व्हेज चटणी सँडविच (veg chutney sandwich recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#बालदिन_विशेष_रेसिपी..

#CDY

#व्हेज_चटणी _सँडविच

"कशाला मिळालंय आपल्याला हे शहाणपण..
हरवलंय त्यात हे सुंदर बालपण"...कुठेतरी वाचलेलं हे वाक्य आता पुन:पुन्हा बालपणाकडे घेऊन जातं..लहान असताना वाटायचं मोठं झाल्यावर खरी मजा येईल..लहानपणी एकच गैरसमजच होता की मोठे झाल्यावर जीवन आणखी मजेदार होईल...मोठं झाल्यावर आपल्या भ्रमाचा हा भोपळा असा काही फुटतो की बास..😀..रम्य ते बालपण म्हणत मन पुन्हा बालपणीच्या गोष्टींमध्ये रमते ...आजच्या थीमच्या निमित्ताने या सुखाच्या बालपणात मला अगदी साधं,जास्त तामझाम नसलेलं व्हेज चटणी सँडविच खूप आवडायचं..तेच माझ्या मुलांनाही खूप आवडतं पण चीज add करुन ...🍔लहानपणीचं खादाडी मधलं माझं आवडतं खाणं आणि माझ्या मुलांचही प्रचंड आवडतं खाणं म्हणजे व्हेज चटणी सँडविच,ब्रेड बटर,toast jam सँडविच..😋😋 चला तर मग व्हेज चटणी सँडविच या सोप्या रेसिपीकडे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीटे
4जणांना
  1. 7 ब्रेड
  2. 1 टीस्पूनबटर
  3. 3टोमॅटो
  4. कांदा
  5. काकडी स्लाईस
  6. 1 टेबलस्पूनचाट मसाला किंवा सँडविच मसाला,किंवा सैंधव मीठ
  7. चीज स्लाईस optional
  8. हिरवी चटणी कोथिंबीर
  9. पुदिना
  10. आलं
  11. मिरची
  12. मीठ
  13. साखर
  14. जीरे
  15. बारीक शेव
  16. टोमॅटो सॉस

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एका ठिकाणी गोळा करून घ्या कांदा टोमॅटो काकडी यांचे स्लाईस करून घ्या हिरवी चटणी करून घ्या

  2. 2

    आता ब्रेडला बटर हिरवी चटणी लावून घ्या आणि त्यावर टोमॅटो कांदा काकडी यांचे स्लाईस ठेवा वरून चाट मसाला किंवा सैंधव मीठ किंवा सँडविच मसाला भुरभुरावा नंतर हवे असल्यास थोडा टोमॅटो सॉस घाला आणि ब्रेडची दुसरी स्लाईस त्यावर ठेवा

  3. 3

    तयार झाले आपले व्हेज चटणी सँडविच एका डिश मध्ये टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes