सात्विक/आयुर्वेदिक लाडू (satvik ladoo recipe in marathi)

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
Almere, Netherlands

#rbr
#रक्षाबंधन_स्पेशल_स्वीट_डिश
सात्विक म्हणण्याचं कारण असे की या लाडू मध्ये नो बटर, नो तूप, नो साखर ...super healthy आणि तरीही sweet आयुर्वेदिक पद्धतीने बनवले गेलेले हे लाडू आहेत.. रक्षाबंधन आलंय जर का तुम्हाला गोड खावं वाटत पण डाएट किंवा हेल्थ issues astil तरी काळजी करण्याचं कारण नाही हे लाडू परफेक्ट आहेत.. दिसायला आणि चवीला सुध्दा ...चला तर recipe पाहुयात..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिन
३-४ लोक
  1. २०० ग्रॅम बदाम
  2. 1 कपसुख किसलेले खोबरे किंवा डेसिकेटेड कोकोनट
  3. 4-5वेलची
  4. 2 टेबलस्पूनगुळ पावडर
  5. ८-१० भिजवलेले बदाम
  6. सुक्या गुलाबाच्या पाकळ्या

कुकिंग सूचना

३० मिन
  1. 1

    प्रथम बदाम कोरडे भाजून घ्यावेत..मग ते एका मिक्सर च्या भांड्यात बारीक करून घ्यावेत...३-४ मिन बदाम पावडर ला तेल सुटत नाहीत तोपर्यंत बारीक करून घ्यावेत..कारण बदमाला आणि सुक्या खोब्र्याला स्वतःच असे तेल असते त्यातच आपण लाडू वळणार आहोत..फोटोत दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टेन्सी असायला हवी.

  2. 2

    आता बदाम पेस्ट एका बाउल मध्ये काढून त्याच मिक्सर च्या भांड्यात सुखे खोबरे घ्यावे आणि तशीच प्रोसेस करावी..तेल सुटेपर्यंत बारीक करून घेणे..

  3. 3

    आता हे खोबऱ्याचे मिश्रण ही त्याच बाउल मध्ये घेऊन त्यात गूळ पावडर घालावी..खोबऱ्याचे पेस्ट करताना त्यात वेलची ही घालावीत.खूप छान फ्लेवर येतो..

  4. 4

    आता सगळं एकत्र केलेल्या मिश्रणात सुक्या गुलाबाच्या पाकळ्या आणि भिजवलेले बदामाचे काप घालून लाडू वळून घ्यावेत...अतिशय चांगल्या पद्धतीने लाडू वळले जातात..बिना तुपाचे ही..पौष्टीक असे सात्विक लाडू खाण्यासाठी तयार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
रोजी
Almere, Netherlands
"Cooking with love provides food for the soul.."
पुढे वाचा

Similar Recipes