पारंपरिक - गुळाची पोळी / तिळ गूळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)

पारंपरिक - गुळाची पोळी / तिळ गूळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
गावरान तिळ प्रथम भाजून घ्या. भाजून झाल्यावर गार करायला ठेवा.
बेसन पण मोजून घ्या. - 2
कढईत तेल तापत ठेवा त्यात बेसन पीठ मंद आचेवर बदामी रंगावर भाजून घ्या. गूळ किसून नंतर मोजून घ्या.
- 3
गव्हाचे पीठ मोजून घ्या. तेल (मोहनसाठी) पण मोजून घ्या. नंतर कढईत तेल तापत ठेवा. तेल तापले आहे की नाही ते बघण्यासाठी चिमटीभर पीठ घालून बघा. ते जर पटकन वर आले फुलून तर तेल छान तापले आहे. गॅस बंद करावा. व ते तेल पिठावर घाला आणि छान चोळून घ्या. नंतर हळूहळू पाणी घालून पीठ भिजवून घ्या.
- 4
पीठ मळून तयार आहे. 15 मिनिटे झाकून ठेवा.
- 5
तिळ गूळाचे मिश्रण :-
मिक्सरच्या भांड्यात तिळ घालून बारीक करून घ्या. गूळ किसून घेतलेला एका वाडग्यात घ्या. त्यात वेलची जायफळ पावडर घाला. तिळ बारीक केलेले घाला, आणि भाजून घेतलेले मिश्रण घाला नी व्यवस्थित मिक्स करून घ्या. - 6
आता हे सर्व मिश्रण मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे. म्हणजे छान एकजीव होईल. आणि त्यात 1 टीस्पून पाणी घाला म्हणजे थोडासा ओलसर पणा येतो. तिळ गूळाचे मिश्रण तयार आहे.
- 7
आता भिजलेल्या पिठाचे आणि गूळाचे एक सारखे गोळे करून घ्या.
- 8
त्यातील पिठाचा एक गोळा घ्या. त्याचे दोन भाग करून घ्या. त्याच्या दोन चकत्या /पार्या / पुर्या पातळ लाटून घ्या. गुळाचा मिश्रणाचा एक गोळा घेऊन तो एका चकतीवर ठेवून पसरवून घ्या. आणि त्यावर दुसरी चकती व्यवस्थित चिकटवून घ्या.
- 9
आता दोन्ही पार्या व्यवस्थित चिकटल्या आहे. आता नॉनस्टिक तवा तापवत ठेवा.
कोरड पीठ दोन्ही बाजूने लावून नंतर हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. नंतर पोळी तव्यावर घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. - 10
गूळ पोळी भाजून तयार आहे. एका पेपर वर सगळ्या पोळ्या पसरवून ठेवा. म्हणजे एकमेकाला चिकटणार नाहीत.
अश्या पद्धतीने सगळ्या पोळ्या करुन घ्या. - 11
तूप घालून तिळ गूळ पोळी / गुळाची पोळी सर्व्ह करा.
- 12
- 13
टीप:- तेल जर जास्त झाले तर पोळी खूप खुशखुशीत होऊन ती पोळी भाजताना फुटते व गूळ बाहेर येतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes






























टिप्पण्या (7)