सातारा कंदीपेढा (satara kandi peda recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्र
रेसिपी क्र. 3 प्रत्येक जिल्हयाचे काहीतरी वैशिष्ट्य असते.साताराचे कंदी पेढे खूप प्रसिद्ध आहेत.
दुध घट्ट होईपर्यंत आटवले जाते. खवा जास्त भाजल्यामुळे त्याला एक पिवळसर,लालसर असा रंग येतो आणि हे पेढे जास्त दिवस टिकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
10 पेढे
  1. 3/4 कपखवा
  2. 2-3 टेबलस्पूनपिठीसाखर. कमी-जास्त करू शकता
  3. 1/4 टीस्पूनवेलची पूड
  4. 2 चिमूटभरजायफळ पावडर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    1) 1/2 लिटर दुध पॅन मध्ये गरम करत ठेवावे. चमच्याने सतत हलवत राहावे म्हणजे खाली लागणार. पूर्ण गोळा होत आला की, गॅस बंद करावा. ताटलीत काढून थंड करत ठेवावा. 2) दुसरी पद्धत मिल्क पावडर वापरून पटकन करता येणारा खवा. याची रेसिपी मी आधी पोस्ट केली आहे.
    दोन्ही खव्याच्या चवी मध्ये थोडा फरक पडतो.

  2. 2

    थंड झाल्यावर हाताने चांगला मळून घेणे. मग त्यात पिठीसाखर, वेलची व जायफळ पावडर टाकून चांगले मळून घेणे.

  3. 3

    मळून घेतलेल्या खव्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे व बोटाने मध्यभागी अलगद दाबावे.म्हणजे छान दिसते.**दुध आटवूनच खवा व त्याचे पेढे केले जातात.

  4. 4

    अशाप्रकारे सातारी कंदी पेढे तयार. मी मिल्क पावडर घालून तयार केलेला खवा वापरला आहे. त्यामुळे रंग व चवीत थोडा फरक आहे. पण चवीला छान झाला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes