एनर्जी ॲपल बाइट्स (energy apple bites recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#wd
‘यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, रमन्ते तत्र देवता|’
मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
स्त्री म्हणजे अन्नपूर्णा. घरातील सार्‍या व्यक्तींच्या आवडी निवडी ती पहात असते. पण या सगळ्या व्यापात स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसते. बरेचदा मग कॅल्शियम, आयर्न डिफिशिअन्सीला तोंड द्यावे लागते. म्हणुनच मी घेऊन आले आहे एक सोप्पी ॲपल स्वीट डिश .असे म्हणतात की Apple a day keeps doctor away. पण हे ॲपल जरा वेगळे आहे बरं का. जे कॅल्शियम, आयर्न, ओमेगा 3 याने परिपूर्ण आहे. गुलकंद थंडावा देणारा आहे.आणि महत्त्वाचे म्हणजे विदाउट शुगर आहे.
वुमन्स डे च्या निमित्ताने एनर्जी ॲपल बाइट्स ही स्वीट डिश मी आपल्या सगळ्या कूकपॅडच्या मैत्रिणींना dedicate करते. या सगळ्या माझ्यासाठी नेहमीच प्रेरणा स्थान राहिल्या आहेत. यांच्याकडून प्रत्येक दिवशी काही ना काही नवनवीन शिकत आले आहे.याच मैत्रिणींची प्रतिकृती म्हणुन मी icing sugar पासून एक छोटीशी मैत्रीण ही बनवली आहे.
चला तर मग पाहूया एनर्जी ॲपल बाइट्स...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 minite
15 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपखारीक
  2. 1/2 कपकाळा खजूर
  3. 1/4 कपबदाम
  4. 1/4 कपअक्रोड
  5. 6 टीस्पूनडेसिकेटेड कोकोनट
  6. 3 टीस्पूनगुलकंद
  7. पिस्ता सजावटी करता
  8. लवंग सजावटी करता

कुकिंग सूचना

20 minite
  1. 1

    प्रथम खारीक सोलून आतील बिया काढून घ्या. या खारकेचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्या.

  2. 2

    बदाम व अक्रोड यांची मिक्सर मध्ये भरडसर पूड करून घ्या. फार बारीक नको.

  3. 3

    खजुरातील बीया काढून तेही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.काळा खजूर मऊ असल्याने लगेच वाटला जातो.

  4. 4

    एका डिश मध्ये डेसिकेटेड कोकोनट घेऊन त्यात गुलकंद मिसळणे. छान गोळा व्हायला हवा इतपतच मिसळणे. याचे छोटे छोटे गोळे करणे.

  5. 5

    एका बाउल मध्ये खारीक पूड, बदाम-अक्रोडची पूड, खजूर पेस्ट एकत्र करून घेणे.

  6. 6

    या मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन त्याला वाटीचा आकार द्यावा. त्यामध्ये आधी तयार केलेला खोबरे गुलकंदाचा गोळा ठेवावा.

  7. 7

    पुरणपोळीचा उंडा बनवतो तसा आता हा पूर्ण बंद करावा व वरुन बोटाने दाब द्यावा. म्हणजे ॲपल सारखा आकार तयार होईल. यात एक लवंग उभी खोचावी. जेणेकरून त्याचा देठ वाटेल. पिस्ता स्लाइसने पानासारखी सजावट करावी. ते लवंगाच्या बाजूला खोचावीत.

  8. 8

    आपले एनर्जी ॲपल बाइट्स तयार आहेत.

  9. 9
  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes