व्हेज मायो सँडविच (veg mayo sandwich recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#GA4 #week12
गोल्डन ऍप्रॉन मध्ये मायोनीस हा कीवर्ड ओळखून आज झटपट होणारे आणि मुलांना आवडणारे असे व्हेज सँडविच बनवले आहे.

व्हेज मायो सँडविच (veg mayo sandwich recipe in marathi)

#GA4 #week12
गोल्डन ऍप्रॉन मध्ये मायोनीस हा कीवर्ड ओळखून आज झटपट होणारे आणि मुलांना आवडणारे असे व्हेज सँडविच बनवले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कप बारीक चिरलेला कोबी
  2. 1/4 कप खिसलेले गाजर
  3. 1/4 कप शिमला मिरची
  4. 1काकडी
  5. कोथिंबीर
  6. 1 टीस्पून चाट मसाला
  7. 1 टीस्पून मिरे पूड
  8. 1 टीस्पून चिली फ्लेक्स
  9. 3-4 टेबलस्पून मायोनीस सॉस
  10. 8-10व्हाईट ब्रेड / ब्राउन ब्रेड
  11. आवश्यकतेनुसार बटर
  12. आवश्यकतेनुसार टोमॅटो केचअप

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम आपल्या आवडीनुसार भाज्या स्वच्छ धून घेणे. व सगळ्या भाज्या बारीक चिरून घेणे.

  2. 2

    नंतर या चिरलेल्या भाज्या एका बाउल घेणे. व त्यात चवीनुसार मिरेपूड, चाटमसाला, चिली फ्लेक्स आणि मायोनीस सॉस घालून ते सर्व एकत्र करून घेणे.

  3. 3

    नंतर एका प्लेट मध्ये 4 ब्रेड चे स्लाइस ठेवावेत. त्यातील 2 स्लाइस ला टोमॅटो सॉस लावून घेणे. व 2 स्लाइस ला बटर लावावा. ज्या स्लाइस ला बटर लावला आहे त्यावर तयार केलेले भाजी स्टफीन्ग पसरून घेणे. व त्या वर टोमॅटो सॉस लावलेला स्लाइस ठेवणे.

  4. 4

    नंतर गॅस वर तवा गरम करण्यासाठी ठेवून त्या वर थोडे बटर पसरून घेणे व बंद केलेले सँडविच तव्यावर दोनीही बाजूने बटर वर भाजून घेणे.

  5. 5

    व ते एका प्लेट मध्ये घेऊन सुरीने ते कट करून घेणे अशाप्रकारे व्हेज तवा सँडविच तयार झाले. दुसरे सँडविच प्लेन ही करू शकता. सर्व्ह करताना आवडत असल्यास वरून चीझ खिसुन घालावे. व सॉस सोबत सर्व्ह करावे.

  6. 6

    तवा सँडविच आणि व्हेज प्लेन सँडविच तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes