डिंक लाडू (dink ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत खसखस चांगली खरपूस भाजून घेतली. मग सूखे खोबरे किसून खरपूस भाजून घेतले.
- 2
मग डिंक, काजू तुपात तळून घेतले. सगळ्यात शेवटी मनुका तळून घेतले.
- 3
मग त्याच कढईत थोड्या तुपात खारीक पावडर भाजून घेतली. नंतर त्याच कढईत गुळ घालून मंद गॅसवर वितळवून घेतला.
- 4
नंतर डिंक मिक्सर मध्ये बारीक करून घेतले. मग त्यात मेथी पावडर, सूखे खोबरे, खारीक पावडर, खसखस, जायफळ पावडर, वेलची पावडर घालून सर्व मिश्रण एकत्र करून घेतले.
- 5
आणि मग त्यात वितळवून घेतलेला गुळ घालून, चांगला मिक्स करून मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतले. व वेलची पावडर व जायफळ पावडर घालून मिश्रण तयार झाले.
- 6
नंतर त्याचे लाडू वळून घेतले. अश्या प्रकारे सर्व्ह करावे आपले खमंग, खुसखुशीत डिंक लाडू. हे लाडू थंडीच्या दिवसांत आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी खूप उत्तम असतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी डिंक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डिंक मेथी लाडू (dink methi ladoo recipe in marathi)
#GA4#week14#ladooलागणारे जिन्नस:थंडी सुरु झाली कि या लाडवांची आठवण येते..वर्षभराच्या आरोग्याच्या बेगमीसाठी हे लाडु अवश्य खावे असे म्हणतात..त्यासाठी लागणारे जिन्नस हे काटेकोर मापाप्रमाणे घेतले नाही तरी चालते..सगळे जिन्नस घेतले नाही तरी चालते व अजुन नवे काही आयुर्वेदिक औषधी जिन्नस घातले तरी चालते. लाडु साठी तूप गायीचे वापरावे. मेथीची बारीक पूड तूपात भिजवल्याने मेथी अजिबात कडू लागत नाही. चला तर मग बघुया डिंक मेथीचे लाडू कसे बनवायचे..... Vandana Shelar -
डिंक लाडू (dink ladoo recipe in marathi)
#डिंकलाडू आयुर्वेदानुसार डिंक लाडू खाणे अतिशय फायदेशीर असते हे माहीतच आहे आपल्याला...कॅल्शियम n उत्साह आपल्या शरीरात राहावे म्हणून थंडीच्या दिवसात हे लाडू खाल्ले जातात...मग वर्ष भर शरीर तंदुरुस्त राहते..आणि हे लाडू बाळंतिणीला ही देतात...मी जेव्हा भारतात होते तेव्हा नेहमी करायचे बट इथे( नेदरलँड्स)आल्यापासून पहिल्यांदाच केलेत...माझ्या नातेवाईका मध्ये कोणालाही बाळ झाले त्याला बघायला जाताना मी हे लाडू बनवून न्यायचे...तिथे एसिली भारतीय साहित्य उपलब्ध असते सो भारतीय पदार्थ करायला तेव्हढी difficulty येत नाही...आज इथे केले आणि करतानाच माझ्या मुलगा आणि त्याचे friends खेळून घरी आले आणि फोटो काढायचा आतच अर्धे लाडू फस्त केले..या प्रमाणात २२-२५ लाडू झाले होते..आज इथे केलेले डिंक लाडू ची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
डिंक लाडू (dink ladoo recipe in martahi)
#GA4#week14#keyword_ladooही रेसिपी माझ्या सासूबाई(आईंकडून) मी पहिल्यांदाच विचारून केली आहे..😀 आणि हो वरील प्रमाणात ६०-६५ लाडू होतात Monali Garud-Bhoite -
-
ड्रायफ्रूट डिंक लाडू (dryfruit dink ladoo recipe in marathi)
#CookpadTurns4 #कुकविथ ड्रायफ्रूट Tina Vartak -
पारंपरिक डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
#shitalShital Muranjan यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाले लाडू.यात थोडा बदल केला आहे मी, त्यात पिस्ता, अंजीर, काजू, अक्रोड इ.. ड्रायफ्रूट घातले आहेत. Sampada Shrungarpure -
-
डिंक व मेथीचे पौष्टिक लाडू (dink methiche laddu recipe in marathi)
#EB4#W4हिवाळा म्हटले की सांधे दुखी व अपचन ...सारखे त्रास सुरू होतात. आशा वेळी या दिवसात शरीराला ऊर्जा व ताकद मिळवण्यासाठी मी दरवर्षी हे पौष्टिक लाडू बनविते. हे लाडू आरामात 20-25 दिवस राहतात. हे लाडू करताना मी साजुक तुपाऐवजी तिळाच्या तेलाचा वापर केला आहे तसेच मेथी, उडद व मुग डाळ, डिंक वापर केला जो की सांधे दुखी मधे उपयुक्त आहे. तसेच नाचनी, आळीव,गुळ, गहू,ड्रायफृट,.....या मध्ये खूप प्रमाणात प्रोटिन व्हिटॅमीन, फायबर, आयर्न मिळते. असे अतिशय पौष्टिक व स्वादिष्ट लाडू दिवसातून एकदा किंवा दोनदा एक -एक व कपभ दूध घेतल्यास शरीराला हिवाळ्यात थंडी पासून बचाव करण्यासाठी ऊर्जा मिळते व थकवा ही दूर होतो. Arya Paradkar -
डिंक लाडू (dink laddu recipe in martahi)
#लाडू#डिंकलाडूपाक तयार न करता केलेले पौष्टिक आणि प्रोटिन्स ने भरपूर असे डिंक लाडू यामध्ये गव्हाचे पिठ वापरले नाही त्यामुळे हे लाडू उपवासाला पण चालतात Sushma pedgaonkar -
डिंक उडीद लाडू (dink urid laddu recipe in marathi)
#EB4 #W4विंटर स्पेशल रेसिपी...पौष्टिक लाडू Manisha Shete - Vispute -
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#WE4#विंटरस्पेशलरेसिपीजहिवाळा सुरू झाला की डिंकाचे लाडू करणं आलंच.. थंड हवा आणि हे उष्ण पदार्थ आपण एकाच वेळेस खाऊ शकतो या हिवाळ्यामध्ये.... ह्या हवेमुळे हे सर्व उष्ण पदार्थ चांगल्या पध्दतीने पचतात....पाक न करता या सोप्या पद्धतीनं करा थंडीच्या दिवसातले खास, पौष्टिक मेथीचे लाडू.... Vandana Shelar -
पौष्टिक डिंक लाडू (Dink Ladoo Recipe In Marathi)
#हिवाळा#डिंक लाडू#लाडू#खारीक खोबरं Sampada Shrungarpure -
-
-
-
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#W4#डिंकाचे लाडूमी डिंकाचे लाडू मेथी घालून बनवलेत. हे लाडू थंडीच्या दिवसात कंबरदुखीवर खूप गुणकारी म्हणून दरवर्षी मी करते. Deepa Gad -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#AAपौष्टिक लाडु चे पीठ करताना डाळी ,गहू ,नाचणी सोयाबीन तांदूळ हे सर्वच येते त्यामुळे हे लाडू पौष्टिक होतात Pallavi Musale -
इम्युनिटी बूस्टर डिंक लाडू... थंडी मधली must खादाडी..😋 (dink ladoo recipe in marathi)
#GA4 #Week15 की वर्ड--गूळइम्युनिटी बूस्टर डिंक लाडू...अर्थात थंडीतील खाऊची खादाडी..😍😋थंडीचा मोसम म्हणजे भाजीपाला, फळफळावळ,सुकेमेवे,दूधदुभतं,सूप्स,सलाड्स, लाडू,वड्या,खिरी ,शिरा,विविध प्रकारचे हलवे ,आवळा,मिरची,लिंबाची लोणची , चटण्या ,तीळ गुळ,मुबलक तेलाचा आणि साजूक तुपाचा घसघशीत वापर 🤩आणि बरंच काही... लहानपणी आई म्हणायची ..अरे खाऊन घ्या सगळं आत्ता या थंडीमध्ये...आत्ता खाल्लेलं अंगी लागतं..वर्षभर उपयोगाला येईल...मग तुमच्या शरीराला दगड पचवायची पण ताकद येईल..🤔... कळायचं नाही तेव्हां..असं वाटायचं की आम्ही खावं म्हणून आपलं काहीतरी लपेट मारतीये आई आम्हांला...दगड कधी खातो का आपण तर मग पचवणार कसे🤔खरंच मलातरी असंच वाटायचं...बालबुद्धी हो..पण मग हळूहळू त्या दगडाचा अर्थ जसजसे मोठे होत गेलो तसे समजत गेला..दगड पचवायची ताकद म्हणजेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती,immunity system..वाढते आणि मग त्यामुळे आपण रोगांशी आणि polltion शी मुकाबला करुन शकतो.. आईची माया, तळतळ दुसरं काय...हम्म्म्...जावे त्यांच्या वंशा..हेच खरं..शरीरस्वास्थ्याची जशी काळजी घेते ही माऊली तसचं मनाच्या स्वास्थ्यासाठी ही मायेची ऊब खूप आधार देते कायम..ही मायेची ऊब मिळाली की किती बरं वाटतं ना आपल्याला.. खरंतर आता काही वर्षांपासून मुंबईची थंडी इनमिन २०-२५ दिवसांची पाहुणी झालीये..पूर्वीसारखा ४ महिने मुक्काम नसतो तिचा आताशा.. उणेपुरे ५-६ दिवस हेच फक्त GST चे..म्हणजे..🤔.अहो गोधडी स्वेटर,टोपीचे.😀हे सगळं असलं तरी खाद्यसंस्कार गप्प बसून देत नाहीत ना...नियम म्हणजे नियम...विषय संपला...म्हणूनच मग हा सगळा थंडीच्या खाऊचा आणि मायेच्या उबेचा प्रपंच.मागच्या वर्षी डिंकाचे साखरेचे लाडू केले होते.आतायावर्षीगुळाचेकेलेत. Bhagyashree Lele -
-
डिंक कणिक मेथी लाडू (dink kanik methi laddu recipe in marathi)
#gprआपल्या संस्कृती मध्ये गुरुपरंपरेलाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा दिवस आपल्या गुरूंना वंदन करून ,खास नैवैद्य बनवून साजरा केला जातो. पावसाळ्यामध्ये मी नेहमी डिंक कणिक मेथी लाडू बनवते, त्याची बनवण्याची तयारी केलीच होती तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा नैवद्य मी अर्पण करून तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करत आहे, त्याचा आनंद घ्यावा. Vandana Shelar -
-
उडीद-डिंक लाडू (urid dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4उडीद डाळ ही पूर्ण शाकाहारी लोकांसाठी एक वरदान आहे.यातील प्रोटिन्स हे सर्व डाळींपेक्षा जास्त प्रमाणात असतात.उडीद डाळीमध्ये मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम सारखी महत्त्वपूर्ण खनिजे असतात, जे आपल्या हाडांच्या खनिजांची घनता सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.उडीद डाळीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे, जे आपल्या शरीरातील उर्जेची एकूण पातळी वाढविण्यास आणि आपल्याला सक्रिय ठेवण्यास मदत करते.ज्याप्रमाणे मांसाहारी व्यक्तिंकरीता मांसाहार पौष्टीक वजन वाढविणारा असतो. त्याप्रमाणे शाकाहारी व्यक्तींकरीता उडीद मांसवर्धक व पुष्टी कारक आहे.उडदाची डाळ फक्त दक्षिण भारतीय भागातच नाही तर उत्तर भारतीय खाद्यप्रकारातही प्रसिद्ध आहे.उडदाचे लाडू, सूप, दालमखनी, उडदाचे वडे,उडदाचे पापड, असे कितीतरी पदार्थ उडदापासून बनविता येतात.डिंकाचे सेवन केल्याने शरीरातील थकवा नाहीसा होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी आवश्यक असणारी पोषक तत्व डिंकामध्ये असतात. आजारी व्यक्तींना किंवा अशक्तपणा आलेल्या व्यक्तींसाठीही डिंक फायदेशीर ठरतो.डिंक गरम असल्यामुळे विशेषत: थंडीमध्ये याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.पाठीच्या हाडाला डिंक मजबुत बनवतं.त्यामुळे लहान मुलांना डब्याला किंवा सकाळी दुधासोबत नाश्त्याला हे लाडू देता येतील.आज करु या डिंक आणि उडदाचे लाडू...खमंग,पौष्टिक आणि बलदायी💪 Sushama Y. Kulkarni -
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#W4" डिंक मेथी लाडू "साधारणतः गरोदरपणानंतर हे लाडू बाळंतिणीला देण्यात येतात.परंतु कोलेस्ट्रॉल, मधुमेह,तसेच रक्तक्षय असणाऱ्यांना आणि कॅल्शियम कमी असणाऱ्यांसाठी पण हे लाडू खूप गुणकारी असतातमला स्वतःला हे लाडू फार आवडतात.पावसाळा व थंडी मध्ये आवर्जून आम्ही हे लाडू बनवतो.कणीक, गुळ, तूप, सुकामेवा,डिंक या नेहमीच्याच्या पौष्टिक घटकांना पदार्थांना मेथीची जोड देऊन हे लाडू केले जातात. मेथी कडू रसाची असल्याने त्यामुळे सूजनाशक आणि जंतूनाशक असे दोन्ही गुणधर्म त्यातून मिळतात. थंडीच्या दिवसात उध्दभवणारे सांध्यांचे विकार, सांध्यांची सूज, स्नायूंच्या वेदना, घशात जंतुसंसर्गामुळे येणारी सूज यावर मेथी उपयुक्त ठरते. थंडीने छातीत कफ जमा होणे, सर्दी होणे, अशा तक्रारींवर मेथी उपयुक्त ठरते. तसेच या दिवसात लहान मुलांना अश्या लाडूंचा सेवनामुळे त्यांची हाडे बळकट होतात. थंडीत होणाऱ्या केसाच्या कोंडा देखील या मेथीयुक्त पदार्थच्या सेवनाने कमी होतो , तसेच रक्त वाढवणे, रक्तशुद्धी करणे, हाडांना बळकटी देणे, त्वचा व डोळ्यांची काळजी घेणे हे फायदे मेथीच्या सेवनाने मिळतात. तेव्हा हिवाळ्यात डिंक मेथीच्या लाडूंचा खाण्यात जरूर समावेश करावा तेव्हा मी आज इथे माझ्या आईची खास रेसिपी देत आहे, हे लाडू मला आणि माझ्या घरी सर्वांना फार आवडतात..👌👌 हिवाळ्याची चाहूल लागली की आईच्या मागे लागून हे लाडू बनवायला सांगितली जातात, आणि माझी आई ही काहीही किरकिर न करता अगदी प्रेमाने आम्हा सर्वांसाठी आवर्जून बाबांच्या मदतीने हे लाडू बनवते...😋 आई बाबांचं पोटभर प्रेम या लाडू रूपाने दार थंडी मध्ये आम्हाला खायला मिळत हे विशेष....👍👍 Shital Siddhesh Raut -
-
हिवाळी डींक लाडू (Dink Ladoo Recipe In Marathi)
#NVR-सध्या ठंडीचा मोसम सुरू आहे तेव्हा काही पौष्टिक पदार्थ करण्याबरोबरच आपला आनंद ही घेता येईल अशी रेसिपी मी केली आहे. Shital Patil -
शाही- शुगर फ्री डिंक लाडू (sugar free dink ladoo recipe in marathi)
#sweet- थंडी अजूनही ओसरली नाही, तेव्हा हेल्दी, रूचकर पदार्थ खाण्याची सध्या गरम आहे,कारण कोरोनाशी टक्कर देण्यासाठी हाच उत्तम उपाय आहे. Shital Patil -
-
-
डिंक लाडू (dink ladoo recipe in marathi)
#EB4 #W4हिवाळ्यात सकाळी थंडीच्या दिवसात पौष्टिक असा.:-) Anjita Mahajan
More Recipes
- स्ट्राॅबेरी मुरांबा...😋🍓 (strawberry muraba recipe in marathi)
- चटपटे मटर (chatpate mutter recipe in marathi)
- हर्बल टी (काढा) विंटर स्पेशल (herbal tea recipe in marathi)
- गव्हाची / दलियाची खीर (daliya kheer recipe in marathi)
- स्टीम,फ्राईड चिली चिकन मोमोज मोमोज चटणी सोबत (steam fried chilli chicken momos recipe in marathi)
टिप्पण्या