पिस्ता चिक्की (pista chikki recipe in marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#GA4 #week18 चिक्की हा कीवर्ड ओळखून मी पिस्ता चिक्की केली आहे. ड्रायफ्रुट्स म्हटलं की, त्यामध्ये बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या पदार्थांसोबतच पिस्त्याचाही समावेश होतो. पिस्ता चविला उत्तम ठरतो. हिरव्या रंगाच्या पिस्त्यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, झिंक, कॉपर, पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअम आणि इतर अन्य पोषक तत्व आहेत. यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटं
४ सर्व्हिंगज
  1. 1 कपसाखर
  2. 1 टीस्पूनसाजूक तुप
  3. 1/2 कपपिस्त्याचे तुकडे
  4. 1/4 टीस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

२० मिनीटं
  1. 1

    प्रथम एका कढईत साखर आणि तुप घालावे. थोड्या थोड्या वेळाने ढवळत राहावे.

  2. 2

    साखर पूर्णपणे विरघळली की त्यात पिस्त्याचे तुकडे आणि वेलचीपूड घालून ढवळावे. पोळपाटाला आणि लाटण्याला तुप लावून ठेवावे.

  3. 3

    आता पोळपाटावर कढईतले मिश्रण ओतून चमच्याने सारखे करावे. जरा घट्ट झाल्यावर उलट करुन लाटण्याने लाटावे आणि मग काप करावे. गार झाल्यावर चिक्की सोडवावी. पिस्ता चिक्की तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes