"डिंकाचे पौष्टिक लाडू" (dinkache ladoo recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#SWEET

"थंडीसाठी पौष्टिक डिंकाचे लाडू"

थंडीमध्ये खाण्यासाठी मस्त आणि पौष्टिक असतात डिंकाचे लाडू..बाळंतीण बाईला खाणे तर गरजेचे असते.त्यामुळे शरिराची झालेली झीज भरून येते.. लहान मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खावे असे हे पौष्टिक लाडू आहेत.. पुर्वी खारीक फोडण्यापासुन ते खलबत्त्यात कुटण्या पर्यंत सगळे घरीच केले जायचे..पण आता खारीक, खोबरे कुटण्याच्या मशीन उपलब्ध आहेत.. नाहीतर आपला रोजचा वाटप करुन देणारा सोबती आहेच मिक्सर दादा..नाही का..तर मी हे लाडू पारंपारिक पद्धतीने च केले आहेत पण मिक्सर दादांची मदत घेऊनच.. चला तर रेसिपी कडे वळुया..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
पाच सहा
  1. 1 कपकिसलेले सुके खोबरे
  2. 1 कपखारीक पावडर
  3. 75 ग्रॅमकच्चा डिंक
  4. 3/4 कपगुळ
  5. 1 टीस्पूनवेलचीपूड
  6. 2 टेबलस्पूनकाजुचे काप
  7. 2 टेबलस्पूनबदाम काप
  8. 2 टेबलस्पूनपिस्त्याचे काप
  9. 1 टेबलस्पूनखसखस
  10. 1/2 कपसाजुक तूप

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    खारीक फोडून घ्यावी व त्यातील बिया आणि तोंडाकडचा भाग (देठाकडचाही म्हणु शकतो) आमच्या गावाकडे तर नाक म्हणतात त्या भागाला,तो काढून घ्यावे..व खोबरे किसून घ्यावे..

  2. 2

    खारीक थोडी नरम होती,मी आजच दुकानातून आणली होती.. मिक्सरमध्ये बारीक होईल की नाही शंकाच होती..उन्हात ठेवायला टाईम नव्हता..मग मी मायक्रोवेव्ह सेफ प्लेटमध्ये काढून ती दोन मिनिटे ओव्हनमध्ये ठेवली.. आणि ती मस्त कडक झाली..मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली.. खोबऱ्याचा कीस सुद्धा थोडासा फिरवून घ्यावा.

  3. 3

    गॅस वर कढईत खसखस भाजून घ्यावी नंतर दोन, तीन टेबलस्पून तूप घालून त्यात ड्रायफ्रुट्स तळून घ्यावे.मग डिंक थोडा,थोडा टाकून मस्त फुलवुन घ्यावे..

  4. 4

    त्याच कढईत खोबरे कीस आणि खारीक पावडर तुपात भाजून घ्यावे.

  5. 5

    प्लेटमध्ये काढून घ्यावे व कढईत दोन टेबलस्पून तूप घालून बारीक केलेला गुळ घालून गॅसवर ठेवावे व गुळ विरघळेपर्यंत सतत हलवत रहावे..उकळी आली की दोन मिनिटे शिजू द्यावे व वेलचीपूड घालावी व गॅस बंद करावा

  6. 6

    पाक करण्याआधी तळलेला डिंक वाटीच्या साहाय्याने दाबुन घ्यावे किंवा हाताने कुस्करून घ्यावे, चुकून एखादा खडा पुर्ण तळला गेला नसेल तर सगळ्या लाडू मध्ये खाताना कडक लागेल व एवढी सगळी मेहनत फुकट जाईल आणि महागडे साहित्य वाया जाईल.. म्हणुन ही स्टेप गरजेची आहे.. मिक्सरमध्ये वाटून न घेता हातानेच किंवा वाटीने डिंक कुस्करून घ्यावा..

  7. 7

    खारीक, खोबरे, खसखस,डिंक,ड्रायफ्रुट्स हे सगळे जिन्नस एकत्र मिसळून घ्यावे..व पाकामध्ये घालावे व चांगले मिक्स करावे

  8. 8

    गरम असतानाच हव्या त्या आकारात लाडू वळावेत.. पिस्त्याचे काप लावून सजावट करावी..

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes