झणझणीत वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)

बाजारात वांग्याची आवाक वाढली की घराघरांत वांग्याच्या पदार्थांची मेजवानीच असते. त्यामध्ये वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. आज मी तुमच्या सोबत वांग्याच्या भरीताची रेसिपी शेअर करते आहे.
झणझणीत वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
बाजारात वांग्याची आवाक वाढली की घराघरांत वांग्याच्या पदार्थांची मेजवानीच असते. त्यामध्ये वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. आज मी तुमच्या सोबत वांग्याच्या भरीताची रेसिपी शेअर करते आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम वांग्याला तेल लावून सर्व बाजूंनी वांगे भाजून घ्यावे.
- 2
आता वांगे सोलून आतील गर बाजूला काढून मॅश करून घ्यावा.
- 3
एका कढईत तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात जीरे टाकावे.
- 4
आता त्यात बारीक चिरलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकावेत.
- 5
आता त्यात बारीक चिरलेला टमाटर, पातीचे कांदे आणि हिरवे मटर टाकून मिक्स करुन घ्यावे.
- 6
आता त्यात हळद, तिखट आणि धनेजिरेपूड टाकावे.
- 7
चवीनुसार मीठ आणि सोललेल्या वांग्याचा गर टाकून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि साधारणतः 10 ते 15 मिनिटे मध्यम आचेवर भाजीला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावी.
- 8
सर्व्हिंग वाटी मध्ये काढून त्यावर कोथिंबीरने गार्निश करून गरमागरम वांग्याचे भरीत भाकर किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#cooksnap#Shilpakbele मी आज वांग्याच्या भरीताची रेसिपी कुक स्नॅप केली आहे. त्यामध्ये थोडे चेंजेस केले आहेत. परंतु एकंदरीत भरीत खूप छान झाले आहे. काही सामग्री उपलब्ध नसल्याने त्याऐवजी मी दुसरी सामग्री वापरली आहे. Varsha Ingole Bele -
चविष्ट- झणझणीत वांग्याचे भरीत (Vangych Bharit recipe in Marathi)
वांग्याचं भरीत ही माझ्या नवर्याची सर्वात आवडीची रेसिपी आणि म्हणून कुक पॅड साठी सर्वात पहिली रेसिपी म्हणून मी याची निवड केली.वांगी या फळभाजी ला आहारशास्त्रात महत्वाचे स्थान आहे.त्याचा रंग, आकार , गुणधर्म डोक्यावर ताजसारखा असणारा देठाचा भाग.याची भाजी, भरीत, वांगी भात, न आवडणारा विरळाच.मी माझ्या पद्धतीने ही वांग्याच्या भरीताची रेसिपी इथे शेअर केली आहे तुम्हाला नक्की आवडेल. Prajakta Vidhate -
फोडणीचे वांग्याचे भरीत (fodaniche wangyache bharit recipe in marathi)
हिवाळा आला तसा भरीतासाठी चांगले वांगे यायला लागतात! आणि या वांग्याच्या भरिताची चव काही वेगळीच असते! तसे पाहिले तर भरीत हा प्रकार वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो! मी मात्र आज , वांगी भाजून, त्याला फोडणी देऊन, भरीत केले आहे ....छान लागते चव .... Varsha Ingole Bele -
वांग्याचं भरीत (wangyache bharit recipe in marathi)
#GA4#week9- गोल्डन ऍप्रन मधून मी वांग हा शब्द घेऊन वांग्याचं भरीत हा पदार्थ बनवला आहे. वांग्याचे पदार्थ खूप वेगवेगळ्या प्रकारांनी बनवले जातात. वांग्याची भाजी,वांग्या चा भात असे अनेक पदार्थ बनवले जातात. Deepali Surve -
वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#हिवाळा स्पेशलहिवाळा सुरू झाला की बाजारात मस्त ताज्या ताज्या भाज्या येतात. आज अशीच बाजारात भरीताची वांगी दिसली. मस्त बेत झाला, वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी.... Deepa Gad -
खान्देशी वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रहिवाळा सुरू होताच वांग्याच्या भरिताला मागणी वाढते. शेत-मळ्यातून भरीत पार्ट्या रंगू लागतात. पण भरीत म्हटलं की, सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं खान्देशी वांग्याचे भरीत. पण असे हे भरताचे वांगे मला ऑक्टोबर मध्ये ही भेटले मस्त गोल गरगरीत वांगी, कांदयाची पात आणि लसुन मिरचीच्या ठेच्याने दिलेली फोडणी यांच्या सहाय्याने तयार केलेलं भरीत एकदा खाल्लं की त्याची चव जिभेवर रेंगाळतच राहते. तुम्हालाही हे भरीत खायचंय? अहो त्यासाठी खान्देशात जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने हे भरीत तयार करू शकता. जाणून घेऊया खान्देशी स्टाइलने भरीत तयार करण्याच्या रेसिपी बाबत... Vandana Shelar -
वांग्याचे कच्चे भरीत (Vangyache Kache Bharit Recipe In Marathi)
#GR2 ..गावरान रेसिपी निमित्ताने केलेले, आवडीचे वांग्याचे कच्चे भरीत.. ग्रामीण भागात चुलीमध्ये भाजलेल्या वांग्याच्या भरीताची चव वेगळीच.. आणि त्यातही हे वांग्याचे भरीत फोडणी न देता कच्चेच, पातीचा कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो इत्यादी कमीत कमी सामग्री टाकून... झटपट होणारे.. गरमागरम भाकरी सोबत मस्त लागते.. तेव्हा बघूया हे गॅसवर भाजलेल्या वांग्याचे कच्चे भरीत.. Varsha Ingole Bele -
वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
आज मी वांग्याचे भरीत करत आहे. पातीचा कांदा,मटार ,टोमॅटो,हिरव्या मिरच्या टाकलेले हे भरीत ज्वारीच्या भाकरी बरोबर ठेचा किंवा कोशिंबीर बरोबर खाल्ले तर जेवणाची मजा काही निराळीच असते. rucha dachewar -
वांग्याचे कच्चे भरीत (vangyache kacche bharit recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल वांग्याचे कच्चे भरीतखान्देशात वांगी खूप प्रसिद्ध आहेत खास हॉटेल मध्ये जावून वांग्याची भाजी,भरीत यांची मेजवानी करतात....खूपच मस्त झटपट तयार होणारे भरीत आहे....नक्की करून पहा.... Shweta Khode Thengadi -
खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#week9#eggplant#GA4वांग्याचे नाव एकताच तोंड फिरवणारे बरेच लोक आपल्याला दिसतील यांना वांगे अजिबात आवडत नाही वांग्याची भाजी पेक्षा काही लोकांना वांग्याचे भरीत जास्त आवडते पण काहीही असो आपल्याकडे बऱ्याच लोकांच्या मतानुसार वांगे इतके महत्त्वाचे नाही आहे बऱ्याच लोकांना माहित नसेल की वांग यातही खूप गुणधर्म असतात वांग्याच्या भाजीत भरपूर अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते वांग्याची भाजी आहारातून घेतल्याने आरोग्यावर बरेच फायदे होतात भूक नियंत्रणात असते आणि भरपूर बिया असल्यामुळे त्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारातून वांगे घेतलेले चांगले वांगे हे लोह आणि कॅल्शियम समृद्ध आहे वांग यातही आयुर्वेदिक गुणधर्म असतात. पूर्ण भारतात बऱ्याच प्रकारच्या वांग्याची प्रकार बघायला मिळतील सगळ्यांच्या बनवण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहे मी तयार केलेली वांग्याची भाजी म्हणजे वांग्याचे भरीत जे महाराष्ट्राच्या खानदेश भागात बनवतात त्या प्रकारे बनवले आहे. या वांग्याच्या भरीतबरोबर कळण्याची भाकर बनवतात मी मल्टीग्रेन ची भाकरी बनवली आहे माझ्याकडे वांग्याचे भरीत सर्वात जास्त आवडते. बऱ्याच भागात वांगे शेकून कच्चे तेल कच्चा मसाला टाकून वांग्याचे भरीत तयार केले जाते मी पांढऱ्या रंगाचे खान्देशी वांगे वापरून भरीत तयार केले आहे. जांभळ्या रंगाचे ही मोठे वांगी भरीत साठी मिळते . आपल्या मराठी चे खूप फेमस शेफ विष्णू मनोहर सर यांनी 2018 मध्ये जळगाव मध्ये 2500 किलो वांग्याचे भरीत बनवण्याचा विश्वविक्रम रचला आहे विष्णू सरांचे असे बरेच विश्वविक्रम आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या ऑथेंटिक पदार्थ खूपच मोठ्या प्रमाणात बनवून विश्वविक्रम बनवले आह Chetana Bhojak -
खान्देशी वांग्याचे भरीत.. (khandeshi wangyache bharit recipe in marathi)
...खान्देशी वांग्याचे भरीत...#GA4#week9#eggplant#cooksnap#AmitChaudhariहिवाळा सुरू झालाय, मस्त थंडी पडायला लागली आहे. आणि अशा थंडीमध्ये वांग्याचे भरीत, मिरचीचा ठेचा, गरमागरम भाकर खावशी वाटणार नाही असा एकही व्यक्ती आपल्याला आढळणार नाही... त्याला अपवाद मीदेखील कशी असणार बरं..?म्हणून मग मीही भरीत करण्याचा बेत ठरविला. पण नागपूरच्या पद्धतीने न करता, खान्देशी पद्धतीनेAmit Chaudhari सरांच्या रेसिपी वरून, करून बघितले. अमित सरांनीची पद्धत वापरून केलेले हे भरीत, चवीला खुपच भन्नाट आणि एक नंबर झालेले आहे.तेव्हा तुम्हीही नक्की ट्राय करा *खान्देशी वांग्याचे भरीत*... 💃 💕 Vasudha Gudhe -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#cooksnapअंजली पेंडुरकर यांची वांग्याची भरीत याची रेसिपी खूप छान तयार झाली. Ankita Khangar -
वांग्याचे भरीत (खान्देशी) (wangyache bharit recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#cooksnapमहाराष्ट्रातील खान्देश म्हटला की खवय्यांना आठवते ते तेथील वांगी आणि प्रसिद्ध वांग्याचे भरीत. खान्देशी वांग्याचे भरीत करण्यासाठी खास हिरवी वांगी वापरली जातात, जी जळगावात मोठ्या प्रमाणात मिळतात. आता शहरातही मिळू लागली आहेत. Kalpana D.Chavan -
मिनी सँडविच उत्तपम (mini sandwich uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 #उत्तपमउत्तपम ह्या की-वर्ड पासून बनविलेली आणि लहान मुलांना टिफिनमध्ये देता येईल अशी झटपट, सोपी रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते आहे. चला तर मग रेसिपी बनवूया...... सरिता बुरडे -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश हिरव्या वांग्याचे भरीत . Rajashree Yele -
जळगाव स्पेशल वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
मी पुजा व्यास मॅडम ची जळगाव प्रसिद्ध वांग्याचे भरीत ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चविष्ट वांग्याचे भरीत मला खूप आवडले. Preeti V. Salvi -
अस्सल खान्देशी वांग्याचे भरीत आणि कळण्याची भाकरी (vangyach bharit ani bhakhri recipe in marathi)
#KS4दख्खन पठाराच्या उत्तरेला विविध वैशिष्टय़ांनी नटलेला व गिरणा, तापी, वाघूर या नद्यांनी समृद्ध असलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश.खान्देशी ठसकेबाज ,श्रमिक दिनचर्या, त्यालाच अनुरूप झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण...😋😋खानदेशची, अर्थातच धुळे-जळगाव-नंदुरबार या तीन जिल्ह्यांची, स्वतंत्र अशी एक खाद्यसंस्कृती आहे.खानदेश म्हटलं की वांग्याचं भरीत आणि कळण्याची भाकरी यालाच खान्देशात कळणा असे म्हणतात. ज्वारी आणि अख्खे काळे उडीद मिक्स करून दळून आणून याची भाकरी बनवली जाते.खान्देशी वांग्याचे भरीत मी अनेकदा बनवलं..पण कळण्याची भाकरी पहिल्यांदाच बनवून पाहिली .. वांग्याच्या भरीतासोबत ही भाकरी खूपच चवदार लागते.चल तर ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
हिरव्या वांग्याचे फोडणीचे भरीत (hirvya wangyache bharit recipe in marathi)
#GA4#week9#eggplantएगप्लॅंट म्हणजेच वांगे हा clue घेऊन मी ही चमचमीत भरताची रेसिपी केली आहे.मस्त चूरचूरीत फोडणी दिलेले भरीत म्हणजे जिव्हेची रसनापूर्ती च....तर मग तूम्ही ही करून बघा मस्त चमचमीत हिरव्या वांग्याचे फोडणीचे भरीत... Supriya Thengadi -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#cooksnap वांग्याचे भरीत मूळ रेसिपी रुपाली अत्रे-देशपांडे यांची मी आज बनवली आहे पटकन होणारी स्वादिष्ट गावरान पाककृती तर मग बघूयात कशी करायची ते Pooja Katake Vyas -
वांग्याचे भरीत (विदर्भीय पद्धत) (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#GR2थंडीच्या दिवसात बाजारात विविध प्रकारची वांगी दिसतात एकदम छोटी, लांबट ,जांभळी, पांढरी, हिरवी अशी अनेक प्रकारची, अनेक आकाराची वांगी बाजारात दिसतात आणि त्याचे तेवढेच प्रकार आपल्याला करता येतात. वांग्याचा सगळ्यात आवडणारा पदार्थ म्हणजे वांग्याचे भरीत. आज आपण दही न घालता वांग्याचे भरीत ( ही पद्धत विदर्भीय आहे) करून बघणार आहोत. Anushri Pai -
वांग्याच भरीत अन् ज्वारीची भाकरी (wangyache bharit ani jwarichi bhakri recipe in marathi)
वांग्याच भरीत आणि ज्वारीची भाकरी म्हंटल की तोंडाला पाणी सुटतं. आज या मेजवाणीचा बेत केला. आपणही आस्वाद घ्या. Pritibala Shyamkuwar Borkar -
खांन्देश चे प्रसिद्ध लेवा पाटील समाजाचे वांग्याचे भरीत (vange bharit recipe in marathi)
खांन्देशातील लेवा पाटील समाजाचे भरीत हे खुप प्रसिद्ध आहे ते बनवण्याची पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. Amit Chaudhari -
वांग्याचं भरीत, भेंडी ची कढी (wangyache bharit bhendi kadhi recipe in marathi)
सख्यांनो,शेतावरची भाजी मिळाली की करायला वेगळाच हुरूप येतो.माझ्या मैत्रीणीने देखील अशीच ताजी वांगी आणून दिली.म्हणून मग मी भरीत करण्याचा बेत आखला. Archana bangare -
खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#Ks4 वांग्याचे भरीत सगळ्यांचीच आवडती डिश आहे त्यात सफेद हिरवट वांग्यांचे भरीत त्याची चवच न्यारी चला तर मस्त ताजी ताजी आमच्या फार्मवरच्या वांग्याचे अफलातुन भरीत तुम्हाला आज दाखवते Chhaya Paradhi -
वांग्याचे भरीत हिरव्या पातीच्या कांद्यासह ( wangyache bahrit hirwya patichya kandyasah recipe in mar
#GA4 #week11हिवाळ्यात वांग्याचे भरीत खाण्याची मजा वेगळीच .सोबत ज्वारी हुरडा पार्टी असेल तर हाहा. Dilip Bele -
झणझणीत वांग्याचे भरीत (vangyachi bharit recipe in marathi)
सकाळी भाजी करताना फ्रिज मध्ये तीन वांगी दिसली .मी कधी लहान वांग्याचे भरीत बनवले नाही पण हिरवी गार वांगी पाहून करायची इच्छा झालीआणि अगदी साध्या पद्धतीने बनवली . Adv Kirti Sonavane -
भाजून बनवलेले वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
ही माझ्या आवडीची भाजी. खमंग भाजल्याचा घरभर पसरलेला वास & नंतर मस्तपैकी दह्यासोबत वांग्याचे भरीत खाण्याची मजाच वेगळी असते. Radhika Gaikwad -
गावाकडचे हिरव्या वांग्याचे स्वादिष्ट भरीत (Hirvya Vangyache Bharit Recipe In Marathi)
#NVR... नागपूर साइडला भरिताचे हिरवे वांगे मिळतात. त्याच्या भरिताची चव वेगळीच असते. अशा या वांग्याचे भरीत केले आहे मी, आज.. आणि त्यात टाकले आहे, यावेळी मिळणारे तुरीचे दाणे आणि मेथी... Varsha Ingole Bele -
जळगावी वांग्याचे भरीत (Jalgavi Vangyache Bharit Recipe In Marathi)
#NVR जळगाव ला एक भरीत करण्याची खास पद्धत आहे. खानदेशी पद्धत आणि ते भरीत या स्टाईलने केलं तर जास्ती छान लागते. या भारतासाठी वांगी ही वेगळी असतात. हिरवी कमी बिया कमी आणि जास्त गर नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
गव्हाच्या कुरडईचे पौष्टिक नूडल्स (kurdai noodle recipe in marathi)
#GA4 #week2 #Noodlesगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील नूडल्स ह्या की-वर्ड पासून बनविलेली रेसिपी मी आज शेअर करते आहे.ही रेसिपी बनविण्यामागची एक गंमत मी सांगते. 4-5 वर्षांपूर्वी मॅगी नूडल्सवर बंदी घालण्यात आली होती आणि त्यामुळे माझे नूडल्स खाणे सुद्धा बंद झाले होते. मग आता नूडल्स आणायचे कुठून? नूडल्स बनवून खाण्याची तर खूप इच्छा व्हायची. मग मी ह्या रेसिपीचा शोध लावला. घरगुती साहित्य वापरून रेसिपीची पौष्टिकता तर वाढविली शिवाय नूडल्स खाण्याचे मला समाधानही झाले. चला मग रेसिपी बनवूया...... सरिता बुरडे
More Recipes
टिप्पण्या