऍड करतात असेल तर मी त्याची तुम्हाला कृती सांगते घट्ट दही घ्यावे व त्यामध्ये मीठ घालावे ते दही जर जास्त आंबट नसेल तर त्यामुळे थोडासा लिंबू रस घालावा.

  7. 7

    आता एक ट्रान्सपरंट बाउल द्यावा त्यामध्ये आपण केलेल्या राईसचा एक लेयर द्यावा. त्यानंतर आपण बनवलेली राजमा ची भाजी त्यावर स्प्रेड करावी. जर तुम्ही स्वर क्रिम करणार असाल तर राजमा नंतर त्याचा एक लेयर द्यावा. त्यानंतर आपण बनवलेला सालचा त्याच्यावर पसरवावा. थोडीशी कोथिंबीर घालावी. मग त्यावर नाचे चे चिप्स क्रश करून स्प्रेड करावेत. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्यावर चीज सुद्धा किसून घालू शकता. चिप्स थोडेसे डेकोरेट करावे म्हणजे आपले मुलं ती जास्त आवडीने खातात.

  8. 8

    मी फोटोमध्ये सर्व स्टेप तुम्हाला दाखवलेले आहेत तर हे झाले आपले मेक्सिकन बरिटो बाउल तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
रोजी

Similar Recipes