राजस्थानी पापड भाजी (rajasthani papad bhaji recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

#GA4 #Week 23 जेव्हा ताज्या भाज्या उपलब्ध नसतात आणि चमचमीत काही करायच आहे तेव्हा ही पापड भाजी एक उत्तम पर्याय आहे..

राजस्थानी पापड भाजी (rajasthani papad bhaji recipe in marathi)

#GA4 #Week 23 जेव्हा ताज्या भाज्या उपलब्ध नसतात आणि चमचमीत काही करायच आहे तेव्हा ही पापड भाजी एक उत्तम पर्याय आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिटं
2 सर्व्हिंग्ज
  1. 5-6उडीद पापड
  2. 1 वाटीदही
  3. 1कांदा
  4. 1हिरवी मिरची
  5. 1/2 चमचाकसुरी मेथी
  6. 1/2 चमचाआलं-लसूण पेस्ट
  7. 1 टीस्पूनधणे-जीरे पावडर
  8. 1/2 चमचागरम मसाला
  9. फोडणी साठी
  10. 1 चमचा साजूक तुप
  11. 1/2 टीस्पूनहिंग -जीरे
  12. 2सुक्या लाल मिरच्या
  13. 2पानं तमालपत्र
  14. 1/2 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
  15. 1/2 टीस्पूनहळद
  16. चवीनुसारमीठ
  17. थोडीशी कोथिंबीर

कुकिंग सूचना

20मिनिटं
  1. 1

    पापड माइक्रोव्हेव मधे भाजून घेतले गँस वर पण भाजू शकता आणि पापडा चे तुकडे केले

  2. 2

    दह्यात लाल तिखट, हळद धणे-जीरे पूड, गरम मसाला घालून दही फेटून घेतले

  3. 3

    कढईत तुप गरम करुन त्यात जीरे -हिंग घातले दोन सुक्या लाल मिरच्या आणि तमालपत्र घालून खमंग फोडणी केली मग त्यात हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट टाकून परतले मग कांदा टाकून कांदा मऊ होई पर्यन्त परतवून घेतले.आता यात हाताने चूरून कसुरी मेथी टाकली चवीनुसार मीठ घातले

  4. 4

    आता यात फेटलेले दही घालून तेल सुटेपर्यंत परतवून घेतले.. मग त्यातआवश्यकतेनुसार पाणी टाकून उकळवून घेतले नंतर त्यात पापडाचे तुकडे टाकून एक उकळी आल्या वर गँस बंद केला

  5. 5

    आणि लगेच बाजरीच्या भाकरी सोबत सर्व्ह केली राजस्थानी पापड भाजी..
    ही भाजी तयार झाल्यावर गरमागरम खाण्यातच मजा आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes