लिटिल हार्ट डोन्हट्स (little heart donuts recipe in marathi)

Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780

😋😋
#Heart
दिल हैं की मानता नाही...... माझा फेवरेट गाणं तसच काय करू दिल मानत नाही😄 म्हणू अजुन काहीतरी गोड पदार्थ कोणता करायचा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी??
तर मी ठरवलं छोटुशे सुंदर हार्ट शेप डोन्हट्स बनवुया.
तर एन्जॉय करा रेसिपी 😍😊.

लिटिल हार्ट डोन्हट्स (little heart donuts recipe in marathi)

😋😋
#Heart
दिल हैं की मानता नाही...... माझा फेवरेट गाणं तसच काय करू दिल मानत नाही😄 म्हणू अजुन काहीतरी गोड पदार्थ कोणता करायचा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी??
तर मी ठरवलं छोटुशे सुंदर हार्ट शेप डोन्हट्स बनवुया.
तर एन्जॉय करा रेसिपी 😍😊.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दिड तास
6 सर्व्हिंग
  1. 2 कप- मैदा
  2. 1 कप- दूध
  3. 1- अंड
  4. 2 टीस्पूनईस्ट (खमिर) -
  5. 2 टेबलस्पूनबटर - (मेल्ट केलेलं)
  6. 1 टेबलस्पूनसाखर -
  7. 2 टेबलस्पूनपिठी साखर -
  8. 2 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स -
  9. तेल - तळण्यासाठी
  10. मीठ - चवीनुसार
  11. आयसिंग चे साहित्य
  12. 1 टेबलस्पूनबटर -
  13. 3 टेबलस्पून- आयसिंग शुगर
  14. 1/3 टीस्पून- लाल रंग
  15. 1/4 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स -

कुकिंग सूचना

दिड तास
  1. 1

    सर्वात आधी १/२ कप कोमट दुधात ईस्ट आणि साखर घालून ठेवा.

  2. 2

    एका भांड्यात मैदा चाळून घ्या, त्यात अंड, पिठी साखर, मीठ घाला.

  3. 3

    या मिश्रणात मेल्ट केलेलं बटर घाला, आणि दूध घालून छान एकत्र करून घ्या.

  4. 4

    आत्ता व्हॅनिला इसेन्स आणि उरलेलं दूध घालून पीठ हलक्या हाताने मिक्स करून घ्या.

  5. 5

    मळलेल पीठ २०/३० मिनिटे झाकून ठेवा.

  6. 6

    फरमेंट झालेलं पीठ असं दिसेल.

  7. 7

    हे पीठ हलक्या हाताने लाटून घ्या, आणि कटर ने कापा.

  8. 8

    आत्ता कट केलेले डोन्हट्स परत १५/२० मिनिट फरमेंट करा.

  9. 9

    फरमेंटेड डोन्हट्स असे दिसतील.

  10. 10

    हे डोन्हट्स आत्ता मंद आचेवर तळून घ्या.

  11. 11

    आत्ता डोन्हट्स थंड होईपर्यंत आयसिंग बनवून घ्या.

  12. 12

    आयसिंग साठी एका बाउल मध्ये बटर, आयसिंग शुगर आणि दूध छान फेटून घ्या.

  13. 13

    आयसिंग मध्ये लाल रंग घाला.

  14. 14

    गुलाबी आणि लाल असे दोन आयसिंग तयार करून घ्या.

  15. 15

    आत्ता थंड झालेले डोन्हट्स आयसिंग मध्ये बुडवून डेकोरेट करा.

  16. 16

    पाहिजे असल्यास तुम्ही चॉकलेट सुद्धा लावू शकता.

  17. 17

    सुंदर लिटिल हार्ट डोन्हट्स तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780
रोजी

Similar Recipes