शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

#GR
शेव भाजी हा खान्देशातील प्रसिद्ध प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे शेव भाजी करतात. पण मी तीच भाजी आज गोडा मसाला घालून केली आहे.

शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)

#GR
शेव भाजी हा खान्देशातील प्रसिद्ध प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे शेव भाजी करतात. पण मी तीच भाजी आज गोडा मसाला घालून केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. १५० ग्रॅम शेव
  2. 5-6 टेबलस्पूनतेल
  3. 3मोठे कांदेेेेे
  4. 7-8लसूण पाकळ्या
  5. 1आलं बारीक चिरून
  6. 2हि. मिरची
  7. 1/4 कपसुक खोबर किसलेलेेेेे
  8. 2छोटे टोमॅटो बारीक चिरलेले
  9. 1/2 टीस्पूनमोहरी
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. 1/4 टीस्पूनहिंग
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. 2 टेबलस्पूनगोडा मसाला
  14. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  15. 1-2 टेबलस्पूनलाल तिखट
  16. 1 टेबलस्पूनधने पावडर
  17. 2-3 टेबलस्पूनलिंबू रस
  18. मीठ चवीनुसार
  19. कोथिंबीर गार्निशिंगसाठी
  20. गरम पाणी
  21. 1/4 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम एका पॅनमध्ये सुक खोबर लालसर होईपर्यंत भाजून घ्या. आणि मिक्सर जार मध्ये काढून ठेवा.

  2. 2

    आता कढईत तेल गरम करून त्यात कांदा, लसूण, आलं, मिरची घालून सगळे नीट शिजवून घ्या.

  3. 3

    मग कांदे मिश्रण थोडे गार झाल्यावर खोबर व कांदा मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

  4. 4

    आता एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग अशी फोडणी करून त्यात ग्रेव्ही मिश्रण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.

  5. 5

    मग त्यात चिरलेला टोमॅटो घालून शिजवून घ्या. एकीकडे गॅसवर पाणी गरम करत ठेवा.

  6. 6

    नंतर त्यात सगळे पावडर मसाले- हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, गोडा मसाला घालून नीट मिक्स करावे व गरम पाणी घालून छान शिजवून घ्या. शेवटी चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबू रस घालून मस्त दणदणीत उकळी आणा. व कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

  7. 7

    आपल्या शेव भाजी साठी लागणारा महत्वाचा असा कट तयार आहे.

  8. 8
  9. 9

    टीप: साखर व गरम पाणी घातल्याने तरी छान येतेच, पण पदार्थांची चव सुध्दा वाढते. म्हणून स्वयंपाक करताना नेहमी गरम पाणीच वापरावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861
रोजी
Cooking is an art..Cooking and baking is my passion, want to make it as a profession!!
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes