आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक (ambyachya rasatil ukadiche modak recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

गणेश जयंती 🙏🌺🙏
१५ फेब्रुवारी सोमवार
म्हणजे १५ फेब्रुवारी च्या दिवशी पौराणीक मान्यतेनुसार शुक्ल महिन्यात गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि पूर्ण विश्वावर गणेशलहरी सर्वप्रथम आल्या तो दिवस म्हणजे माग शुक्ल चतुर्थी. महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणेश हे प्रथमपूजनीय मानले गेले आहे. आपल्या कडे कोणतेही शुभ कार्य असो त्याच्या सुरवातीला गणपतीची पूजा केली जाते. या तिथीला गणपतीच्या चतुर्थीच्या दिवसाचे महत्वव किती तरी पटीने जास्त असते. गणेश चतुर्थीला विनायक चतुर्थी देखील मानले जाते. ह्या वर्षीचे विनायक चतुर्थी सोमवारी १५ फेब्रुवारीला आली आहे.

विनायक चतुर्थी प्रारंभ हि १५ फेब्रुवारी सकाळी प्रातःकाली १:५८ मिनिटांनी सुरु होते आहे आणि चतुर्थी समाप्त होत आहे १६ फेब्रुवारी पहाटे ३:३६ मिनिटांनी. ह्या विनायक चतुर्थीच्या दिवशी केली जाणारी गणेशांची पूजा अत्यधिक लाभदायक ठरते. आपल्या कडे भद्रपतामाध्ये गणेश जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. भाद्रपत मधील गणेश जयंती निमीत्त पूजा केल्यानंतर आपण उकीडीच्या मोदकाचा नैवद्य दाखवला जातो. तर माघे गणेश जयन्तीमध्ये तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो म्हणूनच मागील गणेश जयंती तिलकुंद गणेश जयंती म्हणून देखील ओळखली जाते. अग्निपुराणामध्ये ह्या तिलकुंद चतुर्थी चे महत्व सांगितले आहे म्हणतात कि मोक्षप्राप्तीसाठी ह्या चतुर्थीला लोक व्रत करतात. ह्या दिवशी गणेशजींची पूजा अगदी भक्ती भावाने केल्याने आपल्याला गणेशजींचा आशीर्वाद वर्षभर आपल्या कायम सोबत राहतो आपल्यावर कोणतेही संकटे येऊन देत नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
5जणांसाठी
  1. 1 वाटीपाणी
  2. 1 वाटीतांदुळाचे पीठ
  3. चिमुटभरमीठ
  4. 2 चमचेसाजुक तुप
  5. केसर
  6. मोदक सारणासाठी 👇
  7. 1 वाटीनारळ चव (खोवलेला खोबरे)
  8. 1/4 वाटीगुळ
  9. वेलची पूड
  10. 1 चमचाखसखस
  11. 1 चमचातूप
  12. 3 चमचेआंब्याच्या गर किंवा पल्प
  13. मणुके काजु आवडीनुसार

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    कढईत तूप गरम करत ठेवावे त्या मध्ये खसखस टाकून घ्या मग लगेच गुळ नारळ चे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे आता यात आंब्याच्या गर टाकुन घ्या. काजू मणुके आणि वेलची पूड घालून मध्यम आचेवर परतून घ्यावे. आंब्याच्या छान सुगंध वास येतो..

  2. 2

    1वाटी तांदुळाचे पीठ 1वाटी पाणी असे समप्रमाण..पाणी उकळायला लागले की गॅस बारीक करून घ्या मग चिमुटभर मीठ व 1चमचा तूप घालावे. आंब्याच्या रस घालावा आणि चांगले पाणी उकळून द्या मग लगेच तांदुळाचे पीठ घालून लगेचच हलवावे. गुठळ्या राहु देऊ नका. केसर 7ते 8कांड्या टाका.

  3. 3
  4. 4
  5. 5

    तांदूळाचे उकडीचे पीठ परातीत किंवा ताटात मोकळे करून घ्या. मळुन घ्यायचे.

  6. 6

    मग आपल्या ला हव्या त्या आकारात मोदक बनवुन घ्या. मी वेगवेगळ्या आकारात मोदक बनवते.

  7. 7

    मी 21कळ्यांचा _पाकळ्यांचा मोदक बनवला आहे.

  8. 8
  9. 9
  10. 10

    21कळ्यांचा _पाकळ्यांचा मोदक

  11. 11

    केसर लावून 10मिनिटे मोदक पात्रात मोदक उकडून घ्यावेत.

  12. 12
  13. 13
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

टिप्पण्या

Similar Recipes