चणे,चक्री कोहळा पकोडे (chane kohala pakoda recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#GA4 #week3

गावरान काळे चणे चवीला जेवढे छान तेवढेच आरोग्यपुर्ण ,.सोबतीला चक्री कोहळं (ईकडे विदर्भात हे नाव आहे ) असलं तर भन्नाट संयोग आणि मोहन न वापरता कुरकुरीत, खुसखुशीत पकोडे , क्षणातच संपणार .. प्रयोग करून पहावेत नवे .. गोल्डन ऍप्रन 4
मधील पकोडा हा कीवर्ड उचलला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4/5 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमभिजवलेले काळे चणे
  2. 100 ग्रॅमचक्री कोहळं
  3. 2-3हिरव्या मिरच्या
  4. 8-10लसूण पाकळ्या
  5. 2-3कढीपत्त्याची पाने
  6. 1 टीस्पूनबडीशेप
  7. 1/2 टीस्पूनमीठ
  8. 2 टीस्पूनकसुरी मेथी
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनधणे पावडर
  11. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  12. तळणासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले, चणे,बडीशेप, मीठ, धणे पावडर,हळद, कसुरी मेथी व तिखट एकत्र करून घ्यावे.

  2. 2

    मिश्रण मधील साहित्य सरबरीत वाटून घ्यावे व चक्री कोहळं बारीक किसून घ्यावे. वाटलेले साहित्य व कीस एकत्र करावा.

  3. 3

    कढईत तेल गरम करायला ठेवावे व पकोडे खमंग तळून घ्यावेत. हे पकोडे तळण्यासाठी तेल अत्यंत कमी लागतं. त्यामुळे पकोडे कुरकुरीत तर होतातच पण तेलकट अजिबात होत नाहीत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

Similar Recipes