आवळा कॅन्डी (Awala Candy Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज या थीम साठी मी आवळा कॅन्डी ही रेसिपी पोस्ट करत आहे. हिवाळ्यात बाजारात आवळे सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि आवळया मध्ये सी जीवनसत्व आणि प्रतिकार शक्ती वाढते.

आवळा कॅन्डी (Awala Candy Recipe In Marathi)

#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज या थीम साठी मी आवळा कॅन्डी ही रेसिपी पोस्ट करत आहे. हिवाळ्यात बाजारात आवळे सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि आवळया मध्ये सी जीवनसत्व आणि प्रतिकार शक्ती वाढते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीन
  1. 500 ग्रॅमआवळा
  2. 1 इंचआले
  3. 1 मोठा चमचातूप
  4. 500 ग्रॅमगूळ
  5. 1 चमचावेलची पावडर
  6. तूप
  7. चवीनुसारमीठ
  8. पिठीसाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम 500 ग्रॅम आवळे घेऊन, ते स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेतले. आणि स्वच्छ फडक्याने चांगले पुसून घेतले.

  2. 2

    मग एका पातेल्यात पाणी घालून, पाण्याला उकळी आल्यावर एका स्टीलच्या चाळणीवर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आवळे ठेवून झाकण लावून मोठ्या गॅसवर 15 ते 20 मिनिटे शिजवून घेतले. आणि गॅस बंद करून घेतला.

  3. 3

    नंतर आवळे पूर्ण पणे थंड झाल्यावर
    हलक्या हाताने आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या.आणि त्यातील बीया काढून टाकल्या.

  4. 4

    मग आवळ्याच्या पाकळ्या, मिक्सरच्या भांड्यात घालून, त्यात 1.5 इंच आले किसून घातले. आणि बारीक वाटून घेतले.

  5. 5

    नंतर एका कढईत 1 चमचा साजूक तूप घालून त्यात आवळ्याचे मिश्रण घालून, 3 ते 4 मिनिटे तुपावर चांगले परतून घेतले. आणि त्यात 1 चमचा मीठ, 450 ग्रॅम घालून आवळ्याच्या रसामध्ये चांगला विरघळवून घेतला. आणि रस दाटसर होईपर्यंत म्हणजे 30 ते 35 मिनिटे मध्यम गॅसवर घट्टसर होईपर्यंत परतून घेतले. मग त्यातला छोटा गोळा काढून, थंड झाल्यावर, हाताला थोडे तूप लावून गोळी करून पाहिले.जर गोळी व्यवस्थित झाली म्हणजे आपले मिश्रण चांगले तयार झाले.

  6. 6

    मग वरील मिश्रणात 1 चमचा वेलची पावडर, आणि 1 चमचा साजूक तूप घालून ते चांगले मिक्स करून घेतले.

  7. 7

    नंतर एका तूप लावलेल्या ताटामध्ये आवळ्याचे मिश्रण काढून घेतले, आणि संपूर्ण थंड करून घेतले. आणि त्याचे छोटे, छोटे गोळे करून घेतले. मग तयार गोळे पिठी साखरे मध्ये घोळवून घेतले. म्हणजे गोळे एकमेकांना चिकटणार नाहीत.

  8. 8

    मग साखरे मध्ये घोळवून घेतलेलया कॅन्डी एका चाळणीत घालून ते चाळून घेतले, म्हणजे जास्तीची पिठीसाखर निघून जाते. आणि जेवढी हवी तेवढीच साखरेचे कोटिंग त्या कॅन्डीला राहते.

  9. 9

    आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपल्या चटपटित सॉफ्ट अशी आवळा कॅन्डी तयार आहेत. ह्या आवळा कँडी हवा बंद बरणीला पाण्याचा हात न लावता वर्षभर चांगल्या राहतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Similar Recipes