चणा करी (मसाला) (Chana curry recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#cf
#चणा करी

चणा करी (मसाला) (Chana curry recipe in marathi)

#cf
#चणा करी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1and 1/2 कप वाफवलेले हरभरे(चणा)
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 5-6लसूण पाकळ्या
  5. 1तमाल पत्र
  6. 1 टीस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  7. 1 टीस्पूनछोले मसाला
  8. 1 टेबलस्पूनकांदा लसुण मसाला (कोणताही तुमच्या ठेवणीतला मसाला घेऊ शकता)
  9. 2 टीस्पूनलाल तिखट( आवडीनुसार घेणे)
  10. 1/2 टीस्पूनमोहरी
  11. 1/2हिंग
  12. 1 टीस्पूनधने पूड
  13. 6-7कढीपत्ता पाने
  14. चवीनुसारमीठ
  15. 2 टेबलस्पूनतेल
  16. 1/2 टीस्पूनहळद
  17. कोथिंबीर
  18. आवशक्तेनुसार पाणी

कुकिंग सूचना

25-30 मिनिटे
  1. 1

    प्रथम हरभरा 2-3 वेळा स्वच्छ धून (काळा चणा)रात्र भर भिजत घालणे. नंतर दुसऱ्या दिवशी करताना हे चणे छोटया कुकर मध्ये घेऊन त्या मध्ये गरम पाणी आणि मीठ घालून छान 15 मिनिटे मऊ शिजवून घेणे.खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे मऊ शिजवून घेणे.

  2. 2

    आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये तेल घालावे व त्यात मोहरी, हिंग, जीरे आणि कढीपत्ता, तमालपत्र याची फोडणी करून घेणे. आता त्या मध्ये बारीक चिरलेला कांदा 2मिनिटे परतून घेणे. आता त्या मध्ये टोमॅटो आणि लसुण याची पेस्ट करून ती कांद्या सोबत 3-4 मिनिटे छान परतून घेणे.

  3. 3

    छान टोमॅटो लसूणचा कच्चपणा जाई पर्यंत परतून घेणे. आता वाफवून घेतलेले चणे त्यातील 1/2 वाटी चणे घेऊन ते मिक्सर मधून त्याची पेस्ट करून घेणे. आता ही चणा पेस्ट त्या कढई मध्ये घालावी व थोडे पाणी घालून छान 2-3 मिनिट परतून घेणे. याने करी ला घट्ट पणा येतो व ती छान मिळून येते.

  4. 4

    आता या मध्ये सगळे मसाले आपल्या आवडी प्रमाणे घालून घेणे. कोणताही तुमचा रोजच्या वापरातील मसाला या मध्ये घालू शकता. हे मसाले छान 3-4 मिनिटे परतून घेणे. व आता त्या मध्ये राहिलेले चणे त्या पाण्या सहित घालावेत. त्या वाफवलेल्या पाण्या मध्ये जीवनसत्व खूप असते. आता त्या मध्ये चवीनुसार मीठ घालून घेणे.

  5. 5

    छान या करीला उकळी काढून घेणे. करी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे या नुसारलागले तर गरम पाणी घालावे.5-7 मिनिटे ही चणा करी शिजवून घेणे. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

  6. 6

    अशा प्रकारे मस्त टेस्टी अशी चमचमीत चणा करी तयार झाली. गरम गरम फुलके, पोळी किंवा पुरी सोबत सर्व्ह करू शकता.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes