आवळा कोकोनट लड्डू (amla coconut ladoo recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#CookpadTurns4
कूकपॅड ला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्याने मी रेसिपी पोस्ट करते आहे,हि खर तर माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे.आणी म्हणूनच मी त्यासाठी हि खास रेसिपी पोस्ट करते आहे.....आवळा म्हणजे खरे तर एवढे nutritious fruit आहे की,आयुर्वेदातही याला खुप महत्व आहे.यापासुन कुठलाही पदार्थ केला तरी तो पौष्टीक च होतो.आणि म्हणूनच cook with fruits मधे मी आवळा हे फळ निवडले आणी ही रेसिपी केली आहे. हे लड्डू
खरच मस्त होतात हे लाडू...व्हिटामिन सी ने युक्त असे हे पौष्टीक लाडू आहेत.मग करून बघा तुम्ही पण..,,.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 8—10आवळे
  2. 1/2 वाटीडेसिकेटेड कोकोनट
  3. 1/2 चमचावेलची पुड
  4. 1/2 वाटीबेसन
  5. तूप आवश्यकतेनुसार
  6. 1/2 वाटीबदाम पावडर
  7. 1 वाटीपिठीसाखर
  8. सिल्वर फॉईल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम आवळे स्वच्छ धुवुन घ्या.आणि स्टिमर मधे वाफवुन घ्या.

  2. 2

    आता दहा मिनिटानी आवळे वाफल्यावर ते थंड होउ द्या.आणि त्याचा गर काढून घ्या.

  3. 3

    आता या गराला मिक्सरमधे वाटून बारीक पेस्ट करून घ्या.

  4. 4

    आता एका पॅन मधे तुप टाकुन त्यात हा गर सात आठ मिनिटे छान परतुन घ्या.

  5. 5

    आता यात डेसिकेटेड कोकोनट टाकुन दोन मिनिट परतुन गॅस अॉफ करा.मिश्रण थंड होउ द्या.

  6. 6

    तोपर्यंत बेसन तुपात भाजुन घ्या.

  7. 7

    आता हे भाजलेले बेसन,मिश्रणात एकत्र करा.बदाम पावडर घाला. आणि पिठीसाखर ही मिसळून घ्या.आणी एक सॉफ्ट गोळा करून घ्या.

  8. 8

    आतायाचे लाडू करून घ्या.आणि वरून सिल्वर फॉईल लावा.

  9. 9

    आता आपले मस्त टेस्टी आंबटगोड आवळा कोकोनट लाडू तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes