दम आलू (dum aloo recipe in marathi)

Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
Dombivli East

#GA4 #week1
#potato Golden Apran थीम साठी ची पहिलीच रेसिपी केली आज,आलू ची भाजी सर्वांची आवडणारी आहे व घरात भाज्या नसल्या की अलू तयारच असतो..आज रविवार पण होता व नावरोबा ची आवडती डिश आहे दम आलू व गरमागरम पोळी..

दम आलू (dum aloo recipe in marathi)

#GA4 #week1
#potato Golden Apran थीम साठी ची पहिलीच रेसिपी केली आज,आलू ची भाजी सर्वांची आवडणारी आहे व घरात भाज्या नसल्या की अलू तयारच असतो..आज रविवार पण होता व नावरोबा ची आवडती डिश आहे दम आलू व गरमागरम पोळी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
2 - 3 जणांसाठी
  1. 250 ग्रॅमआलू
  2. 2कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 1 वाटीदही
  5. 1 टेबलस्पूनअद्रक लसूण पेस्ट
  6. 1 टेबलस्पूनतिखट
  7. 1/4 टेबलस्पूनहळद
  8. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  9. 1 टेबलस्पूनजिरेपूड
  10. 1/4 टेबलस्पूनजिरे
  11. 4 टेबलस्पूनतेल
  12. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    आलू स्वच्छ धुऊन कुकर मध्ये उकडत ठेवावे..1 शिट्टी झाली की गॅस बंद करून थंड झाले की त्याची साल काढून घ्यावी..एक भांड्यात दही घेऊन त्यात तिखट,हळद,गरम मसाला व जिरेपूड मिक्स करून घ्यावी..कांदा व टोमॅटो ची पेस्ट करून घ्यावी..

  2. 2

    कढईत तेल घाला त्यात उकडलेले आलू फ्राय करून घ्या..उरलेल्या तेलात आता भाजी करूया..त्यात जिरे घाला व अद्रक लसूण पेस्ट व कांद्याची पेस्ट घाला..

  3. 3

    कांदा परतल्यावर टोमाटो पेस्ट घालावी ती परतली की दह्याचे मिश्रण घालावे हे सर्व 10 मिनिट शिजवून घ्या..आणि त्यात फ्राय केलेले आलू घाला..व 2 मिनिटं उकळू द्या..

  4. 4

    दम आलू तयार आहे..गरमागरम पोळी सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
रोजी
Dombivli East

टिप्पण्या

Similar Recipes