व्हॅनिला हार्ट कूकीज (vanilla heart cookies recipe in marathi)

Shital shete
Shital shete @Shital_123
Pune

#noovenbaking #week4 Thank you Neha mam. घरच्या घरी बिना ओव्हन आणि कमी साहित्यामध्ये एवढ्या छान कूकीज बनवू शकतो असा विचार कधी केला नव्हता. तुम्ही खूप सोपी रेसिपी शिकवली.
छान खुसखुशीत कूकीज बनल्या.

व्हॅनिला हार्ट कूकीज (vanilla heart cookies recipe in marathi)

#noovenbaking #week4 Thank you Neha mam. घरच्या घरी बिना ओव्हन आणि कमी साहित्यामध्ये एवढ्या छान कूकीज बनवू शकतो असा विचार कधी केला नव्हता. तुम्ही खूप सोपी रेसिपी शिकवली.
छान खुसखुशीत कूकीज बनल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्स
  1. 3/4 कपमैदा
  2. 50 ग्रॅमबटर
  3. 50 ग्रॅमपिठी साखर
  4. 2 टेबलस्पूनदूध
  5. 1/4 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  6. 1 पिंचखाण्याचा लाल रंग
  7. 1/4 टीस्पूनबेकिंग पावडर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    एका भांड्यामधे मऊ बटर घ्या. त्यामध्ये थोडी थोडी पिठीसाखर घाला. व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  2. 2

    आता या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स घाला. व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये मैदा घाला.आता या मध्ये बेकिंग पावडर घालून मिक्स करून घ्या.

  3. 3

    तयार मिश्रणाचे 2:1 अशा रेशो मध्ये दोन भाग करून घ्या. आता जास्त असलेल्या मिश्रणात लाल रंग घाला. थोडेसे दूध घालून पिठाचा गोळा बनवून घ्या.राहिलेल्या मिश्रणाचा सुद्धा असाच गोळा करून घ्या

  4. 4

    आता एका क्लीन रॅप वर लाल रंगाचा गोळा घेऊन लाटून घ्या. आता एका कुकी कटरने हार्ट शेप मध्ये कापून घ्या.

  5. 5

    कापून घेतलेल्या एका हार्ट वर पाणी लावून त्यावर दुसरा हार्ट ठेवा. अशा पद्धतीने सगळे हार्ट एकावर एक ठेवून घ्या. हे हार्ट 30 मिनिटे फ्रिजर मध्ये ठेवा.

  6. 6

    30 मिनिटांनी हार्ट बाहेर काढून त्यावर पांढऱ्या रंगाचे मिश्रण लावून घ्या व पुन्हा तीस मिनिटे फ्रिजर मध्ये ठेवा

  7. 7

    आता याचे अर्धा इंच आकाराचे काप करून घ्या. एका ताटामध्ये बटर पेपर ठेवून त्यावर ह्या कुकीज ठेवा. आधी प्रीहिट केलेल्या कढईमध्ये ह्या कुकीज दहा ते पंधरा मिनिटे बेक करून घ्या

  8. 8

    कडेने ब्राऊन रंग आला कि कुकीज तयार आहेत. कुकी थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital shete
Shital shete @Shital_123
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes