दही बारा (वड़ा) आलू दम (करी) --ओडिशा स्पेशल (aloo dum recipe in marathi)

Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

दही बारा (वड़ा) आलू दम (करी) --ओडिशा स्पेशल

#GA4 #Week16 #Orissa गोल्डन एप्रन 4 -आठवडा 16 कीवर्ड- ओडिशा

दही बारा आलू दम हा दही वडाचा प्रकार ओडिशा राज्याच्या कटक येथून उत्पन्न झाला आहे. हे एक प्रकारचा चाट आहे जो संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे.
धुतलेली उडीद डाळ रात्रभर सामान्य पाण्यात भिजत ठेवतात. मग डाळ मिक्सरमध्ये ग्राईंड करून वड्या च पीठ तयार करतात. हे वडे गरम तेलात तळून घेतात. तळलेले वडे प्रथम पाण्यात टाकले जातात आणि नंतर पुन्हा दही- ताक मध्ये टाकतात. सर्व्ह करताना दही वड्या वर आलू दम (बटाट्याची करी) घालून नंतर चिरलेला कांदा, मिरची आणि कोथिंबीर घालून डिश ची सजावट केली जाते.
मी ही कृती "Cooks Pan" ची मूळ रेसिपी "दही बारा आलू दम" मधून पुन्हा तयार केली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35-45 मि
4/5 सर्व्हिंग्ज
  1. वडा साठी घटक:-
  2. 1 कप भिजवून ठेवलेली उडद डाळ
  3. 2हिरवी मिरची
  4. 1 टेबलस्पून आले किसून
  5. 3पाकल्या लसूण
  6. आवश्यकतेनुसार पाणी डाळ वाटून घेण्यासाठी
  7. 6-7भिजवून घेतलेल्या बदामाचे सालं काढून तुकडे
  8. तेल - तळण्यासाठी
  9. मीठ चवीनुसार
  10. आलू दाम बनवण्यासाठी घटक :-
  11. 2-3मध्यम आकाराचे बटाटे
  12. 2लहान आकाराचे कांदे चिरलेले
  13. 2लहान आकाराचे टोमॅटो चिरून
  14. 1 टीस्पून आले लसूण पेस्ट
  15. 1 टेबलस्पूनजीरे
  16. 1 टीस्पून धणे पावडर
  17. 2 टीस्पून लाल तिखट
  18. 1 टीस्पून गरम मसाला
  19. 2-3 टेबलस्पून तेल
  20. मीठ - चवीनुसार
  21. दही मिश्रण:-
  22. 1 कप - दही (बीटन)
  23. 1 टीस्पून काळी मिरी पावडर
  24. मीठ चवीनुसार
  25. गार्निशिंगसाठीः
  26. 1/8 कप सेव्ह
  27. 1/2कांदा- बारीक चिरून
  28. 2 टेबलस्पून टोमॅटो बारीक चिरून
  29. 2 टेबलस्पून कोथिंबीर - बारीक चिरून
  30. 1मिरची चिरलेली
  31. चिमूटभर चाट मसाला

कुकिंग सूचना

35-45 मि
  1. 1

    उडदाची डाळ 6-7 तास भिजत ठेवा.
    नंतर पाणी निथळून उडीद डाळ, हिरवी मिरची, आले, लसूण, मीठ आणि आवश्यकतेनुसार किंचित पाणी मिक्सर जार मध्ये घालून जाडसर पीठ वाटून घ्या. पिठात बदामाचे तुकडे घालून चांगले मिसळून घ्या.

  2. 2

    कढईत तेल गरम करत ठेवावे. स्पून चा साहाय्याने पिठाचे लहान गोळे तयार करुन गरम तेलात घालून चांगले दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग होइपर्यंत तळणे.

  3. 3

    एका भांड्यात 2-3 ग्लास कोमट पाणी घेऊन त्यामध्ये किंचित मीठ घाला. आता या पाण्यात सर्व वडे 15-20 मिनिटे भिजवा जेणेकरून ते फुलतील आणि मऊ होतील. 20 मिनिटांनी पाण्यातून सर्व वडे बाहेर काढून वड्या मधून पाणी पिळून काढा.

  4. 4

    अलू दाम बनवण्यासाठी कृती :-
    बटाटे उकळून, सोलून नंतर त्याचे मध्यम चौकोनी तुकडे करा.
    कढईत तेल गरम झाल्यावर, त्यात जीरे घालून १ मिनिट फोडणी द्या.
    आले-लसूण पेस्ट, चिरलेला कांदा, धणे पूड, गरम मसाला, लाल तिखट घाला आणि कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या.

  5. 5

    चिरलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ घाला. बटाटा चौकोनी तुकडे घाला आणि 2 मिनीटे शिजवा. नंतर 1 ते दीड कप पाणी घाला आणि 5 मिनिटे झाकून उकळत ठेवा. ग्रेव्ही मध्यम सुसंगततेनंतर आटले कि गॅस बंद करा.

  6. 6

    दरम्यान, दही मिश्रण तयार करावे. 1 कप दह्यात 1/2 कप पाणी घालून घोळून घ्या. नंतर त्यात मीठ आणि चिमूटभर काळी मिरी पावडर घाला. नंतर तळून आणि भिजवलेले वडे दह्याचा मिश्रणात घाला

  7. 7

    सर्व्हिंग प्लेट मध्ये चार Dahi Bara ठेवा. २ स्पॅट्युलास पूर्ण आलू दम त्यावर घाला. नंतर त्यावर चिरलेला कांदा, चिरलेले टोमॅटो, sev, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चिमूटभर चाट मसाला ने गार्निश करून घ्या.

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
रोजी
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

Similar Recipes