रवा बेसन चे पाकातले लाडू (rava besan pakatle ladoo recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

आज बघता बघता मी केलेल्या पदार्थांने शंभरी गाठली. खरं तर एखाद्या कामाची सुरुवात किंवा कुठलेही आनंदाचे क्षण आपण नेहमीच गोडाच्या पदार्थाने करीत असतो. आपला आनंद दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे ते एक माध्यम ठरते. आणि म्हणूनच माझा आनंद ह्या गोड पदार्थाच्या साक्षीने तुमच्याबरोबर साजरा करण्याचा मोह मीआवरू शकले नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
10-12 सर्विंग
  1. 1 वाटीबारीक रवा
  2. 1 वाटीबेसन
  3. 1 वाटीतूप
  4. 1 टेबलस्पूनवेलची पूड
  5. 1 टेबलस्पूनड्रायफूट्स

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम एका पॅनमध्ये एक वाटी तुप घालुन रवा आणि बेसन मंद ते मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या.आवश्यक असल्यास थोडे तुप आणखी घेऊ शकता. बेसन आणि रव्याला लालसर रंग आला की रवा बेसन छान भाजले गेले असे समजावे. तूपही थोडं वर आलेले दिसेल.

  2. 2

    आता एका पातेल्यात एक वाटी साखर घेऊन साखर बुडेल इतपत पाणी घालावे. व त्याचा एक तारी पाक करून घ्यावा. आता भाजलेला रवा बेसन मध्ये वेलची पूड, ड्राय फ्रूट्स घालून त्यात पाणी घालून छान मिक्स करून घ्या.

  3. 3

    मिश्रण थोडं थंड होऊ द्या. आता त्याचे लाडू वळून घ्या.जर लाडू वळत नसतील तर दोन ते तीन छोटे चमचे गरम पाणी घाला. तुम्ही तूपही घालू शकता अथवा दूध.(दुधामुळे लाडू जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे दूध घालू नका.) लाडू वळताना सजावटीसाठी किसमिस अथवा चांदीचा वर्ख लावून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes