रशियन सॅलेड (russian salad recipe in marathi)

#sp #सप्तहीक सॅलेड प्लॅनर मध्ये रविवारची रेसिपी रशियन सॅलेड आहे. लग्न समारंभ किंवा पार्ट्यांमध्ये हे सॅलेड असतेच. मला हे आवडत असल्यामुळे मी हे खातेच. पण मी कधी घरी बनवले नव्हते. आज पहिल्यांदाच बनवले. आम्हाला खूप आवडले. करायला अगदी सोपे आहे. तसेंच लहान मुलांना ही आवडेल, पौष्टिकही आहे. नक्की करून बघा.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे, गाजर, फरसबी धुऊन कापून घ्याव्यात. सफरचंद, चिबूड, अननस कापून घ्यावेत.
- 2
गॅसवर एका भांडयात हाय फ्लेमवर पाणी उकळून घेणे. त्यात थोडे मीठ घालून बटाटे, गाजर, फरसबी, मटार घालून दोन मिनिटे अर्धवट कच्चे शिजवून आणि गरम पाण्यातून काढून थंडगार पाण्यात घालावेत. म्हणजे भाज्यांचा रंग आणि चव बदलत नाही
- 3
एका बाउल मध्ये मायोंनाईस व फ्रेश क्रिम घेऊन फेटून हलके करून घ्यावे. त्यात मीठ व काळी मिरी पावडर घालावी.
- 4
बाउल मध्ये सर्व फळे व अर्धवट उकडलेल्या भाज्या घेऊन वरून फेटून तयार केलेले मायोंनाईस व क्रिमचे तयार केलेले मिश्रण घालून मिक्स करून घ्यावे. रशियन सॅलेड तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या