इम्युनिटी बूस्टर डिंक लाडू... थंडी मधली must खादाडी..😋 (dink ladoo recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#GA4 #Week15 की वर्ड--गूळ
इम्युनिटी बूस्टर डिंक लाडू...अर्थात थंडीतील खाऊची खादाडी..😍😋थंडीचा मोसम म्हणजे भाजीपाला, फळफळावळ,सुकेमेवे,दूधदुभतं,सूप्स,सलाड्स, लाडू,वड्या,खिरी ,शिरा,विविध प्रकारचे हलवे ,आवळा,मिरची,लिंबाची लोणची , चटण्या ,तीळ गुळ,मुबलक तेलाचा आणि साजूक तुपाचा घसघशीत वापर 🤩आणि बरंच काही...
लहानपणी आई म्हणायची .‌.अरे खाऊन घ्या सगळं आत्ता या थंडीमध्ये...आत्ता खाल्लेलं अंगी लागतं..वर्षभर उपयोगाला येईल...मग तुमच्या शरीराला दगड पचवायची पण ताकद येईल..🤔... कळायचं नाही तेव्हां‌..असं वाटायचं की आम्ही खावं म्हणून आपलं काहीतरी लपेट मारतीये आई आम्हांला...दगड कधी खातो का आपण तर मग पचवणार कसे🤔खरंच मलातरी असंच वाटायचं...बालबुद्धी हो..पण मग हळूहळू त्या दगडाचा अर्थ जसजसे मोठे होत गेलो तसे समजत गेला..दगड पचवायची ताकद म्हणजेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती,immunity system..वाढते आणि मग त्यामुळे आपण रोगांशी आणि polltion शी मुकाबला करुन शकतो.. आईची माया, तळतळ दुसरं काय...हम्म्म्...जावे त्यांच्या वंशा..हेच खरं..शरीरस्वास्थ्याची जशी काळजी घेते ही माऊली तसचं मनाच्या स्वास्थ्यासाठी ही मायेची ऊब खूप आधार देते कायम..ही मायेची ऊब मिळाली की किती बरं वाटतं ना आपल्याला..
खरंतर आता काही वर्षांपासून मुंबईची थंडी इनमिन २०-२५ दिवसांची पाहुणी झालीये..पूर्वीसारखा ४ महिने मुक्काम नसतो तिचा आताशा.. उणेपुरे ५-६ दिवस हेच फक्त GST चे..म्हणजे..🤔.अहो गोधडी स्वेटर,टोपीचे.😀हे सगळं असलं तरी खाद्यसंस्कार गप्प बसून देत नाहीत ना...नियम म्हणजे नियम...विषय संपला...म्हणूनच मग हा सगळा थंडीच्या खाऊचा आणि मायेच्या उबेचा प्रपंच.मागच्या वर्षी डिंकाचे साखरेचे लाडू केले होते.आतायावर्षीगुळाचेकेलेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50-60 मिनीटे
30-35 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमसुके किसलेले खोबरे
  2. 250 ग्रॅमखारीक पावडर
  3. 2 टेबलस्पूनखसखस
  4. 300 ग्रॅमसाजूक तूप
  5. 2 कपकाजू बदाम पिस्ता अक्रोड यांची भरड पूड
  6. बेदाणे आवडीनुसार
  7. 100 ग्रॅमकच्चा डिंक पावडर
  8. 1.5 -2 कप गूळ आवडीनुसार
  9. 1 टेबलस्पूनमेथी पावडर ऐच्छिक..मी नाही घातली.

कुकिंग सूचना

50-60 मिनीटे
  1. 1

    प्रथम एका डब्यात कच्चा डिंक पूड साजूक तुपात 7-8 दिवस भिजत ठेवा.

  2. 2

    नंतर लाडू ज्या दिवशी करायचे आहेत त्या दिवशी कढईत मंद आचेवर सुके किसलेले खोबरे गुलाबी रंगावर भाजून घ्या. नंतर त्याच कढईत खसखस भाजून घ्या.खोबरे आणि खसखस एका परातीत एकत्र करुन ठेवा..थोडे तूप घालून खारीक पावडर भाजून घ्या.आणि खोबरं खसखशीच्या मिश्रणात घाला..

  3. 3

    त्याच कढईमध्ये साजूक तूप घालून काजू बदाम तळून घ्या.गार झाल्यावर काजू बदाम,पिस्ता,अक्रोड यांची मिक्सरवर भरड पूड करुन घ्या.आणि ती परातीमधील मिश्रणात घालून व्यवस्थित एकत्र करा..बेदाणे घाला.

  4. 4

    आता भिजवलेली डिंक पूड लाडूच्या मिश्रणात घाला..आणि साजूक तूप घालून मिक्स करा.जायफळ पूड घालून मिक्स करा.

  5. 5

    कढईमध्ये मंद आचेवर थोडे तूप घालून गूळ घाला..त्यात गूळ भिजेल एवढेच पाणी घालून गूळ वितळू द्या..गूळ वितळल्यावर 3-4 मिनीटेच गुळाचा पाक उकळू द्यावा..मग त्यात लाडूचे मिश्रण घालून चांगले परतून घ्या.गँस बंद करा..आता या मिश्रणात 2ते 3 टेबलस्पून परत साजूक तूप घालून लाडूचे मिश्रण एकजीव करा..आणि गरम असतानाच लाडू वळावेत..लाडूचे मिश्रण गार झाले तर परत थोडे गरम करून घ्या आणि राहिलेले लाडू वळून घ्या..

  6. 6

    अशा रीतीने तयार झालेले हे इम्युनिटी बूस्टर डिंक लाडू रोज एक खाऊन त्यावर एक कप दूध प्यावे..

  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (9)

Similar Recipes