सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#MaggiMagicInMinutes
#Collab
#सुरमई फ्राय
#Maggi Magic-e-Masala or (मॅगी मॅजिक ए मसाला)

Meri Maggi Savoury Challenge ☺☺

काल अशीच विचार करत बसले कुठला पदार्थ करायचा आणि अचानक मिस्टर सुरमई घेऊन आले. या थंडी सीझन मधे सुरमई मिळाली नव्हती. आणि त्यात काल मिळाली म्हणून आनंद द्विगुणित झाला.

नेहमी तिच तिच चव खाऊन कंटाळा येतो, आणि त्यात घरात "मॅगी मॅजिक ए मसाला" चे पॅक पण होते.

म ठरवलेच की होऊन जाऊदे एक हटके ट्विस्ट .....

आणि हा हटके ट्विस्ट इतका आवडला की करायला जेवढा वेळ लागला, फस्त करायला तेवढा वेळ पण नाही लागला.....

मी नॉनव्हेज खात नाही पण सगळ्यांना नाविन्यपूर्ण पदार्थ करून खाऊ घालण्यात खूपच मनापासून आनंद मिळतो ...

चला ही रेसिपी बघूया...☺

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
3.5 सर्व्हिंग्ज
  1. मसाला मॅरीनेशन साठी:-
  2. 1.5 टीस्पूनलाल तिखट
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. 1/2 टीस्पूनमीठ / चवी नुसार
  5. 1/4 टीस्पूनमिरे पूड
  6. 1.5 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  7. 1लिंबू रस
  8. 1/8 टीस्पूनमीठ / चवी नुसार
  9. 375 ग्रॅमसुरमई (फ्रेश)
  10. 1पॅक मॅगी मॅजिक ए मसाला (6 g)
  11. कव्हर साठी साहित्य:-
  12. 2 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  13. 2 टेबलस्पूनकॉर्न फ्लॉवर
  14. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  15. 1/4 टीस्पूनहळद
  16. 4-5 टेबलस्पून तेल फ्राय साठी

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    सुरमई स्वच्छ धून घ्यावी, मीठ आणि हळद लावून. मॅरीनेशन साठी मॅजिक ए मसाला, हळद, लाल तिखट, मीठ, मिरे पूड, लिंबू रस घालून मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    तयार मॅरीनेशन चा मसाला सुरमई ला चोळून घेऊ या दोन्ही बाजूंनी आणि 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवा, म्हणजे मसाला मुरेल त्यात आणि वैस पणा निघून जाईल.

  3. 3

    तांदूळ पीठ, कॉर्न फ्लॉवर, लाल तिखट, मीठ, हळद घालून मिक्स करून घ्या.

  4. 4

    आता एका पेपरवर थोड पिठ पसरवून घ्यावे, त्यावर मॅरीनेड सुरमई ठेवून त्यावर परत पीठ भूर भरुन दोन्ही बाजू व्यवस्थित कोट करावे, अश्या पद्धतीने सगळी सुरमई कोट करून घ्यावी

  5. 5

    आता तव्यावर तेल घालून तवा तापवून घ्या, व नंतर कोट केलेली सुरमई फ्राय करायला ठेवा, नंतर खालून थोडा सोनेरी रंग आल्यावर वरून तेल घाला, व उलटून घ्या आणि दुसरी बाजू पण खरपूस भाजून घ्या.

  6. 6

    सुरमई फ्राय तयार आहे.

  7. 7

    मॅरीनेड सुरमई अशी दिसेल

  8. 8

    सलाड, फुलके / चपाती / भाकरी किंवा वरण भात बरोबर सर्व्ह करा गरमागरम.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes